वणवा

Submitted by पद्म on 4 December, 2016 - 07:24

वणवा

ज्वाळा या वणव्याच्या, स्पर्शिती रान सारे
बापाविना जन्मला हा, कोण त्यास आवरे....

भासती भ्रमितांना, मुखवटे हिरवळीचे
धीरास जाण आहे, हे खेळ दिखाव्याचे....

बागडे पैलतीरी, पाहून आक्रोश
बीज आहे तेथेही, आंधळा सत्यास....

उडुनी जावे दूर, मार्ग एक आहे
हृदयग्रंथी जपून, निवाराच अंत पाहे....

अंधकार ज्ञानाचा, मी मात्र उरेन
भस्मसात जाहले ते, तरी एकटा जगेन....

मेघ येती घेऊन, आशा नव्या युगाची
मंदभाग्य ते थोर, ज्यांना जाच स्वातीची....

करुणा थोर आहे, फिकीर त्या जीवांची
कल्पातही दुर्मिळ, प्रतीक्षा 'त्या' घनाची...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पद्म सर,कविता खरंच खूप छान वाटली.
स्पेशली ,
उडुनी जावे दूर, मार्ग एक आहे
हृदयग्रंथी जपून, निवारच अंत पाहे.....

अंधकार ज्ञानाचा, मी मात्र उरेन
भस्मसात जाहले ते, तरी एकटा जगेन.....

ह्या ओळी तर अप्रतिम .

आणि तुमच्या दुसऱ्या कवितेसाठी खूप खूप शुभेच्छा.....................

छान.

छान आहे कविता.

एका द्वीपदीबद्दल प्रश्नं आहेत -
मेघ येती घेऊन, आशा नव्या युगाची
मंदभाग्य ते थोर, ज्यांना जाच स्वातीची.....

म्हणजे नक्की काय?
मंदभाग्य म्हणजे काय? जाच स्वातीची म्हणजे काय?

मंदभाग्य म्हणजे काय? जाच स्वातीची म्हणजे काय?>>>>>>>>> समाजातील लोक हे वनव्यासारख्या दुःखात आहेत, पण आयुष्यात असे व्यक्ती नक्की येतात जे हा वानवा विझवू शकतात(त्यांनाच मेघ म्हटले आहे)......पण, त्यांचे नशीब खूप मंद आहे, ज्यांना त्यांच्या येण्याचा त्रास होतो.......
स्वाती म्हणजे पावसाची पहिली धार पण होते, पण पहिल्या धारेनेच त्रास होतो, तर पाऊस सहन होणार नाही, वणवा विझणे तर दूरच......

धन्यवाद, वाचल्याबद्दल...........

स्वतः कवीकडून कवितेचे तात्पर्य ऐकणे, एक पर्वणीच...
आजपर्यंत शाळेतल्या सरांकडून, दुसऱ्यांच्या कवितांवर त्यांचे त्यांचे स्वतःचेच (चुक किंवा बरोबर) तात्पर्य ऐकले आहे.

<<मंदभाग्य म्हणजे काय? जाच स्वातीची म्हणजे काय?>>>>>>>>> समाजातील लोक हे वनव्यासारख्या दुःखात आहेत, पण आयुष्यात असे व्यक्ती नक्की येतात जे हा वानवा विझवू शकतात(त्यांनाच मेघ म्हटले आहे)......पण, त्यांचे नशीब खूप मंद आहे, ज्यांना त्यांच्या येण्याचा त्रास होतो.......
स्वाती म्हणजे पावसाची पहिली धार पण होते, पण पहिल्या धारेनेच त्रास होतो, तर पाऊस सहन होणार नाही, वणवा विझणे तर दूरच......
>>
नशीब मंद आहे?
नशीब जोरात आहे च्या विरुद्धं की काय? (आम्ही कॉलेजच्या दिवसांत - 'मंद आहे' हा शब्दप्रयोग एखाद्या लेट करंटसाठी वापरायचो)
तसच जाच हा शब्द पुल्लिंगी आहे. म्हणून ते 'जाच स्वातीचा' होईल.. जाच स्वातीची नाही.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

व्याकरणातील त्रुटींमुळे कविता काढली होती..
पण, माझ्या मते व्याकरणाचे कवितेवर बंधन म्हणजे कवितेचा अपमान आहे...
कविता या भावना कळविण्यासाठी असतात, शुद्ध व्याकरणाचे प्रदर्शन करण्यासाठी नाही.
म्हणून पुन्हा पोस्ट करत आहे.

धन्यवाद, आणि या कवितेत नवीन बदल होऊ शकत नाही.

<<पण, माझ्या मते व्याकरणाचे कवितेवर बंधन म्हणजे कवितेचा अपमान आहे...
कविता या भावना कळविण्यासाठी असतात, शुद्ध व्याकरणाचे प्रदर्शन करण्यासाठी नाही.>>

पटलं नाही. व्याकरण भाषेचा एक भाग आहे. कविता 'भाषेत' व्यक्तं करतोय आपण इथे... हातवार्‍यांनी नाही.
लिंग, वचन, इत्यादीना फाटा देऊन लिहिलेलं काहीही (कविताच नाही.. अगदी गद्यही) फार फार गाळून गाळून वाचावं लागेल. भावना कितपत पोचतिल शंका आहे, पद्म. असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
पण ते महत्वाचं नाहीये. तुम्ही लिहा. लिहिणं, लिहीत रहाणं, शिकत रहाणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी मायबोलीसारखं संस्थळ खूप काही देतं. त्याचा लाभ सगळ्यांनाच आहे.
असो. पुन्हा एकदा पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

धन्यवाद दाद. कधीकधी माझाच इगो नडतो. मन दुखावले असेल तर माफी असावी...
मी आत्ता वाचले की तुम्ही ऑस्ट्रेलियात असता, तरी तुमचे व्याकरण अजूनही पक्के आहे______सलाम!!!!!!

नाही हो, पद्म. मी नक्कीच दुखावले नाहीये.
लिहिते असूदेत आपल्यातले सगळेच ज्यांना व्यक्तं होण्याची उर्मी आहे.

>>>>> समाजातील लोक हे वनव्यासारख्या दुःखात आहेत, पण आयुष्यात असे व्यक्ती नक्की येतात जे हा वानवा विझवू शकतात(त्यांनाच मेघ म्हटले आहे)......पण, त्यांचे नशीब खूप मंद आहे, ज्यांना त्यांच्या येण्याचा त्रास होतो.......
स्वाती म्हणजे पावसाची पहिली धार पण होते, पण पहिल्या धारेनेच त्रास होतो, तर पाऊस सहन होणार नाही, वणवा विझणे तर दूरच......>>>>> वाह!!! खरच खोल अर्थ आहे. खूप आवडली. !!