आतला प्रकाश बाहेर पडू दे

Submitted by जयदीप. on 12 December, 2016 - 23:34

आतला प्रकाश
बाहेर पडूदे
जगाला करूदे
भेदभाव

लागतो वशीला
असे म्हणशील
तुझे करतील
नाव मोठे

नागडा पाऊस
कशाला पडतो
किती हसवतो
आपल्याला

थांबण्याची मुभा
देशील का मला
प्रवास आपला
एकतर्फी

खूप दिवसांनी
काढ आठवण
देऊन कारण
काम आहे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users