उत्तम प्रदेशीक चित्रपट सुचवा..!!

Submitted by morpankhis on 29 December, 2016 - 14:09

काहि दिवसांपुर्वी कन्नड चित्रपट "Thithi" पाहीला, खुप छान सिनेमा आहे..
त्या अगोदर "Ulidavaru Kandanthe" हा काहिसा Neo-noir प्रकारचा सिनेमा पाहिलेला.. तो पण खुपच आवडला..त्यातील "Gatiya Ilidu" गाण तर अप्रतीम ( सुरवातीला ५० वेळा तरी ऐकल / पाहिल ते गाण )...

Ozhivudivasathe Kali हा मल्याळम सिनेमा पण छान वाटला...

आपल्याकडे प्रदेशीक भाषेत उत्तम चित्रपट बनतात..पण माहिती नसल्यामुळे आपल्या पर्यंत पोहचत नाहीत.
तुम्हाला काही उत्तम प्रदेशीक चित्रपट माहीत असल्यास इथे सुचवावे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल्पोनिक (बंगाली) - बिपाशा बासु आहे. खुप छान काम केलेय तिने. काही वर्षांपुर्वी नेटफ्लिक्सवर होता. तिथे बरेच प्रादेशिक चित्रपट आहेत.

को नामाचा तमिळ सिनेमा मला आवडतो

Bommarillu - तेलुगु पाहिलाय का? नसेल तर बघाच बघा

मला अनेक सिनेमे सध्या आठवत नाहीयेत Uhoh

श्री Proud

स्वातीमुथ्थम, शंकराभरणम, सागरसंगमम

Mathilukal अदूर गोपालकृष्णन यांचा पुरस्कार विजेता मल्याळम चित्रपट. बहुधा मामुट्टीला पुरस्कार मिळालाय अभिनयासाठी. अदूर गोपालकृष्णन यांचे बरेच चित्रपट आहेत लिस्टीत. बघू कधी वेळ होतोय ते. (यू ट्ञूबवरून चित्रपट काढून टाकताहेत का हल्ली ?)

चेलुवि - कन्न्ड चित्रपट - बहुतेक गिरिश कर्नाड यांची कथा आहे.
संस्कृतमधला शंकराचार्य चित्रपट
मुधलवन - तमिळ - हिंदीतल्या नायकची मुळ कॉपी
बंगाली तर बरेच आहेत - ज्याचे हिंदी रिमेक आहेत
ताना रीरी - गुजराथी

Bommarillu - तेलुगु पाहिलाय का? नसेल तर बघाच बघा..
खुपच छान आहे. जेनेलिया तर मस्तच..!

मला मौनंरागम हा मुवी आवडला होता, कॉलेजात असताना टीव्हीवर बघितला होता. भाषा कुठ्ली आठवत नाही पण रेवती होती त्यात.

तेव्हा खूप प्रादेशिक बघितले होते, नावे आठवत नाहीत पण मामुंती, मोहनलाल, रेवती, रागिणी, कमल हसन, विष्णूवर्धन हि कलाकारांची नावं आठवतायेत. काही स्टोरीज पण आठवतायेत, त्यावरून हिंदी चित्रपट पण आले बरेच.

बंगाली अपूर संसार (शर्मिला टागोर पहिला मूवी बहुतेक), अमानुष आठवतायेत.