खरा लढा

Submitted by शार्दुल हातोळकर on 31 December, 2016 - 11:15

ते आले आणि वार केले
मी धडपडलो पण भ्यालो नाही
अपमान पचवु कसा म्हणत
उगा मद्य प्यालो नाही

केली त्यांनी अफाट निंदा
मी मुळीच बधलो नाही
दिखाव्याच्या प्रतिष्ठेसाठी
दिखाऊपणे वदलो नाही

उष्ण झळा येत गेल्या
कोमेजलो पण हरलो नाही
मनाला चटका बसला तरी
काळजामधे झुरलो नाही

सोसुन सारा ऊन-वारा
नियतीशीही झुंजत राहीन
खंबीरपणे उभा राहुन
पहाडाशीही टक्कर घेईन

आघात तर होतच राहतील
लोक हसुन मजा पाहतील
पाहणाऱ्यांना पाहु द्यावे
आपण पुढे चालत राहावे

रडणार नाही कुढणार नाही
त्याचाच भाव चढा असेल
आणि बेडरपणे पुढे जाणे
हाच खरा लढा असेल

-- शार्दुल हातोळकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users