ती सध्या काय करते?

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 December, 2016 - 00:50

खालील दोन लिंकावर ट्रेलर बघू शकता. सतीश राजवाडेंचा नवा चित्रपट येतोय.
ती सध्या काय करते?
https://www.youtube.com/watch?v=UjyRveqOmJA
https://www.youtube.com/watch?v=0tljotdt5CI

टिक टिक वाजते डोक्यात गाण्याची आठवण करून देणारे,

हृदयात वाजे समथिंग,
सारे जग वाटे हॅपनिंग ..
असतो सदाऽऽ .. मी आताऽऽ .. ड्रिमिंग Happy

चित्रपटाबद्दल उत्सुकता वाटायला सतीश राजवाडे हे नाव पुरेसे आहे. कारण तेच ते आपले, मुंबई-पुणे-मुंबई ..
पण त्यापेक्षा जास्त ईंटरेस्टींग चित्रपटाचे नाव आहे..
थोडाश्या गुदगुल्या .. थोडी हुरहुर मनाला.. आठवणी जागवणारे आहे..
कधी शोधायचा प्रयत्न केला आहे,
ती सध्या काय करते? Happy

म्हटलं तर एकदा का हे शोधले, तर कदाचित तिच्या आठवणींतील गंमतच निघून जाईल.
पण तरीही तिची आठवण येताच हा किडा आपल्या डोक्यात वळवळतोच.
आजच्या फेसबूक ट्विटरच्या जगात ती सध्या कुठे आहे आणि काय करते हे शोधणे आणखी सोपे झाले आहे..
त्यामुळे अजूनही शोधले नसेल तर शोधा.. आणि ईथे आपले अनुभव पेस्टा Happy

Ti Saddhya Kay Karte.jpg

अवांतर - ज्युनिअर लक्ष्या अगदी काहीही श्री दिसतो
आणि मोठा झाल्यावर त्याला खरोखरची जान्हवी भेटते .. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेरे संग जोकर हा कुठला चित्रपट

तेरे संग हा सतीश कौशिकचा, तोही जुनो वरून ढापल्यासारखा वाटतोय,

राजकपूरचा नुसता जोकर

नुसता जोकर नाही. तेरा मेरा जोकर की मरा तेरा जोकर की तेरे नाम जोकर असेच काहीतरी होते. माझ्या जन्माचा आधीचा पिक्चर होता.

हो येस्स. मी आताच गूगाळले. राजकपूर प्लस जोकर = मेरा नाम जोकर आले. नाव विसरलो पण कधीतरी लहानपणी पाहिलेल्या चित्रपटातील बालकलाकारांचे कारनामे नाही विसरलो. तर मुद्दा हाच, ज्याचे श्रेय त्याला द्या Happy

ऋन्मेऽऽष | 4 January, 2017 - 23:50 नवीन
नाव विसरलो पण कधीतरी लहानपणी पाहिलेल्या चित्रपटातील बालकलाकारांचे कारनामे नाही विसरलो.

>>>>
कुठच कुठ तुलना राव...
त्या मधे adolescent मुलाच ..एका स्त्रि बाबतीत infatuation, आकर्षण दाखवलय...

ती सध्या.. मध्ये ७ / ८ वर्षाच्या मुला मुलिचा हात हात घालुन प्रेम प्रकरण आहे अस दिसतय...!!!

मी तर म्हणतो..आजुन एक स्टेप मागे जाउन..सरळ रांगतानाच यांच एकमेकां वर प्रेम आहे हे पण का नाही दाखवल..!!!

मोरपंखी.
ईथेही तेच आकर्षण दोन्ही कडून आहे कारण दोन्ही कडे लहान मुले आहेत ईतकेच.
लहान मुलांना पंचवीस वर्षांच्या स्त्रियांबद्दल आकर्षण वाटले तर ते गैर नाही नॉर्मल, पण आपल्याच वयाच्या मुलीबद्दल वाटले तर ते गैर असे का?

ऋन्मेऽऽष | 5 January, 2017 - 00:08 नवीन
लहान मुलांना पंचवीस वर्षांच्या स्त्रियांबद्दल आकर्षण वाटले तर ते गैर नाही नॉर्मल, पण आपल्याच वयाच्या मुलीबद्दल वाटले तर ते गैर असे का? >>>>

हे मान्य आहे.. पण लहान म्हणजे किती... भिन्नलिंगी जोडिदार याच आकर्षण हे adolescent वयात सुरु होत..

adolescent वय म्हणजे ७/८ नाही अस मला वाटत..

adolescent वय जे १३ वा १४ पासुन सुरु होत तेव्हा अस आकर्षण वाटयला लागत.. अस मला तरी वाटत...

वात आणलाय या सिनेमाच्या जाहिरातींनी.
झी मराठी एच डी वर तर खचाखच क्षणाक्षणाला याच सिनेमाच्या जाहिराती.
प्रोमोज चा ओव्हरडोस, कशाला सिनेमा ओस पडतोय मग?

झी ने जाहिरात केलेला एक पण सिनेमा पडला नाहिये बहुधा..

फॅन्ड्री, सैराट, काकस्पर्श, आता हा वात....
ज्युनियर प्रियकर आणि प्रेयसी हे फॅड अजून किती वर्ष पहावे लागणार आहे मराठीत देव जाणे. Sad

मी बघतो पुन्हा ट्रेलर, ७-८ वर्षांत काय करताना दाखवलेय.
मागे मी कुठेतरी यावर वाचलेले की मुलामुलींना लहानपणापासून भिन्नलिंगी आकर्षण असते, फक्त ते व्यक्त करायचे किंवा बाहेर पडायचे मार्ग वयानुसार बदलतात.

पण एक नक्की सांगतो, जिथे चौथीपर्यंत मुलामुलींची शाळा एक असते आणि पाचवीला वेगळी होते तिथे अचानक मुलांना मुलींबद्दल आकर्षण वाटायला सुरुवात होते. चिडवाचिडवी जोड्या जुळवणेही सुरू होते.

दक्षिणा | 5 January, 2017 - 00:26 नवीन
फॅन्ड्री, सैराट, काकस्पर्श, आता हा वात....
ज्युनियर प्रियकर आणि प्रेयसी हे फॅड अजून किती वर्ष पहावे लागणार आहे मराठीत देव जाणे. >>>>

काही पण काय.. सैराट मध्ये वय १९ आहे.. या वयात नाही पडनार प्रेमात तर केव्हा...
फॅन्ड्री ( त्या मध्ये वय १५ ते १६ आहे..) हि लव्हस्टोरी नाही !!!

तस पण सिनीअर सिटीझन लव्हस्टोरी तरी कुठ चालल्या ...तो "लाल इश्क, YZ " etc..

ऋन्मेऽऽष | 5 January, 2017 - 00:30
पण एक नक्की सांगतो, जिथे चौथीपर्यंत मुलामुलींची शाळा एक असते आणि पाचवीला वेगळी होते >>>

हा काय प्रकार आहे.. खरच अस पण आहे कि काय..?

प्रोमोज चा ओव्हरडोस, कशाला सिनेमा ओस पडतोय मग?
>>>
बरेच अंशी असहमत
मराठी चित्रपटांना हे लागू नाही होत. म्हणजे नुसते जाहीरातीवर चित्रपट लोकांपर्यंत पोहोचू शकतो पण ईथे कोणी सलमान नाही जो चित्रपट बंडल आहे हे समजायच्या आतच तीन दिवसातच गल्ला जमवून देईन. मराठी चित्रपट हिट जायला काही आठवडे चालावा लागतो. चांगला असेल तरच सैराट आणि दुनियादारीसारखा परदाफाड चालतो, नाहीतर पर्दाफाश होतो.

ऋन्मेऽऽष | 5 January, 2017 - 01:17 नवीन
प्रोमोज चा ओव्हरडोस, कशाला सिनेमा ओस पडतोय मग?
>>>
बरेच अंशी असहमत
मराठी चित्रपटांना हे लागू नाही होत. म्हणजे नुसते जाहीरातीवर चित्रपट लोकांपर्यंत पोहोचू शकतो पण ईथे कोणी सलमान नाही जो चित्रपट बंडल आहे हे समजायच्या आतच तीन दिवसातच गल्ला जमवून देईन. मराठी चित्रपट हिट जायला काही आठवडे चालावा लागतो. चांगला असेल तरच सैराट आणि दुनियादारीसारखा परदाफाड चालतो, नाहीतर पर्दाफाश होतो. >>>>

ऋन्मेऽऽष तुझ्या मताशी पुर्ण सहमत...!!

मोरपंखीस यात काय नवल. मी अशी पाचवीची मुले पाहिली आहेत. आणि त्यामागे हे कारण आहे. माझे आणि माझ्या गर्लफ्रेंडचे आतापासूनच प्लानिंग आहे की आम्हाला मुलगा होवो वा मुलगी त्याला आम्ही को एड म्हणजे मुलेमुली एकत्र शिकणार्‍या शाळेतच टाकणार.

दक्षिणा , संपूर्ण प्रतिक्रियेला +१
सुरुवातीला ज्यू.बेर्डे, आर्या, दोन्ही कानापर्यंत ओठ ताणून हसणारी जानू , स्टाइल आयकॉन अंकूश फ्रेश वाटले... तेच तेच दाखवून आता मात्र ओवरडोस झालाय !
होसुमियाघ चा दुष्परिणाम म्हणजे, ती तेजश्री कधीही, कुठल्याही तिच्या नव्या जुन्या सिनेमात दिसली, की कोणत्याही क्षणी 'काहीही हां श्री ' म्हणते की काय अशी भिती वाटते !

पण एक नक्की सांगतो, जिथे चौथीपर्यंत मुलामुलींची शाळा एक असते आणि पाचवीला वेगळी होते >>> आमच्या शाळेत सातवी पर्यंत मुला-मुलींचे वर्ग वेगळे होते

मलातरी ज्यु. बेर्डे आणि प्राजक्ता माळीत (जुयेरेगा फेम मेघना) भारी साम्य वाटले. तो हसतो तेव्हा खूपसा तिच्यासारखाच वाटला चहयेद्या मधे. लव्हस्टोर्या नको बाबा आता बास.

रच्याकने , तो सगळ्यात छोटा मुलगा , सतिश राजवाडेचा मुलगा आहे .

अभिनय बेर्डे आवडला प्रोमो मध्ये . केस तर भारीच आहेत त्याचे.
आर्या ठिकठाक .

आमची शाळा पण को-एड होती. पाचवी-सातवीपासूनच चिडवणं वगैरे चालु व्हायचं .
हे काही नविन नाहिये आमच्या पीढीला , पण मुदाम चित्रपटात पहाताना जरा विचित्र वाटतं ईतकच. Happy

हे काही नविन नाहिये आमच्या पीढीला , पण मुदाम चित्रपटात पहाताना जरा विचित्र वाटतं ईतकच. स्मित >> अगदी माझ्या मनातल बोलल्लात

लहान मुलांची प्रकरणं दाखवण्याबद्दल माझं निरि़क्षणः ह्या मराठी चित्रपटांचे दर्शक साधारण तीशीच्या आसपास वाले जास्त प्रमाणात आहेत. ह्यांची बालपणं अशीच साधारण गेली आहेत. ९० च्या दशकातल्या प्रेमपटांचा परीणाम लहान मुलांवर (साधारण ११ च्या वयापुढच्या) होत होताच, काही कळत नसले तरी उगाच क्रश असणे होते. मी दहावीत असतांना (१९९७) सहावी-सातवीतली पोरं एकमेकांना चिठ्ठ्या देत असतांना बघितलंय...

हेच सगळं वातावरण नव्या पिढीचे दिग्दर्शक नॉस्टेल्जियाला हात घालण्यासाठी दाखवत आहेत असे माझे मत आहे. हा नॉस्टेल्जियाही असा हळवा व नेवरबिफोरऑनस्क्रिन आहे. आपल्यासारख्यांचे आयुष्य दाखवले जाणे भावते.

मला वाटते, दिगदर्शक निर्मातेही साधारण त्याच वयातले असल्याने दर्शकांशी सूर जुळत असेल...

सैराटच्या वेळी संस्कृती रक्षक लहान मुलांचे प्रेम दाखवतात म्हणून बोंबाबोंब करत फिरत होती.
आता संस्कृती रक्षक "राजवाड्यांचा" चित्रपट म्हणून सैराटहून लहान मुलांची प्रेमप्रकरण दाखवल्यावर मात्र तोंडावर बोट ठेवून चिडीचूप बसली ?

सैराटवरचा धागा नजरेखालुन घातल्यावर हौदोस लक्षात आला.

सैराटच्या वेळी संस्कृती रक्षक लहान मुलांचे प्रेम दाखवतात म्हणून बोंबाबोंब करत फिरत होती.
आता संस्कृती रक्षक "राजवाड्यांचा" चित्रपट म्हणून सैराटहून लहान मुलांची प्रेमप्रकरण दाखवल्यावर मात्र तोंडावर बोट ठेवून चिडीचूप बसली ?

सैराटवरचा धागा नजरेआड घातल्यावर हौदोस लक्षात आला.

>>> येक नंबर काडी टाकलीय. लगे रहो.

ओ लोकांनु, आधी सिनेमा बघा मग काय दाखवलंय त्यावर बोला. नुसते प्रोमो बघून कशाला बोंबाबोंब करताय??

नानाकळा + 1.
चौथी-पाचवीतल्या मुलांची प्रेमप्रकरण नसतातच, असं का समजतायत बरं लोक. आम्ही अगदी लहान असल्यापासून हे चालूच आहे.. आता तर ब्रेक अप अन् लगेच दुसरं प्रेमप्रकरण हे पण याच वयात होतंय.

>>> येक नंबर काडी टाकलीय. लगे रहो.>> +1. आग भडकणार वाटतंय.

काहीही असो, उगिचच इतकं विश्लेषण केलं गेलं माझ्या पोस्टिच्चं.

प्रोमोज चा ओव्हरडोस होतोय इतकंच.

नानाकळा, प्रतिसाद आवडला.

लहान मुलांमध्ये ( लहानची व्याख्या ?) हे असं नसतंच असं काही नाही. मी स्वतः पाचवीत असताना एका मुलीला चिठ्ठी लिहायचा प्रयत्न केला होता. Wink
त्यामुळे मला या चित्रपटांचा ओव्हरडोस वाटण्याऐवजी जुन्या आठवणी ताज्या होऊन अजूनच छान वाटतं. Lol

मी स्वतः पाचवीत असताना एका मुलीला चिठ्ठी लिहायचा प्रयत्न केला होता>>

म्हणून आम्ही तुम्हाला 'अतरंगी' म्हणतो!
Happy

Pages