आठवण

Submitted by प्रियान्का कर्पे on 3 December, 2016 - 01:49

का तुझा विचार
येतो सारखा मनात
अगं , मी आहे इथेच
येऊन सांग ना कानात

सारखा तुझा चेहरा
डोळ्यासमोर येतो
नकळतच मला तो
दूर घेऊन जातो

वाचताना मी पुस्तक
हरवून जाते मधेच
भानावर आणून द्यायला
तू असतो तिथेच

दिवसभरातलं बोलणं
मला सारख आठवत राहत
तू जवळ नसताना
तेच मला साथ देतं

आठवण मला तुझी
सारखी येत असते
हीच आठवण तर मला
तुझ्या जवळ नेत असते

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!!! आवडली कविता............

आठवण मला तुझी
सारखी येत असते
हीच आठवण तर मला
तुझ्या जवळ नेत असते

खूपच छान वाटल्या ह्या ओळी!!!!!!!!!!!