मैत्रीचे मोती

Submitted by गवंडी ललिता on 8 December, 2016 - 02:53

मैत्रीचे मोती

मैत्रीचे मोती जीवन सागरात हरवले
Whatsapp च्या लाटांनी किनाऱ्यावर विसावले
मैत्री आपली बालपणाची अशी काही बहरली
प्रत्येकाने मनात गोड आठवण जपली
वर्ष किती सरले आयुष्य अर्धे संपले
जबाबदाऱ्या पेलण्यात जीवन खरे गुंतले
जगलो कसे कधी किती कुणासाठी
नाही केला कधी हिशोब स्वत:साठी
आज मिळे आनंद खरा जगण्याचा
मैत्रीच्या मोत्यांची माळ गळा गुंफण्याचा
वर्ष सरले तरी आठवण येते तुमची
मैत्री जपा सर्वांनी बालपणाची आपली
- ललिता गवंडी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर कविता...............................