स्वप्नं

Submitted by .... on 12 December, 2016 - 12:23

स्वप्नं स्वप्नं आणि सपर्शूस्वप्नं
दिवसभर टाळलं तरी रात्री घिरट्या घालतात
कधी परसात कधी अंगणात आवाज देतात
मी स्वप्नांना टाळलं तरी
ती मला टाळत नाहीत
कधी कधी स्वप्नपक्षी
पिच्छा सोडत नाहीत

मी सांगेन माझी स्वप्ने , मऊ मुलायम रेशमी
कुणी असतील ना सांगणारे , स्वप्नांची जादुई बेगमी
कुणी फक्त दाखवून जातील
कुणी फक्त गाऊन जातील
तुझी माझी स्वप्ने मात्र
कोण स्पर्शून पाहील ?

किती टाळली तरी रात्री
घिरट्या घालतात
कधी रानात तर कधी भानात
कधी वनात तर कधी मनात
आवाज देतात..

चोरपाऊली मुग्धशिकारी
सयव्याकुळ नीजबावरी
स्वप्नं स्वप्नं आणि स्वप्नं
मी टाळलं तरी
ती मला टाळत नाहीत

- सपना

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ सपना हरिनामे, अरे वा! छान कविता आहे. आपण कवियत्रीसुद्धा आहात. आपला अजून एक गुण समजला आम्हाला. पुलेशुप्रमाणे पुढील कवितेकरीता काय म्हणतात? पुकशु!!!

धन्यवाद सचिनजी

मी कवियित्री वगैरे नाही हो, असंच आपलं सहज सुचलं म्हणून. चुकलं असेल काही तर सांगा मात्र.
( मायबोलीच्या समुद्रात ही कविता कुठल्या कुठे हरवली होती )