माझी लेखणी

Submitted by गवंडी ललिता on 2 January, 2017 - 02:53

माझी लेखणी

मन जेव्हा उदास असते
तेव्हा तुझाच आधार असतो,
जीवनाच्या कोऱ्या कागदाला
लेखणीचा गंध असतो...

निवांत क्षणात माझ्या
तुझ्या शब्दांचा आधार मिळतो,
जीवनाच्या डोलत्या लाटेवर
नौकेला किनारा मिळतो...

मंद वाऱ्याच्या झुळूकेवरती
सुगंधित पक्षी डोलतो,
भिरभिरत्या श्रावण सरींमध्ये
भावनांचा पाऊस पडतो...

वाहणाऱ्या डोळ्यांना
श्रावण मिठीत धरतो,
अन् भिजलेल्या मनाला
आधार लेखानीचाच मिळतो...
-ललिता गवंडी

Group content visibility: 
Public - accessible to all site users