ती सध्या काय करते?

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 December, 2016 - 00:50

खालील दोन लिंकावर ट्रेलर बघू शकता. सतीश राजवाडेंचा नवा चित्रपट येतोय.
ती सध्या काय करते?
https://www.youtube.com/watch?v=UjyRveqOmJA
https://www.youtube.com/watch?v=0tljotdt5CI

टिक टिक वाजते डोक्यात गाण्याची आठवण करून देणारे,

हृदयात वाजे समथिंग,
सारे जग वाटे हॅपनिंग ..
असतो सदाऽऽ .. मी आताऽऽ .. ड्रिमिंग Happy

चित्रपटाबद्दल उत्सुकता वाटायला सतीश राजवाडे हे नाव पुरेसे आहे. कारण तेच ते आपले, मुंबई-पुणे-मुंबई ..
पण त्यापेक्षा जास्त ईंटरेस्टींग चित्रपटाचे नाव आहे..
थोडाश्या गुदगुल्या .. थोडी हुरहुर मनाला.. आठवणी जागवणारे आहे..
कधी शोधायचा प्रयत्न केला आहे,
ती सध्या काय करते? Happy

म्हटलं तर एकदा का हे शोधले, तर कदाचित तिच्या आठवणींतील गंमतच निघून जाईल.
पण तरीही तिची आठवण येताच हा किडा आपल्या डोक्यात वळवळतोच.
आजच्या फेसबूक ट्विटरच्या जगात ती सध्या कुठे आहे आणि काय करते हे शोधणे आणखी सोपे झाले आहे..
त्यामुळे अजूनही शोधले नसेल तर शोधा.. आणि ईथे आपले अनुभव पेस्टा Happy

Ti Saddhya Kay Karte.jpg

अवांतर - ज्युनिअर लक्ष्या अगदी काहीही श्री दिसतो
आणि मोठा झाल्यावर त्याला खरोखरची जान्हवी भेटते .. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूनटुन्या, मैत्रीणी शोधा, शाळा, कॉलेज, ऑफिस, एकेक फॉलो करत जा.. भेटणार नाही हे शक्यच नाही. काय फायदा आहे मग या तंत्रज्ञानाचा

ऋन्मेश, भापो ना? Wink
एडिटला कारण, बाकी कुणीच आपल्या तिच्याबद्दल लिहिना Proud

(हर्षल चा ष न लिहिल्याने, तुझं नाव मी पण चुकवलंय Lol )

मैत्रीणी शोधा, शाळा, कॉलेज, ऑफिस, एकेक फॉलो करत जा.. भेटणार नाही हे शक्यच नाही. काय फायदा आहे मग या तंत्रज्ञानाचा >>> अगदी खरं आहे हे Wink Lol

हर्षल
ईंग्लिशमध्ये नाव लिहिणार तर लोकांना कसे समजणार Happy

मी आताच दोन जणींना,
हेल्लो, कुठे आहेस, काय चालूय Happy
असा मेसेज टाकलाय.. एफबीवर शोधून.
रिप्लाय आला तर, येईलच, मग सरळ व्हॉटसप नंबर टाकतो. तिथे रीप्लाय येईल का नाही याची खात्री नाही .. लेट्स सी Wink

लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगाही आला चित्रपटात Happy
पण लक्ष्या आज हवा होता Sad
teaser पाहता ईंटरेस्टींग वाटतोय चित्रपट.

लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा चा छान वाटतो..

ती आर्या काहि तरीच दिसते.. अज्जिबात आवडत नाही... त्यात तिने ते दातान्च काहीतरी केलल दिसतय..
हसलीकी काहीतरी विचीत्र वाटते....

>>ती आर्या काहि तरीच दिसते.. अज्जिबात आवडत नाही... त्यात तिने ते दातान्च काहीतरी केलल दिसतय..
हसलीकी काहीतरी विचीत्र वाटते....>>
हो

अंकुश - तेजश्री, अभिनय बेर्डे - आर्या इथं पर्यंत ठीक आहे. पण अजून ती कोण तरी ७/८ वर्षाची जोडी पण दिसतेय .. या सिनेमावाल्याना काय वेडचळ लागलाय समजत नाही .. पार लहान लहान पोरांना पण प्रेमाचे ट्रेनिंग देतायत

अभि१ | 4 January, 2017 - 21:00 नवीन
अंकुश - तेजश्री, अभिनय बेर्डे - आर्या इथं पर्यंत ठीक आहे. पण अजून ती कोण तरी ७/८ वारशाची जोडी पण दिसतेय .. या सिनेमावाल्याना काय वेडचळ लागलाय समजत नाही .. पार लहान लहान पोरांना पण प्रेमाचे ट्रेनिंग देतायत >>

होना... अरे केवढे ते लहान ...त्याना काय डोम्ब्लाच कळनार आहे प्रेम... काही पण दाखवतात यार..!!

आता यावर कोणी आक्षेप नाही घेणार का की लहान मुल बिघडनार म्ह्णुन..!!!

सकाळच्या थंडीत 'मॉर्निंग वॉक'च्या वेळी पाहिलेला प्रसंग... शाळेच्या बसची वाट बघत गुबगुबित स्वेटर कानटोपी घातलेला तीन-चार वर्षांचा एक पेढा आणि त्याची आई उभे... पेढ्याला शाळेत जायचं नव्हतं म्हणून रडत वेगवेगळी कारणं सांगत उभा होता.. त्याची समजूत घालता घालता त्याची आई मेटाकुटीला आली होती...

शाळेची बस आली... बसच्या खिडकीतून तसाच गुबगुबित स्वेटर घातलेल्या एका चिमुकल्या बर्फीनं हाक मारली, 'अल्णव...sss'

त्या पेढ्यानी शेंबुड आणि डोळे पुसत बसकडे धाव घेतली... त्या पेढ्याची माऊली अवाक होऊन बघत बसली...!!

Hmmmm!!!

#ती_सध्या_काय_करते? Happy

आत्ताच हा whatsapp मेसेज वाचला, काही समजला नाही. विनोद आहे, पण शेवटचं वाक्य वाचून अर्थबोध झाला नाही. आत्ता समजलं इकडे, चित्रपटाची थीम आहे ही तर...

पार लहान लहान पोरांना पण प्रेमाचे ट्रेनिंग देतायत >>>> हे राजकपूरने सुरू केलेय ना. तेरे संग जोकर चित्रपटापासून .. उगाच आपले म्हणून मराठी कलाकारांना श्रेय देण्यात अर्थ नाही Happy

चॅम्प, एकोणवीस डिसेंबर दोन हजार सोळाचा धागा आहे हा. नववर्षात बहुधा दोन आले आहेत. की तीन? चेक करतो. ७८ चे लिमिट आहे. आठवड्याला दिड प्रमाणे. हवे असल्यास यापुढे प्रत्येक धाग्याच्या वाचनखूणात या वर्षीचा धागा क्रमांक लिहीत जातो, मोजायला सोपे. तुम्हाला आणि मलाही. तरी ७७ पर्यंत आलो की मला सावध करा, आता एकच उरला म्हणून. मग या वर्षातला सर्वात हिट धागा काढतो बघा Happy

Pages