कमिशन ___ २२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 December, 2016 - 02:57

ईस्टॉलवर आज नेहमीपेक्षा कमी गर्दी होती. सगळ्यांचाच सेम प्रॉब्लेम. मी खिसे चाचपले. २० रुपयांची खुल्ली चिल्लर आणि पाचशे पाचशेच्या दोन कायमच्या बंद नोटा सापडल्या. नाही म्हणायला मागच्या खिशात दोन हजारांचे कडक बापू होते. पण ते नुसता वडापाव खायला म्हणून बाहेर येणार नव्हते.

जंबो वडापाव साधा पंधरा रुपये. त्यावर बटर आला तर वीस रुपये. आणि चीज आले तर आपल्या औकातीच्या बाहेर.. साला पाच रुपये शिल्लक ठेवायचे की बटर बोलायचे.. आरे हाड, आपण खाणार तर तुपाशी! एका फटक्यात निर्णय झाला. हातातला वडापाव पोटात जात होता आणि खिशातले बिनकामाचे बापू हसत होते.

अरे ही त्या दिवशीचीच बाई. वरचेवर असते का ईथे? पाच पाच रुपये गोळा करून वडापाव खाऊन जाते. बरा धंदा आहे. मागच्यावेळी दया येऊन तिला अख्खा वडापाव घेऊन दिलेला. चुकी केली. आता उगाच दोनपाच रुपयांच्या आशेने बघतेय आपल्याकडे. अरे हे काय, ईथे कश्याला येतेय. आता कसे कटवावे हीला, द्यायला आठाणेही नाहीत.

च्यायला खिशातले बापू नाचवावेत का तिच्यासमोर. बघ बाई देतोय का तुला तरी तो वडापाववाला दोन हजाराचे सुट्टे. एक वडापाव कमिशन म्हणून तू खाल्लास समजेन. उरलेले मला दे. सुट्ट्याचे सुट्टे आणि पुण्याचे पुण्य..

पण काही सुचण्याआधीच ती माझ्यापर्यंत पोहोचली. आपले तंबाखूचे दात दाखवत हसली. आणि आपल्या मळलेल्या झोळीतून एक डब्बा बाहेर काढला. मी हात वर करत तिला ‘पुढे जा’ असे बोलणार ईतक्यात तिने तो डब्बा उघडला.. आणि माझा हात वरच्यावरच थबकला.

माझ्यासमोर हजाराची बंद नोट नाचवत ती म्हणाली, साहेब सुट्टे मिळतील का... नऊशे ऐंशी दिले तरी चालतील ..

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द्यायचे की मग सुट्टे. दोन वडापाव सुटले असते. Happy

तु काय आकडे लावायला लागला का भौ.

आणि आधी कथा लिहुन मग शब्द मोजतो का बे तु? ३७५ काय २२५ काय Lol

अ‍ॅप वगैरे आता आलेत, मला चालताना पावले आणि लिहिताना शब्द मोजायची लहानपणापासूनची सवय आहे Happy

अ‍ॅप वगैरे आता आलेत, मला चालताना पावले आणि लिहिताना शब्द मोजायची लहानपणापासूनची सवय आहे < तु जन्मतःच एप आहेस.

__ ४ >> Happy

मला वाटते मी मायबोलीवरचा पहिलाच लेखक आहे जो धागा उघडायच्या आधीच किती शब्द झेलायचे आहेत याची वाचकांना कल्पना देत आहे Happy

छान आहे ही कथा पण.

कमिशनचे कमिशन आणि पुण्याचे पुण्य.. >> + 1.

मला चालताना पावले आणि लिहिताना शब्द मोजायची लहानपणापासूनची सवय आहे >> तु गफ्रेसोबत चालताना बोलत नाहीस का?? बोलत असशील तर किती पावलं मोजतोस ते कसं लक्षात ठेवतोस?? (कुणाचं काय नि माझं काय.. Proud )

निधी,
मोबाईलमध्ये दोन अ‍ॅप वेगवेगळी चालतात की नै?
ऋन्मेषपण एका बाजूला गप्पा मारता मारता एका बाजूला पावले मोजतो.
लहानपणापासूनची सवय म्हणून अ‍ॅटोमॅटिकली होते तसे.

निधी, बरेचसे तर तीच बोलत असते. मी ऐकायचेच काम करतो. (आमची जोडी काही परग्रहावरची नाही)
मला अधूनमधून बोलायची संधी मिळते तेव्हा मी चालणार्‍या पावलांचा आणि बोलणार्‍या शब्दांचा वेग समान ठेवतो जेणेकरून वेगळे वेगळे मोजावे लागत नाही.

टीप - एखादे वाक्य चालता चालता `लेफ्ट राईट लेफ्टच्या' सुरात बोलून बघा, म्हणजे हे जमवायला काही रजनीकांतची गरज नाही हे समजून येईल Happy

साती ताई <<लहानपणापासूनची सवय म्हणून अ‍ॅटोमॅटिकली होते तसे.>> ओके. हे होऊ शकतेच. Happy

तू बोलताना पण शब्द मोजून बोलतोस???

निधी, एकदा सवय लागली आपोआप मोजले जातात.
ऊदा - भारत माझा देश आहे -- हे मनातल्या मना कर्ता कर्म क्रियापद वगैरे फोड होते आणि मोजले जातात.
तसेच आपण जी बोलतो ती आपलीच वाक्ये असतात, आपण तीच तीच वाक्ये वर्षानुवर्षे त्याच त्याच शैलीत बोलत असतो. त्यामुळे एकदा "आई भूक लागलीय, आज जेवायला काय केलेय" या वाक्यातील शब्द मोजले गेले की ते प्रत्येक वेळी वेगळे मोजावे लागत नाहीत. सरळ आधीच्या टोटलमध्ये सात बोलून पुढे मोजायचे Happy

Runmesh chaltana paul n lihtana shabd mojaychi savay..... bhari aahe ki rao.... paul n shabdanchi sankhya sanga jra mhnje aataprynt challele n lihlele....

ऋ, छान रे! :

आकसत चाललिये तुझी शब्द संख्या झपाट्याने म्हणजे एकाक्षरी कथा लवकरच वाचायला मिळेल! Wink

मला चालताना पावले आणि लिहिताना शब्द मोजायची लहानपणापासूनची सवय आहे
>> मी पण आणि इथून तिथे जाताना ४०० पावले असे पण लक्षात ठिवते. शब्द मोजण्यात अर्धी करिअर गेली. जाइराती लिहीत असे. १२६ शब्दांची अ‍ॅड, दोन परिच्छेद कॉपी चार अक्षरी हेडलाइन असले.
मला जिना उतरताना पायर्‍या मोजायची पण सवय आहे. डोक्यात कायम वर्ड एक्सेल चालूच असते. हि हि.

ही कथा पण चांगली आहे.

मी पण आणि इथून तिथे जाताना ४०० पावले असे पण लक्षात ठिवते.
>>
प्लस मी पण

स्टेशन ते घर आणि ऑफिस ते स्टेशन पायी चालताना वेगवेगळ्या गल्ल्यांचे कॉम्बिनेशन करत बरेच पर्याय तयार होतात. मी हे सर्व पर्याय मोजतो. तसेच कुठल्याही नवीन जागी वरचेवर पायी जायचेय हे समजले की ते देखील मोजून लक्षात ठेवतो. तसेच कोणत्या स्पीडने चालल्यास आपली मिनिटाला किती पावले पडतात हे देखील मोजतो.

गंमत म्हणजे लहानपणी मी घर ते स्टेशनचा मॅप तयार केलेला आणि त्यातून हे सिद्ध केलेले की वर्षानुवर्षे आमच्या बिल्डींगमधील लोकं ज्या एका गल्लीतून जाणार्‍या रस्त्याला स्टेशनकडचा जायचा शॉर्टकट म्हणून म्हणत होते तो शॉर्टकट नव्हताच. दुसर्‍या बाहेरच्या एका रस्त्यापेक्षा तो तीन ते चार पावलांनी जास्त होता.

छान आहे. आवडली ही आणि ३७५ वाली पण. ही वाचताना ते नम्बर काय आहेत हेही बघायचे होते. आता त्याचा उलगडा झाला ते बरे झाले. पुढची नाही वाचली तरी चालेल. (just kidding :)) . छान आहेत दोन्हीही.

विद्या.

मला चालताना पावले आणि लिहिताना शब्द मोजायची लहानपणापासूनची सवय आहे
>> मी पण आणि इथून तिथे जाताना ४०० पावले असे पण लक्षात ठिवते. >> मी पण. मला वाटलं होत मी एकटीच आहे. Happy शब्द नाही मोजत, पण मोजण्यासारखं काहीही असेल की सुरु होते.

ही कथा ठिक आहे. किस्सा म्हणता येईल.

Pages