Submitted by गवंडी ललिता on 30 December, 2016 - 01:07
बहिणाबाई चौधरी यांच्या “मन वढायं वढायं” कवितेवर केलेले विडंबन .................
मन गढूळ गढूळ
भ्रष्टाचाराचं पिकं
किती लावा नियम
फिरून येतं टेबलावर
मन थकलं थकलं
भ्रष्टाचाराच्या किती वाटा
घेती टेबलाखालून
लाखोंच्या किती ह्या नोटा
मन बोलतं बोलतं
कायद्याच्या किती भाषा
आता होतं टेबलावर
गेलं गेलं गजाआड
मना आनंद आनंद
त्याची झाली रे जीत
भ्रष्टाचाराचा मायबाप
त्याला कायद्याचा चाप
मन फुललं फुललं
अशी झाली कशी जादू
मन भरलं भरलं
त्यात सुखं हे साठलं
देवानि बघ कसं रे
हे माणूस घडवलं
भ्रष्टाचाराच्या जगात
डोळा सपानं पाहिलं..
-ललिता गवंडी,अकोले ७७४१०८५५६६
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाव ताई मस्तच ग...
वाव ताई मस्तच ग...