ती सध्या काय करते?

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 December, 2016 - 00:50

खालील दोन लिंकावर ट्रेलर बघू शकता. सतीश राजवाडेंचा नवा चित्रपट येतोय.
ती सध्या काय करते?
https://www.youtube.com/watch?v=UjyRveqOmJA
https://www.youtube.com/watch?v=0tljotdt5CI

टिक टिक वाजते डोक्यात गाण्याची आठवण करून देणारे,

हृदयात वाजे समथिंग,
सारे जग वाटे हॅपनिंग ..
असतो सदाऽऽ .. मी आताऽऽ .. ड्रिमिंग Happy

चित्रपटाबद्दल उत्सुकता वाटायला सतीश राजवाडे हे नाव पुरेसे आहे. कारण तेच ते आपले, मुंबई-पुणे-मुंबई ..
पण त्यापेक्षा जास्त ईंटरेस्टींग चित्रपटाचे नाव आहे..
थोडाश्या गुदगुल्या .. थोडी हुरहुर मनाला.. आठवणी जागवणारे आहे..
कधी शोधायचा प्रयत्न केला आहे,
ती सध्या काय करते? Happy

म्हटलं तर एकदा का हे शोधले, तर कदाचित तिच्या आठवणींतील गंमतच निघून जाईल.
पण तरीही तिची आठवण येताच हा किडा आपल्या डोक्यात वळवळतोच.
आजच्या फेसबूक ट्विटरच्या जगात ती सध्या कुठे आहे आणि काय करते हे शोधणे आणखी सोपे झाले आहे..
त्यामुळे अजूनही शोधले नसेल तर शोधा.. आणि ईथे आपले अनुभव पेस्टा Happy

Ti Saddhya Kay Karte.jpg

अवांतर - ज्युनिअर लक्ष्या अगदी काहीही श्री दिसतो
आणि मोठा झाल्यावर त्याला खरोखरची जान्हवी भेटते .. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<< साती फेबु वर नविन रिक्वेस्ट्स आल्यात का??> Lol

मला पण ' दुनिया मे ऐसा कहा किसका नसीब है' आणि 'क्या हुवा तेरा वादा' ही बचपनातील मुलांना अगदीच न झेपणारी गाणी आठव्ली.

सारेगमपा मधे लहान आर्या आंबेकर कसली गोड दिसायची. आता वेगळीच वाटते. तेजश्री जान्हवीच वाटते कायम.
आर्या मोठी होउन जान्हवी होत असेल तर मग निवड बरोबर आहे. दोघीही काकवाच दिसताहेत.

अंकुश तर काय आपलाच आहे Wink
आणि ज्यु बेर्डे पण छान आहे. आवडलाय.

पिच्चर बघणेत येईल.

जुदाईचं नाही.
भुलेगा दिल जिस दिन तुम्हे
वो दिन जिंदगीका आखरी दिन होगा

असं गातात. वादा, कसम, कमिटमेंट यु नो Happy

पण त्यात ती छोटी मुलगी तावातावाने विचारतेय क्या हुआ तेरा वादा. आत्ताच युट्यब वर बघितल. चित्रपटात काही संदर्भ असेल तर माहीत नाही.

कुठेही ऋ बाळाचाच कल्ला असतो >>> रीया किसी एक पे रैना , मागे लग्नाविषयी बोलत होतीस आता तर त्याला डायरेक्ट बाळचं केलस. Proud

मी कालच बघितला हा चित्रपट. चांगला आहे. थोडा वेगळा विचार देणारा आहे.

मी एका ग्रुपसोबत मुव्ही बघायला गेले होते. त्यात ज्यांना लग्नाआधी कोणी एक्स नव्हता/ नव्हती त्यांना एकदम भारी आवडला चित्रपट. आणि ज्यांना होता/ होती त्यांना ओकेच वाटला. आता यामागे काय गौडबंगाल आहे देव जाणो.

ती सध्या काय करते?
.
.
.
पण नक्की कोण 'ती'?
.
.
शाळेतल्या वर्गातली?
ट्यूशन क्लास मधली?
महाविद्यालयामधली?
आपल्या शेजारची?
मित्राच्या शेजारी राहणारी ?
बस / ट्रेन मध्ये दररोज दिसणारी?
गावी गेल्यावर भेटलेली?
कॉलेज मधली?
एफवाय वाली?
फेसबूकवाली?
ओर्कुटवाली?
कुणा नातेवाइकच्या लग्नात ओळख झालेली?
जुन्या ऑफिस मधली?
?
?
?
?
?
जाम confuse आहे. नेमकी कोण ती? .. Wink

रीया,
नकोच करू.

मी काय करू मग?
आय मीन सूनबाई मैत्रीण होऊ शकते पण मैत्रीणीला सून म्हणून आणायला जरा ऑडच वाटेल!

:d

उर्मिला कानेटकर राजवाडेंच्या असंभव मध्ये होती . त्या हवा येऊ द्या मध्ये राजवाडे भावुक झाले होते पहिल्या मुव्हीला सत्तावीस अवॊर्डस मिळूनही साडेचार वर्ष माझ्याकडे काम नव्हतं आणि त्यानंतर पहिला फोन " झी" कडून निखिल साने यांचा आला असंभव साठी इत्यादी इत्यादी Happy

रीया, येस्स बॉस चित्रपटात एक डायलॉग होता. दो कमजोर इन्सान मिलके कभी एक कामयाब जिंदगी नही बना सकते, असा काहीसा...
तसेच दोन स्वयंपाक न बनवता येणारे माणसे कधी स्वतःचे पोट भरू शकत नाहीत.
आपल्या दोघांना पाककलेत किमान पारंगत असलेलाच जोडीदार शोधावा लागणार.
दुर्दैवाने मला हे आधी लक्षात न आल्याने मी गर्लफ्रेंड शोधताना हे ध्यानात घेतले नाही. आणि आता मला दुसरी गर्लफ्रेंड शोधायलाही जीवावर आलेय. अफाट लोकसंख्येचा देश आहे. तरीही नोटाबंदीनंतर जशी एटीएम मिळायची मारामारी झालीय, तसेच गर्लफ्रेंड मिळण्याबाबत ईथे आयुष्यभराची मारामारी असते. त्यामुळे एक मिळालीय ती जपावी आणि ती जे शिजवून देईल ते मुकाट खावे.

काहीही हं ऋ, माझ्या गर्लफ्रेन्डला अजिबात स्वयंपाक येत नव्हता. लग्नानंतर जिद्दिने शिकली, आज सुगरण आहे, माझं पोटं मस्त भरतंय. स्वयंपाक बनवता न येणे हे गाता न येणे यासारखे नाही. पोट भरायचे म्हटले तर शिकावेच लागते. आणी प्रेमाखातर तर लोक डोंगर फोडून रस्ता बनवतात, स्वयंपाक किस खेत की मूली है, तुही शिकून घे!

{{{ हर्पेन | 5 January, 2017 - 17:44

अजून जरा प्राचीन....

बचपन की मोहब्बत को
बैजू बावरा (१९५२) ( माबोवरचा फक्त नंद्या असेल जन्मला त्यावेळी डोळा मारा )}}}

मी जुलै १९४५.

माझ्यापण पाचवीतल्या गर्लफ्रेंडला स्वयंपाक येत नव्हता.

आता येतो की नाही तिच्या नवऱ्याला विचारायला पाहिजे ..... Lol

#ती सध्या काय करते

त्यामुळे एक मिळालीय ती जपावी आणि ती जे शिजवून देईल ते मुकाट खावे. >>> भारतीय पुरुष आयतोबा का असतात , बायकोच्या जीवावर आयतं बसुन खाणारे Proud

मी काय करू मग? >>> किती घाई झालीय सुन आणायची. Proud

ती सध्या काय करते ?

तुम्ही इतरांच्या बायको बद्दल विचार करत असाल तर कोणी तुमच्या बायको बद्दल सुध्दा विचार करत असेल Biggrin

साती Lol

ऋन्मेष : तुझ्या दृष्टीने स्वयंपाक हा एकच मुद्दा आहे हे बघुन आनंद झाला... मला आणखी ही काही कन्सर्न्स आहेत Proud

बरं ते जाऊ द्यात..... रिव्ह्यु टाका

नानाकळा, मला अगदीच त्यातला समजू नका. पिंट्यासारख्या माफक अपेक्षा असलेल्या मुलाचे पोट मी समाधानकारकरीत्या भरू शकतो. पण आजकालच्या मुलींचे जीभेचे चोचलेही फार असतात. असो तो वेगळ्या धाग्याचा विषय आहे. चला कोणाचा तरी रिव्यू येऊ द्या.. कोणी बघितला नाही का पिचर?

ती सध्या काय करते ...ते बघून आले.फ्रेश चेहरे म्हणून मस्त वाटला.खरोखरचे कॉलेजियन वटतात अभिनय आणि इतर.उगाज तो स्वजो,अंकुशसारखी ४५ ची माणसे कॉलेजकुमार म्हणून दाखवली नाहीत.तर कथा म्हनून जीव छोटा असला तरी फुलवलाय छान.एकदा बघायला बरा आहे.

दुनियादारी आता शोले सारखा मराठीतील एक बेंच मार्क झालाय Happy

या आठवड्यात ईथे पब्लिक रिव्यू चांगला आला तर पुढच्या विकेंडला प्लान करायचा विचार आहे.
फक्त गर्लफ्रेंडला टाळणे जमायला हवे. तिच्यासोबत हा पिच्चर बघण्यात मजा नाही.

मि पाहिला.

खरच एकदा पहाण्या सारखा आहे.

तेजश्रि ते टिपिकल न हसता काम करु शकते हे पहाण्या साठि तरि पहा

सर्व बच्चे कंपनि मस्त

दुनियादारी आता शोले सारखा मराठीतील एक बेंच मार्क झालाय >>> Rofl

एखादी गोष्ट कशी असु नये यासाठी पण मापदंड असतात, बरं का रे बाळा.

महाराष्ट्रात तेजश्रीची टिव्ही मालिका ज्याने पाहिली नाही त्याच्यासाठी तेजश्रीला मोठ्या पडद्यावर बघणे सुसह्य असेल.
अन्यथा इतकी वर्ष जसे इराणीबाईला लोक बघुन कंटाळली तशी तेजश्रीला बघून बघून लोक जाम कंटाळली आहे.

Pages