ती सध्या काय करते?

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 December, 2016 - 00:50

खालील दोन लिंकावर ट्रेलर बघू शकता. सतीश राजवाडेंचा नवा चित्रपट येतोय.
ती सध्या काय करते?
https://www.youtube.com/watch?v=UjyRveqOmJA
https://www.youtube.com/watch?v=0tljotdt5CI

टिक टिक वाजते डोक्यात गाण्याची आठवण करून देणारे,

हृदयात वाजे समथिंग,
सारे जग वाटे हॅपनिंग ..
असतो सदाऽऽ .. मी आताऽऽ .. ड्रिमिंग Happy

चित्रपटाबद्दल उत्सुकता वाटायला सतीश राजवाडे हे नाव पुरेसे आहे. कारण तेच ते आपले, मुंबई-पुणे-मुंबई ..
पण त्यापेक्षा जास्त ईंटरेस्टींग चित्रपटाचे नाव आहे..
थोडाश्या गुदगुल्या .. थोडी हुरहुर मनाला.. आठवणी जागवणारे आहे..
कधी शोधायचा प्रयत्न केला आहे,
ती सध्या काय करते? Happy

म्हटलं तर एकदा का हे शोधले, तर कदाचित तिच्या आठवणींतील गंमतच निघून जाईल.
पण तरीही तिची आठवण येताच हा किडा आपल्या डोक्यात वळवळतोच.
आजच्या फेसबूक ट्विटरच्या जगात ती सध्या कुठे आहे आणि काय करते हे शोधणे आणखी सोपे झाले आहे..
त्यामुळे अजूनही शोधले नसेल तर शोधा.. आणि ईथे आपले अनुभव पेस्टा Happy

Ti Saddhya Kay Karte.jpg

अवांतर - ज्युनिअर लक्ष्या अगदी काहीही श्री दिसतो
आणि मोठा झाल्यावर त्याला खरोखरची जान्हवी भेटते .. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन दिवस मायबोली बंदचा फायदा उचला आणि हा पिक्चर बघून या.
मला जायला जमले तर सोमवारी याच धाग्यावर येऊन आवडला असे लिहितो.

प्रत्येक प्रौढ पुरुषी मनात "ती"ची एक प्रतिमा असते. लहानपणी/तरुणपणी, कोणीतरी/कुठेतरी/कधीतरी भेटलेली. या तीची प्रतिमा धूसर किंवा स्पष्ट हे बघणार्यावर अवलंबून असते पण clarity कितीही विवादित असली तरी "ती" अस्तित्वात असते हे नक्की. प्रथितयश मराठी दिग्दर्शक सतीश राजवाडे या सदाबहार कल्पनेला घेऊन आपल्यासमोर आले आहेत. आर्या आंबेकर आणि अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांचे रुपेरी पडद्यावरील आगमन हि या चित्रपटाची त्याच्या विषयाप्रमाणेच एक खासियत. खरं तर हा विषयच इतका सदाबहार आहे कि कोणत्याही संवेदनशील मनाची पाकळी अलगद उलगडणारा. बरे तुमच्याजवळ संवेदनशील मन नसले तरी, तुमच्या मनात अलगद शिरून तुम्हाला भूतकाळात जाण्यास बाध्य करणारा हा विषय. त्यामुळे सगळेच अप्रतिम जुळून आलेल्या या चित्रपटाने रसिकांच्या मनात स्थान न मिळवले तरच नवल!!

अनुराग आणि तन्वी हे मित्र अन मैत्रीण. या दोघांची लहानपण-तारुण्य अन प्रौढपण यांची कहाणी म्हणजे 'ती सध्या काय करते' !! या कहाणीत अनुरागचे लहानपण, तारुण्य अन प्रौढपण यातल्या विविध कला दिग्दर्शकाने कौतुकास्पदरित्या टिपलेल्या आहेत. लहानगा अनुराग, तारुण्यातला अनुराग अन जरासा मोठा झाल्यावर mature झालेला अनुराग यांच्यातील फरक हा रसिकांना पटणे हे या कहाणीला प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यास आवश्यक होते, कितीही चांगला विषय असला अन या आघाडीवर अपयश असतं तर कपाळमोक्ष (तिकीटबारीवर) नक्की होता. हा फरक प्रेक्षकांनी विश्वास ठेवण्यालायक जुळून आलेला आहे.
अनुरागचे आणि तन्वीचे लहानपण हा या कहाणीच्या पाया बनविण्यासाठी आवश्यक घटक होता. हृदित्य राजवाडे आणि निर्मोही अग्निहोत्री यांनी अक्षरश: अप्रतिमरीत्या हे लहानपण उभे केलेले आहे. मध्यमवर्गीय अन अपेक्षांना बासनात न बांधणारे लहानपण जे सदैव सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते.सकारात्मक तर असते पण या सकारात्मकतेतही practicality ची कास न सोडणारे लहानपण. या अभिनेता वा अभिनेत्रीने दिग्दर्शकाच्या अपेक्षांना जरा चुकविले असत तर जो पाया कहाणीच्या मजबुतीसाठी आवश्यक होता तो ठिसूळ राहिला असता अन.......

वास्तविक बघता 'ती' च्या बद्दल हळवे असणारे कोणतेही 'त्या'चे मन ज्या वयात तिला बघते ते वय म्हणजे तारुण्य आणि म्हणूनच कदाचित पण या कहाणीत सगळ्यात नजाकतदार अन अन साकारण्यास कठीण हि भूमिका अभिनयची होती. अभिनयात नावाप्रमाणेच बऱ्याच ठिकाणी तो उजवा असल्याचे भासवून देतो प्रेक्षकांना. बरेच प्रसंग असे होते उदा. त्याचा कॉलेजचा पहिला दिवस, कॉलेजच्या फेयरवेलला तन्वीसोबतचे शेवटचे भांडण असे कि त्यात तो जर पुरला नसता तर दिग्दर्शकाला अपयशी हा शिक्का मिळवून देण्यात मुख्य हिस्सा त्याचा असता. पण तसे तर घडले नाहीच उलट मराठी चित्रपटसृष्टीला एका उत्कृष्ट अभिनेत्याने आपल्या आगमनाची चुणूक दाखवून दिलेली आहे हे मात्र नक्की.

त्याच्या भूमिकेप्रमाणेच तिची भूमिकाही इथे महत्वाची होती. ती सध्या काय करते (?/!) हा प्रश्नच मुळात एखाद्या त्याला पडेल जेंव्हा एखाद्या त्याला एखाद्या तिच्याबद्दल काहीतरी माहित असेल. ती एक मैत्रीण जी 'वीट' येण्याइतकी सवयीची. जिच्या असण्याची इतकी सवय एखाद्या त्याला व्हावी कि तिच्या नसण्याने तो जिवंतपणी नेस्तनाबूत व्हावा. आर्या आंबेकर ने अपेक्षेबाहेर उत्कृष्टरित्या हि भूमिका निभावलेली आहे हे नक्की. तिचे सौंदर्य हे एका मध्यमवर्गीय मराठी मुलीचे प्रतीक म्हणून इतके व्यवस्थितरीत्या शोभून गेलेले आहे कि कदाचित म्हणूनच बघणारा प्रत्येक 'तो' त्याच्या 'ती'ला शोधतो यात अन बघणारी प्रत्येक 'ती' आरसा. 'ती सध्या काय करते (?/!)' या शीर्षकातील ती म्हणजेच तरुणपणची. आणि म्हणूनच या चित्रपटाची खरी नायिका.

सुपरस्टार अंकुश चौधरी म्हणजेच आमचा 'दुनियादारीतला दिग्या' अन येथे प्रौढ अनुराग देशपांडे बनलेला आहे. प्रेयसीशी ब्रेक-अप झाल्यानंतर उन्मळून पडलेला पण नंतर स्वतःच स्वतःला सावरून कालांतराने एक यशस्वी व्यक्ती बनलेला 'तो'. प्रौढ तन्वी आहे तेजश्री प्रधान. ती हि तिच्या आयुष्यात मश्गुल पण त्याच्याशी सामना होताच ती हि थोडीशी अडखळते. अगदी क्षुल्लक भूमिका दोन्ही अप्रतिमरीत्या निभावल्यात दोघांनीही.

सतीश राजवाडेंचे दिग्दर्शन हे 'ती सध्या काय करते' (?/!) चे मुख्य यश. सतीश राजवाडे म्हणजे 'प्रेमकथांना अप्रतिमरीत्या हाताळणारा व्यक्ती' अशी एक प्रेक्षकांची मानसिकता मुंबई-पुणे-मुंबई (१/२) अन 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या दोन मुख्य यशानंतर त्यांनी अन झीने मराठी प्रेक्षकांची बनवून ठेवलेली आहे. पण या मानसिकतेत 'फक्त स्वप्नील जोशी बरोबर' या शब्दांना वगळण्यास प्रेक्षकांना बाध्य करण्यात राजवाडे यशस्वी होतात हे नक्की. वेवेगळ्या वयातल्या प्रेमकथांना हाताळताना एकाचवेळेस (म्हणजे एकाच तीन तासांच्या कथेत/पडद्यावर) फक्त भाव-भावनांना महत्व देऊन मराठी प्रेक्षकांना पचेल इतपत संयमितरित्या हाताळणे हे नक्कीच कठीण होते. मुळात तीनही वयातल्या या प्रेमकथांना हाताळताना त्या-त्या वयाप्रमाणे त्यांच्या भावनांना 'manipulate ' करणे हेच जोखमीचे होते. हे शिवधनुष्य व्यवस्थित पेलल्याबद्दल सतीश राजवाडेंचे कौतुक.

"ती" हा प्रत्येक "त्या"च्यासाठीचा नाजूक विषय. अगणित "त्या"च्यासाठी भळभळणारा अन काही मोजक्या “त्या”च्यासाठी आयुष्याचे सार बनलेला. अश्या या विचित्र गोष्टीत म्हणजे कश्या तर एका 'त्या'ला महत्व दिले तर दुसरा 'तो' नाराज व्हायचा अन तिच्यासाठी व्हायसेव्हर्सा. तर असल्या या नाजूक विषयावर लेखक सतीश राजवाडे अन पटकथा लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांचे विशेष कौतुक कारण आपापल्या भूमिकांना दोघेही यशवीपणे पुरेपूर निभावतात.

मराठीत आता खरोखर दिवस बदलले असून मागील वर्षीच्या 'कट्यार', 'नटसम्राट' अन सैराट नंतर यावर्षीची सुरवात करण्याचे अप्रतिम कारण असणाऱ्या 'ती सध्या काय करते' ला मी पाच पैकी पाच (५*) देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

काल जाऊन बघून आलो एकटाच.
छान पिक्चर आहे, आवडला.
एकदमच क्लास आहे असे नाही पण पुर्ण चित्रपटभर एक गोडशी फिलिंग जपणारा आहे.
बोर कुठे करत नाही. अगदीच कुठे आता होतोय की काय अशी शंका येऊ लागताच लागलीच एक चेहर्‍यावर हास्य फुलवणारा सीन येतो.
स्टोरी काय आहे असे कोणी विचारले तर सांगायला काही नाही. जी काय एक ओळीची आहे ती सांगण्यात मजा नाही. सांगितली तरी चित्रपटाची मजा कमीजास्त होणार नाही.
अंकुशचे निवेदन पुर्ण चित्रपटभर आहे. आणि ते हलकेफुलके झक्कास जमलेय. किंबहुना तोच चित्रपटाचा आत्मा आहे.
हृदयात वाजे समथिंग हे गाणे चित्रपटात फार छान वाटते. ईतरही बरी वाटतात.
लक्ष्याचा पोरगा आणि आर्या विशेष लक्षात राहतात. अंकुश निवेदनातून वा प्रत्यक्ष अभिनयातून पुर्ण चित्रपटभर असला तरी चित्रपट मुळातच त्या दोघांचा आहे हे चित्रपट संपल्यावर जाणवते. कारण लव्हस्टोरी त्या दोघांचीच आहे. दोघांनी कामही फार छान सहजतेने केले आहे आणि त्यांच्या भुमिका विश्वासार्ह केल्या आहेत. किंबहुना एकंदरीतच कोणीही ओवर अ‍ॅक्टींग वा अंडर अ‍ॅक्टींग करत डोक्यात गेलेले नाही. तरी तेजाब मधल्या मंदाकिनीसारखी यात एक मोहीनी आहे. ती फारशी आवडली नाही मला. पण त्याने काही फरकही पडत नाही. तरी सईलाच घेतले असते असा एक विचार मनात येऊन गेला.

शेवट मात्र माझ्या मनात प्रश्न उभा करून गेला. जो दाखवला आहे तो तितक्या सहजपणे प्रत्यक्ष आयुष्यात घडू शकतो का?

"ती सध्या काय करते" . अप्रतिम चित्रपट . 80ज मधे जन्मलेल्या प्रत्येकाने पहावा असा Happy
कितीतरी ठिकाणी नॉस्टेल्जिक करून जातो . अगदी शाळेतले नाही (शाळेत मी फारच सज्जन होतो . म्हणजे अजूनही आहेच , पण ..) तर कॉलेजमधले कितीतरी किडे/प्रताप आठवतात . अभिनय बेर्डेचा अन इतरांचा अभिनय ही मस्त . गाणीही छान अन ओघवती.
पण मला सगळ्यात जास्त आवडला तो शेवटचा मेसेज . एखाद्या नात्याची गिल्ट घेऊन जगण्यात अर्थ नाही . एखादी आठवण जर नकळत चेहर्यावर हसू आणत असेल , तर त्यात काय वाईट आहे ? इन फॅक्ट जेव्हा तो/ती आपापल्या आयुष्यात सुखी आहेत हे कळल्यावर जेव्हा आनंद होतो ,तेव्हाच त्या नात्याला योग्य क्लोजर (मराठी शब्द ?) मिळत ना ?
मीही शो संपल्यावर विचार करत होतो "त्या तिघी (की चौघी ) सध्या काय करत असतील ? Wink "

उर्मिला कानिटकर, स्मिता मोने आणि तेजश्री यांचा जो सीन आहे, त्यात उर्मिलाने डोळ्यांतूनच जो अभिनय केलाय, त्याला तोड नाही.
बाकी एकदा बघण्यासारखा सिनेमा नक्कीच आहे.

उर्मिला कानिटकर इराया हेअर ऑइल्च्या अ‍ॅड मधे काहीतरीच दिसतेय. खुप बारीक झालीये बहुतेक. गाल आत जातात बोलताना.

ते हृदयात वाजे समथिंग गाणं आपल्या अजिबात झेपलं नाही. (ट्रेलर बघितले). त्यामुळे चित्रपट न बघण्याचं ठरवतोय.

ते हृदयात वाजे समथिंग गाणं आपल्या अजिबात झेपलं नाही. (ट्रेलर बघितले). त्यामुळे चित्रपट न बघण्याचं ठरवतोय.
>>>>

हा काय नवीन प्रकार शोधून काढलाय. गाणे आवडले नाही म्हणून चित्रपटाला न जाण्याचा Happy

अहो गने अवदले नसेल तर थेतर मधे गने वजले कि पोप्चोर्न सुत्ति घ्या ना र॑व... पिच्चर नाहि बघयचा हे कसले कारन ?

पोप्चोर्न >>> मी ते पटकन पॉर्न असे वाचले आणि फारच गोंधळून गेलो. म्हणजे गाणे नाही आवडले तर तेवढ्या वेळात पटकन मोबाईलवर पॉर्न बघून घ्यावा वगैरे असे काहीसे आणि असा सल्ला मायबोलीवर बेधडक कोणी कसा देऊ शकतो. मायबोलीकरांच्या विचारांचेही उर्ध्वश्रेणीकरन झाले की काय वगैरे बरेच काही पटकन डोक्यात येऊन गेले.. Happy

पाहीला. ठिकठाकच आहे फार कौतुक करण्यासारखा वाटला नाही. शेवटमात्र चांगलाय. त्या सगळ्यांची घरं फारच छान दाखवली आहेत. फ्रँकली अशा घरात मराठी बोलणारी माणसं थोडी ऑडच वाटतात Wink

अन्याची बायको राधिका छान दिसते. आर्या काही खास नाही. दोनेक वर्षांपुर्वी तिचे फोटो पाहिलेले त्यात फार सुंदर दिसत होती पिवळा फ्लुरोसंट टॉप आणि पांढरी ट्राऊजर.

ती सध्या काय करते? हा चित्रपट खूप मस्त वाटला. खरंच सतीश राजवाडे नि प्रेमाचा दुसरा पार्ट खूप चांगला रंगवला आहे या चित्रपटा मध्ये. विशेषतः मला आर्य आंबेकर चा रोल खूप आवडला या चित्रपट मध्ये.

Pages