ती सध्या काय करते?

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 December, 2016 - 00:50

खालील दोन लिंकावर ट्रेलर बघू शकता. सतीश राजवाडेंचा नवा चित्रपट येतोय.
ती सध्या काय करते?
https://www.youtube.com/watch?v=UjyRveqOmJA
https://www.youtube.com/watch?v=0tljotdt5CI

टिक टिक वाजते डोक्यात गाण्याची आठवण करून देणारे,

हृदयात वाजे समथिंग,
सारे जग वाटे हॅपनिंग ..
असतो सदाऽऽ .. मी आताऽऽ .. ड्रिमिंग Happy

चित्रपटाबद्दल उत्सुकता वाटायला सतीश राजवाडे हे नाव पुरेसे आहे. कारण तेच ते आपले, मुंबई-पुणे-मुंबई ..
पण त्यापेक्षा जास्त ईंटरेस्टींग चित्रपटाचे नाव आहे..
थोडाश्या गुदगुल्या .. थोडी हुरहुर मनाला.. आठवणी जागवणारे आहे..
कधी शोधायचा प्रयत्न केला आहे,
ती सध्या काय करते? Happy

म्हटलं तर एकदा का हे शोधले, तर कदाचित तिच्या आठवणींतील गंमतच निघून जाईल.
पण तरीही तिची आठवण येताच हा किडा आपल्या डोक्यात वळवळतोच.
आजच्या फेसबूक ट्विटरच्या जगात ती सध्या कुठे आहे आणि काय करते हे शोधणे आणखी सोपे झाले आहे..
त्यामुळे अजूनही शोधले नसेल तर शोधा.. आणि ईथे आपले अनुभव पेस्टा Happy

Ti Saddhya Kay Karte.jpg

अवांतर - ज्युनिअर लक्ष्या अगदी काहीही श्री दिसतो
आणि मोठा झाल्यावर त्याला खरोखरची जान्हवी भेटते .. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या शाळेत तर चौथीपासून चिडवणं होतं. अगदी भास्कराचार्यांच्या काळापासून हे आहे, असं समजा. Happy

भास्कराचार्यांच्या काळात मुलगी चौथीत जायच्या वयाची होईस्तोवर लग्न होऊन जात असे.
लीलावतीचं लग्नं कधी झालं माहित्येय ना?
घटिकापात्राशी खेळत बागड्त मुहूर्त चुकवलीन लग्नाचा पोरीने.

मी सहावीला असताना मराठीच्या घटक चाचणीला 'मित्रास पत्र लिहायला सांगितलेले. मी मैत्रीणीला लिहिलेले. बाईंनी मला ते वर्गासमोर वाचायला लावलेले. आधी त्यांनी स्वत:च वाचायला घेतलेले. पण त्य शब्दाशब्दाला अडखळू लागल्या. म्हणजे तसले काही शब्द वापरले नव्हते. पण माझे अक्षर न अडखळता मलाही वाचता येत नाही.

माझे अक्षर न अडखळता मलाही वाचता येत नाही >> म्हणून टाईपरायटर वापरायचे. पुढच्या वेळेस ऑफिसच्या कंम्पुटरवरून प्रिंट काढ. तीला ही सोपे जाईल.

भास्कराचार्यांच्या काळात मुलगी चौथीत जायच्या वयाची होईस्तोवर लग्न होऊन जात असे.
>>>>
हा बालविवाहाचा काळ नेमका कधी आला. रामायण महाभारतात तर सीता, द्रौपदी, कुंती वगैरे वयात आल्यावरच त्यांची लग्ने लावली जायची. मग अचानक हे बालविवाहाचे फॅड कधी सुरू झाले?

दीपस्त, मी ते शाळेतल्या गमतीजमती सांगतोय. कॉलेजला गेल्यावर ऑनलाईन देवनागरी चॅटींगवर पोरगी पटवू लागलो. काही मी पटवल्या, काहींनी मला पटवले. काहींबाबत ती सध्या काय करते हा विचार मी करतोय, तर काही जणी तो सध्या काय करतो हा विचार माझ्याबाबत करताहेत. असं धाग्याच्या अनुषंगानेच बोलूया ..

रामायण महाभारतात तर सीता, द्रौपदी, कुंती वगैरे वयात आल्यावरच त्यांची लग्ने लावली जायची. मग अचानक हे बालविवाहाचे फॅड कधी सुरू झाले? >>.
ते गेले आणि फॅड आले

दक्षिणाताई, आता प्रोमो चा ओवरडोस (समजा प्रत्येक ३ मि ला २० से चा प्रोमो अस काही) आणि नन्तर जेंव्हा प्रिमियर शो म्हणून झी वर दाखवतील तेंव्हा प्रत्येक ३ मि ला २० से ची जाहीरात दाखवतील....इरिटेशन लेवल टिकवून ठेवतात झी वाले !!

अरे किती तरी हिंदी सिनेमातून लहान मुलांची प्रेमप्रकरण दाखवली आहेत. मग ती वयात आल्यावर प्रेमाचा त्रिकोण वगैरे वगैरे . सैराट वर पण हीच टीका झाली होती शाळेतलं प्रेमप्रकरण म्हणून अर्थात ती दोघं या जोडीपेक्षा मोठी दाखवली आहेत पण अशी शाळेपासून प्रेमात पडणारी मुलं असतात . फँड्री मधला जब्या तरी काय शाळेतच दाखवलाय ना आणि बालक पालक ?
१३-१४ वयापासूनच आकर्षण वाटायला पाहिजे असं काही नाहीये. काही मुलं लवकर वयात येतात. आमच्या शाळेतली एक जोडी चौथी पासून प्रेमात होती आणि नंतर त्यांनी लग्न केलं . असही असत /असू शकत Happy

हो ना!
तो सनी देओलचा होता ना बेताब सिनेमा!

ये बचपन क प्यार अगर खो जाएगा
दिल कितना खाली खाली हो जाएगा
तेरे खयालोंसे इसे आबाद करेंगे

जब हम जवां होंगे जाने कहां होंगे
लेकीन जहां होंगे वहा फरियाद करेंगे , तुझे याद करेंगे.

हा सिनेमा मी फक्त ४-५ वर्षांची असताना आलेला.
आता मागच्या ३५ वर्षांत अचानक लहान पोरांचं प्रेम उथळपणा का झाला बै?

अजून जरा प्राचीन....

बचपन की मोहब्बत को
बैजू बावरा (१९५२) ( माबोवरचा फक्त नंद्या असेल जन्मला त्यावेळी Wink )

बचपन की मोहब्बत को दिल से ना जुदा करना
जब याद मेरी आए मिलने की दुआ करना

पण चित्रपटात जे दाखवतात ते समाज करतो की समाजात जे दिसते ते सिनेमात दाखवतात

आपण अभिनय बेर्डे साठी पहाणार ...चित्रपट पाहण्यासाठी राजवाडे हे नावच काफी आहे पण अभिनय चा पहिला चित्रपट व लक्ष्या वर असलेले प्रेम त्यामुळे अवश्य बघणार

मग १९५१ चा दीदार बघा.
'बचपन के दिन भुला न देना, आज हंसे कल रूला न देना'

ओ विषय बदलू नका, तुमचं गाणं बचपन विषयी आहे, प्रेमाविषयी नाहीये.

ओ विषय बदललेला नाही.
ते बचपनचे प्रेमाचे दिनच भुलवू नये म्हणून.
नंतर त्या मुलीचे (नर्गिसचे)बाबा तिला दुसरीकडे घेऊन जातात, मुलगा मोठा होऊन आंधळा होतो नी काय काय.

जुना दो फूल बघा (१९५०-१९५५) बहुतेक

"बचपन का तोरा मोरा प्यार निभाना देखो न भूल जाना"
८-१० वर्षाचे मुलगा-मुलगी गातायत.

ती अचानक निघून गेल्यावर तो मुलगा एकटाच डोंगरात फिरत गातो
"हाये घबराये रे तेरे बिन मेरा मन"
Happy

देवर बघा (१९६५)
परत ८-१० वर्षाचे मुलगा-मुलगी गातायत
"दुनियामे ऐसा किसका नसीब है, नसीबवाले है हम प्यार जिनके करीब है"

Happy

चौथी-पाचवीतल्या मुलांची प्रेमप्रकरण नसतातच, असं का समजतायत बरं लोक.>>> +१, अरे ३-४ थी त तुम्ही लोकं डॉक्टर डॉक्टर खेळले नाही का ? बर्‍यापैकी समजतं ३-४ थी त पण . Proud

श्री सहमत आहे,
मला डॉक्टर डॉक्टर ऐवजी घर घर खेळायला मजा यायची. नवरा बायको आणि ऊरलेली त्यांची पोरं. पहिली दुसरीत असताना मी पोरांची भुमिका पार पाडायचो. तिसरी पासून बाबांचे रोल मिळायला सुरुवात झाली. तर त्या वयात मला भातुकलीच्या खेळातील का असेना, बायको कशी हॅण्डल करायची याची अक्कल आलेली असे बोलू शकतो.

मला 'क्या हुआ तेरा वादा' आठवलं होतं. पण त्यापेक्षा जुनी उदाहरणं इथे आल्यामुळे काही लिहीलं नाही Proud Wink

मला 'क्या हुआ तेरा वादा' आठवलं होतं. >>> मला यावरून मुकद्दर का सिकद्दर मधील मेमसाब आठवली.. तेरे बिना भी क्या जीना .. किती ते निर्मल आणि सच्चे प्रेम लहानपणाचे.. आणि मोठा होताच अमिताभ रेखाकडे गेला.

जे बोलतात लहान पयात प्रेम होत नाही त्यांच्यासाठी मला गोविंदाचे एक गाणे आठवले,

वो कहते है हमसे, ये उमर नही है प्यार की..
नादा है वो क्या जाने.. कब कली खिली बहार की .. Happy

सोबत गोविंदा आणि किमीचा डॅन्स बघाल ईथे - https://www.youtube.com/watch?v=_wH5nxKj-Vk

श्री, ईथे मी स्वतःला बायकोच्या रोलमध्ये इमॅजिन करून मैदानात ऊतरतो Happy

Pages