कल्पनेचे जग

Submitted by गवंडी ललिता on 29 December, 2016 - 02:53

कल्पनेचे जग

वास्तव्याच्या जगापेक्षाही
कल्पनेचे जग सुंदर असतं
तिथं कुणाचचं कुणाला बंधन नसतं
खळखळणाऱ्या झऱ्यासारखं मन पारदर्शक असतं
धो-धो वाहणाऱ्या धबधब्यासारखं स्वच्छंदाने कोसळत असतं
कल्पनेच्या जगात जगण्याची मजा काही वेगळीच असते
विचारांना बंधन नसते अन् जगण्याला मर्यादा नसते
म्हणूनच कल्पनेचे जग सुंदर असतं
तिथं कुणाचचं कुणाला बंधन नसतं
कल्पनेच्या जगात क्षितिज्याच्या पलीकडे बघता येते
अन् आकाशाला ही टेकता येते
थकले पाय जरी शिखर गाठता येते
माळरानावर फुलासारखं डोलता येतं
म्हणूनच कल्पनेचे जग सुंदर असतं
तिथं कुणाचचं कुणाला बंधन नसतं
नसला श्रावण तरी भिजता येतं
नसेल रातराणी तरी सुगंध दरवळतो
नभीचा चंद्रही हातात घेता येतो
चांदण्याचा गजरा केसात माळता येतो
म्हणूनच कल्पनेचे जग सुंदर असतं
तिथं कुणाचचं कुणाला बंधन नसतं
-ललिता गवंडी ,७७४१०८५५६६

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धो-धो वाहणाऱ्या धबधब्यासारखं स्वच्छंदाने कोसळत असतं
कल्पनेच्या जगात जगण्याची मजा काही वेगळीच असते
विचारांना बंधन नसते अन् जगण्याला मर्यादा नसते
म्हणूनच कल्पनेचे जग सुंदर असतं
तिथं कुणाचचं कुणाला बंधन नसतं
कल्पनेच्या जगात क्षितिज्याच्या पलीकडे बघता येते>>>>मस्तच हो ललिता ताई,
असं वाटतंय माझ्यासाठीच लिहिली आहे,मी स्वप्नातच जास्त असते म्हणून ...
खरच कल्पनेतलं जग किती सुंदर असतं..पण असं असलं तरीही वास्तवाशी सामना करावा लागतो नाहीतर तो माणूसच कसा??

कल्पनेच्या जगात क्षितिज्याच्या पलीकडे बघता येते >>>> अगदि खरय.

नसला श्रावण तरी भिजता येतं >>>>>>>> क्या बात है !!!! नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने याची आठवण आली.

खुप छान कविता.

धन्यवाद समृदधी...................

छान...