ती सध्या काय करते?

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 December, 2016 - 00:50

खालील दोन लिंकावर ट्रेलर बघू शकता. सतीश राजवाडेंचा नवा चित्रपट येतोय.
ती सध्या काय करते?
https://www.youtube.com/watch?v=UjyRveqOmJA
https://www.youtube.com/watch?v=0tljotdt5CI

टिक टिक वाजते डोक्यात गाण्याची आठवण करून देणारे,

हृदयात वाजे समथिंग,
सारे जग वाटे हॅपनिंग ..
असतो सदाऽऽ .. मी आताऽऽ .. ड्रिमिंग Happy

चित्रपटाबद्दल उत्सुकता वाटायला सतीश राजवाडे हे नाव पुरेसे आहे. कारण तेच ते आपले, मुंबई-पुणे-मुंबई ..
पण त्यापेक्षा जास्त ईंटरेस्टींग चित्रपटाचे नाव आहे..
थोडाश्या गुदगुल्या .. थोडी हुरहुर मनाला.. आठवणी जागवणारे आहे..
कधी शोधायचा प्रयत्न केला आहे,
ती सध्या काय करते? Happy

म्हटलं तर एकदा का हे शोधले, तर कदाचित तिच्या आठवणींतील गंमतच निघून जाईल.
पण तरीही तिची आठवण येताच हा किडा आपल्या डोक्यात वळवळतोच.
आजच्या फेसबूक ट्विटरच्या जगात ती सध्या कुठे आहे आणि काय करते हे शोधणे आणखी सोपे झाले आहे..
त्यामुळे अजूनही शोधले नसेल तर शोधा.. आणि ईथे आपले अनुभव पेस्टा Happy

Ti Saddhya Kay Karte.jpg

अवांतर - ज्युनिअर लक्ष्या अगदी काहीही श्री दिसतो
आणि मोठा झाल्यावर त्याला खरोखरची जान्हवी भेटते .. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या सिनेमा साठी लहान वयातल्या प्रेमाची एक्झाम्पल सहीत इतकी भालमण होतेय..ते पाहुन दीपस्त यांचा सैराटच्या बाबतीतला प्रतीसाद आठवला... आणि त्या सिनेमावर लहान वयातल्या प्रेम ? (१९ वर्ष) दाखवल्या मुळे झालेली टिका आठवली ..

दीपस्त याचा मुद्दा वरकरणी तरी योग्य असा दिसतोय खरा....!!!

श्री तुझे मागच्या पानावरचे प्रतिसाद वाचून मी लोळले..... Rofl
नशिब घरी आहे, नाहितर हापिसातून माझी रवानगी थेट येरवड्यालाच झाली असती. Rofl

जान्हवी ही जान्हवीच वाटते. तिला वेगळ्या भुमिकेत स्विकारायची कल्पनाच सहन होत नाही. तिच्यासमोर ही इमेज ब्रेक करायचे आव्हान असेल.

अंकुश हा देखील अंकुशच वाटतो. कसाही दाखवा, कुठेही दाखवा.. आवडतोच Happy

तरीही मला वाटते ज्युनिअर लक्ष्मीकांत विशेष आकर्षण ठरणार. प्रोमोजमध्ये स्वप्नाळू चेहर्‍याचा असा छान वाटतो.

अर्चना सरकार | 5 January, 2017 - 23:32 नवीन
जान्हवी ही जान्हवीच वाटते. तिला वेगळ्या भुमिकेत स्विकारायची कल्पनाच सहन होत नाही. तिच्यासमोर ही इमेज ब्रेक करायचे आव्हान असेल.
अंकुश हा देखील अंकुशच वाटतो. कसाही दाखवा, कुठेही दाखवा.. आवडतोच
तरीही मला वाटते ज्युनिअर लक्ष्मीकांत विशेष आकर्षण ठरणार. प्रोमोजमध्ये स्वप्नाळू चेहर्‍याचा असा छान वाटतो.

>>>>>>

हो अगदी असच वाटल..!! अंकुश व ज्युनिअर बेर्डे अगदीच मस्त वाटतायत...

मला वाटत या सिनेमा मध्ये जान्हवी आणि आर्या ह्याची निवड थोडीशी चुकल्या सारखी वाटते ...
जान्हवी खुपच काकुबाई वाटते..!! आर्या ची अ‍ॅक्टिंग कशी आहे माहीत नाही पण प्रमो मध्ये ति सगळि कडे एकच एक्सप्रेशन देते अस वाटत !!!

आर्या नंतर जान्हवी होते. >>> मग पुढील चित्रपटात स्वप्निल जोशी सुध्दा थोडा मोठा होऊन मिलिंद सोमन अथवा रितिक रोशन होऊ शकतो.

>>>> आजच्या फेसबूक ट्विटरच्या जगात ती सध्या कुठे आहे आणि काय करते हे शोधणे आणखी सोपे झाले आहे.. त्यामुळे अजूनही शोधले नसेल तर शोधा.. आणि ईथे आपले अनुभव पेस्टा स्मित <<<<

नाही सापडले कोणी... Sad एक दोनच सापडल्या, बाकी बर्‍याचजणींचा काहीच थांगपत्ता नाही लागत, अगदी सिन्स फ्रॉम ज्युनियर केजी, ते कॉलेज संपवुन नंतर काढलेल्या बेकारीतल्या आयुष्यात भेटलेल्या/दिसलेल्या/आवडलेल्या.... वगैरे वगैरे....! कोणी कोणीच सापडले नाही..!
माझ्या दु:खात सहभागी व्हा... Proud

१०० Happy

साती | 6 January, 2017 - 21:01
प्रोमोनीच वेडं केलंय बाई लोकांना.>>>

नाही हा.... अस कोणी वेड नाही होत प्रोमोनी... Happy

अरे..एवढी चर्चा झाली या सिनेमाची या धाग्यावर.. कोणी पाहीला कि नाही मग आजुन..!!

अत्ताच तुनळी वर रीव्हिव्ह्यु पाहिला...अ‍ॅव्हरेज आहे म्हणे सिनेमा...!!!

मोरपंखी, कूठला रिव्ह्यू लिंक द्या...
कारण डिअर जिंदगीच्या वेळी मी पब्लिक रिव्यू बघत डिसीज घेऊया म्हटले आणि शोधाशोध केली तर दोन टोकाचे रिव्यू पाहिलेले..
एक वर्ग ज्यांना मिथुन आणि रजनीकांतचे पिक्चर आवडावेत तो या चित्रपटाला शिव्या घालत होता..
तर एक वर्ग जो मला माझ्या विचारांचा वाटला तो चित्रपटाला ऑस्सम बोलत होता..
मी त्यांच्यावर भरवसा ठेवून चित्रपट बघायला गेलो आणि मला आवडला Happy

ऋन्मेऽऽष |

तुनळी वर "Ti sadhya kay karate review" असे शोधा पहिलिच लिंक आहे.. पॉपकोर्न कि काय अस आहे ते..

अदिति | 7 January, 2017 - 00:41 नवीन
आम्हाला अनुभव आलेत! <<< साती फेबु वर नविन रिक्वेस्ट्स आल्यात का??

>>>

Lol Lol Lol

मला ट्रेलरवर काही खास वाटला नव्हता पण रिव्ह्यूज खूपच चांगले येत आहेत.
आमच्या इथे शो झाला तर बघणार!

बाय द वे, ऋन्मेष तू नेहमीच मराठी चित्रपटांसाठी धागे काढतोस एकूणात सपोर्टमध्ये असतोस हे बघितलंय. त्याबद्दल धन्स व कीप इट अप Happy

बाय द वे, ऋन्मेष तू नेहमीच मराठी चित्रपटांसाठी धागे काढतोस एकूणात सपोर्टमध्ये असतोस हे बघितलंय. त्याबद्दल धन्स व कीप इट अप स्मित
>>>>>>

सनव हो, अचूक निरीक्षण Happy
हे मी नेहमीच करतो. एकदोन उशीरा पाहिलेल्या चित्रपटांबद्दलही आता काय लिहून फायदा असे विचार न करता धागे काढलेत. मराठी संकेतस्थळाचे व्यासपीठ जर मराठी चित्रपटावरच्या चर्चेसाठी वापरले जाणार नसेल तर काय अर्थ आहे. ईतके सिंपल लॉजिक आहे Happy

साती फेबु वर नविन रिक्वेस्ट्स आल्यात का?? Lol

मला एका मुलीची खरेच आलीय, आजच एक्सेप्टही केले आणि विसरून गेलो. शाळेतील मैत्रीण आहे.. होती.. हिला अचानक मी कुठे आठवलो असे ती रिक्वेस्ट पाहून क्षणभर खरेच वाटलेही.. पण हा अँगलही असू शकतो हा विचारच केला नाही Happy

तुनळी वर "Ti sadhya kay karate review" असे शोधा पहिलिच लिंक आहे.. पॉपकोर्न कि काय अस आहे ते..
>>>
तुम्ही सांगायच्या आधी माझे ते शोधून पाहून ही झाले.. पण त्यात चांगले वाईट दोन्ही म्हटलेय.. मुख्य म्हणजे अंकुश आपल्या जागा शोधून भाव खाऊन जातो म्हटलेय.. सुरुवातीच्या बालकांच्या जोडीबद्दल कौतुक केलेय... शेवट काहीतरी वेगळा विचार करायला लावणारा मस्तय म्हटलेय.. मला वाटते हे पुरेसे ठरावे.. शेवटी आपल्या मातृभाषेतला चित्रपट बघण्यात एक एक्स्ट्रा मजा असतेच.

'तो सध्या काय करतो' असा मूवी काढण्याचं वचन घेतलंय ना मिसेस राजवाडे यांनी मिस्टर राजवाडे यांच्याकडून, च ह ये द्या मध्ये म्हणाल्या त्या. त्यामुळे येणार आहे तो मूवी पुढे.

प्रोमोजमध्ये अभिनय बेर्डे आणि अंकुश आवडले. ती लहान दोघं पण आवडली. उर्मिला कानेटकर पण आहे मुवीत.

Pages