असं काही नसतं

Submitted by गवंडी ललिता on 23 December, 2016 - 06:44

आठवण काढावी असं काही नसतं
हृदयात तुलाच साठवलेलं असतं
सहवास मिळावा असं काही नसतं
आठवणीत जगावं हे सुख असतं
डोळे भरून यावे असं काही नसतं
श्रावणाचं येणं अचानकच असतं
वाट पाहणं तुझी असं काही नसतं
सांजवेळी मन हे उदासच असतं
वाट हिरवी हवी असं काही नसतं
सुखासाठी मन आसुसलेलं असतं
इंद्रधनुष्य पहावे असं काही नसतं
सूर्याला ही पावसात भिजावं वाटतं
फुलांनी फुलावं असं काही नसतं
सुगंधानी जीवन भारलेलं असतं
क्षितीजाने टेकावं असं काही नसतं
जीवनाचं सत्य मान्य कराव लागतं
-ललिता गवंडी,अकोले,७७४१०८५५६६

Group content visibility: 
Public - accessible to all site users