आहे का

Submitted by जयदीप. on 26 December, 2016 - 06:13

घेतली मी उगाच आहे का
भेटवस्तूच लाच आहे का

साम्य माझ्या तुझ्यामधे पुष्कळ
पण फरकही बराच आहे का

खर्च केलास वेळ अन् पैसा
प्रश्न होता तसाच आहे का

खूप आहे उशीर झालेला
धावतो मी उगाच आहे का

आपल्या आटपाट विश्वाला
फक्त माझाच जाच आहे का

छान आहे दिसत किती आता
चेहरा हा तुझाच आहे का

एक मोठी गुहा जिला म्हणतो
डोंगरातील खाच आहे का

खूप आहे हवा तरीसुद्धा
एक मी बुडबुडाच आहे का

जयदीप शरद जोशी
९८१९७९१०२३
२६/१२/२०१६

Group content visibility: 
Public - accessible to all site users