जगून बघ

Submitted by गवंडी ललिता on 13 December, 2016 - 02:35

जगून बघ

देवाचे आभार मान, जगूनचं बघ
कट्यावरच्या गुलाबासारखं, फुलूनचं बघ
जीवनचं कोड हे, सोडवूनच बघ
थोड थोड तु, ही जगूनचं बघ

अपयशाला थोडं, कवटाळून बघ
यशाची पायरी, चाखुनचं बघ
हार नको मानू, अन् जिद्द नको सोडू
जगण्याचा अर्थ, शोधूनचं बघ
थोड थोड तु, ही जगूनचं बघ

उन पावसाचा खेळ, खेळूनचं बघ
दु:खात सुखाला तू, सामावून बघ
नको जावूस खचून, आभाळाला बघ
दु:खाचे डोंगर, चढूनचं बघ
थोड थोड तु, ही जगूनचं बघ

आले गेले किती, गणती नाही त्याला
जगभर किर्ती, मिळवून बघ
जगणं आहे कठीण, मरणं हे सोप
जीवनाचा डाव तू, मांडूनचं बघ
थोड थोड तु, ही जगूनचं बघ

देवाचे आभार मान, जगूनचं बघ

-ललिता गवंडी, अकोले,

Group content visibility: 
Public - accessible to all site users