मुर्ख फाॅरवर्ड आणि ते आवडुन फाॅरवर्ड करणारे मुर्ख

Submitted by अनिश्का. on 30 November, 2016 - 01:33

आज सकाळीच एक मॅसेज आला. मागे १० महिन्यांच्या बाळाला पाळणाघरात मारहाण झाली.. . मग ती आई टिव्ही वर रडुन रडुन सहानुभूती मिळवत होती.. मग लोक पैश्याच्या मागे ईतके लागलेत की मुलांना असं लोकांकडे टाकुन जातात... मग सासु सासर्यांचं लचांड सुनांना नको असतं...

अर्थात हा मॅसेज बनवणारा माणुस बिंडोक आहे... पण तरी असे मॅसेज येतात आणि लोक ते फाॅरवर्ड करतात.

१. १०० पैकी ९५% बायका नोकरी करतात.
२. सर्वांचीच आर्थिक परिस्थीती चांगली असते असं नाही.
३. कोणाचे सासु सासरे नसतात, कोणाचे फार वयस्कर असल्यामुळे सांभाळु शकणार नसतात, कोणाला नातवंडांना सांभाळायची ईच्छाच नसते, कोणी आजारी असतात ... एक ना एक खुप कारणं असु शकतात .. पण सरसकट मुलगा सुनेला सासु सासर्यांचं लचांड नको म्हणुन बाळांना पाळणाघरात ठेवतात असं विधान करणं म्हणजे मुर्खपणाचा कळस आहे.
4. त्या फाॅरवर्डेड मॅसेज चा ब्लेमिंग फोकस फक्त आईवरच आहे. असं का?
बाळासाठी फक्त वडिलांनीच कमवायचं आणि आई ने नाही असं का ? आणि आईनेच सांभाळायचं बाबांनी नाही असं का????
सध्यातरी ईतकंच सुचतंय.
आणि मी या बाबतीत सुदैवी आहे की माझा नवरा ईतक्या मागासलेल्या आणि चीप विचारसरणीचा नाही. बाकिच्यांचं काय??

-- अनिश्का सावंत

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या धाग्यावर चर्चा नक्की कोणत्या विषयावर करायची आहे ??
मुर्ख व्हॉट्सअप फॉरवर्ड वर. कि ते फॉरवर्ड आवडुन पुढे ढकलणार्‍या मुर्खांवर ?

खरय काल हे वाचुन खुप राग राग झाला. वस्तुस्तिथी माहित नसताना असा विचार कसा काय करु शकत कोनी. प्रत्येकाच कारण वेगळ असू शकत. मी या बाबतीत सुदैवी आहे>>> मी सुध्दा

सहमत आहे..असे मेसेज पोस्ट करणारे मुर्ख आहेत..
मी पण आजच हि पोस्ट एका group वर वाचली... आश्चर्य म्हणजे की त्याच समर्थन करणारे च जास्त होते.
विशेष करून ज्या बायकांना सुना आहेत अन् त्यांच्याशी पटत नाही अशा समर्थन करण्यात पुढे होत्या..

असं विधान करणं म्हणजे मुर्खपणाचा कळस आहे.

शहणपणाची विधाने करून लोकप्रियता मिळत नाही.
अतिशयोक्ति करणे, एका प्रसंगावरून सरसकट ५० कोटी लोकांबद्दल काहीतरी सनसनाटी विधाने केली की कुणाला आवडते, कुणाला नाही, पण प्रसिद्धी मिळते.

घटं छिंद्यात ,, इ. ऐकलेच असेल.

सध्या अमेरिकेत तरी तसले करूनच निवडणुकीत विजय मिळतो. आणि निवडणूक जिंकल्यावर पैसाच पैसा -मग कोण पर्वा करतो टीका करणार्‍यांची!

आता उत्तरे, प्रतिसाद देणारे तरी काय, त्यांचेहि नाव लोकांपुढे येते!

मायबोलीवर असे अनेक लोक त्यामुळेच (सु/कु)प्रसिद्ध आहेत.

आश्चर्य म्हणजे की त्याच समर्थन करणारे च जास्त होते.
>>>
मी सुद्धा आजच एका ग्रूपवर ही पोस्ट वाचली. आणि तिथेही आश्चर्य म्हणजे समर्थन करणारे जास्त होते..
मग मी सुद्धा या पोस्टला पर्यायाने त्यांना मस्तपैकी झापायचा मौका सोडला नाही Happy

अनिश्का, भावना पोचल्या. खरंच मूर्ख लोक आहेत हे.
मला आलेल्या फॉरवर्डमध्ये फक्त video आहे(मी बघितला नाहीये) आणि आता डे केअर चं standardization व कडक कायदे करावेत अशी मागणी. म्हणजे शाळांप्रमाणे पाळणाघरांनाही accreditation वगैरे. कारण पूर्वी घरगुती पाळणाघरे असतं, चालवणाऱ्या काकू नात्यातल्या ,ओळखीच्या असत. आता मोठी पाळणाघरं असतात. ओनर बाई वेगळी, काम करणाऱ्या वेगळ्या. एक फेसबुक न्यूज बघितली होती त्यात एक वर्षाच्या बाळाचा अंगठा पाळणाघरात असताना आतल्या एका दारात सापडून चेंदामेंदा झाला होता आणि ओनर जबाबदारी नाकारत होती. एकूणात पोलीस व सरकारी यंत्रणेने मध्ये पडायची वेळ आली आहे.
(मला भारतातील पाळणाघराचा अनुभव नाही, फक्त चर्चेला मुद्दे देत आहे.)

मला ते फेबु वरचे फॉरवर्डस अजिबात पहावत नाहीत. ३० सेकंदात फॉरवर्ड करा नाहीतर बॅड लक वाले. नाहीतर रक्ताने माखलेले देह, प्राणी असं कहीबाही दाखवुन अमेन टाईप करायला सांगणारे.

ऋन्मेऽऽष(मग मी सुद्धा या पोस्टला पर्यायाने त्यांना मस्तपैकी झापायचा मौका सोडला नाही ) ईथे पोस्टाना तुमचा प्रतिसाद

मुदलातच लहान मुलांना पाळणाघरात ठेवणे ही काही फार चांगली गोष्ट नाहीये. त्याच्या परिणामांवर नंतर रडत बसणे हे तर अजुनच महान आहे.

मुदलातच लहान मुलांना पाळणाघरात ठेवणे ही काही फार चांगली गोष्ट नाहीये. त्याच्या परिणामांवर नंतर रडत बसणे हे तर अजुनच महान आहे.>>>>> mag job karnarya aai vadilanni karavr kai....

बायकांना मुळातच मुलांना पाळणाघरात ठेवताना अपराधी वाटत असते. त्यात असे काही झालं की नातेवाईक, ओळखीचे लोक त्या आईचे जिणे मुश्किल करत असणारच. त्या बाळाबद्दल जितके वाईट वाटते तितकच वाईट त्या आईचे वाटते आहे Sad

मुदलातच लहान मुलांना पाळणाघरात ठेवणे ही काही फार चांगली गोष्ट नाहीये. >>>> मग नोकरी करणार्‍या आयांनी काय करावे???

आता डे केअर चं standardization व कडक कायदे करावेत अशी मागणी. >>>> +१

मग नोकरी करणार्‍या आयांनी काय करावे???
>>>
सोप्पंय
१) वर्क फ्रॉम होम करावे.
२) किंवा नोकरी सोडावी
३) किंवा एकत्र कुटुंब पद्धतीचा स्विकार करावा
४) किंवा मूल सांभाळायला जमत नसेल तर होऊच देऊ नये
५) किंवा बेस्ट म्हणजे नवर्‍याला दुसरं लग्न करायची परवानगी द्यावी, एका अश्या बाईशी जी घरी राहून मूल सांभाळायला तयार होईल.
............. अजून आठवेल तसे भर टाकतो.

पहिले चार उपाय व्हॉटसपवरून आले आहेत, पाचवा माझ्या सुपीक डोक्यातून Happy

१) नवर्‍याला वर्क फ्रॉम होम करण्यास सांगावे.
२) किंवा नोकरी सोडण्यास सांगावे.
३) किंवा एकत्र कुटुंब पद्धतीचा स्विकार करावा. ह्याला +१ तिचे आई बाबा पण असतील्च ना.
४) किंवा मूल सांभाळायला जमत नसेल तर होऊच देऊ नये ह्याला +१
५) बाईने स्वतः दुसरे लग्न करावे. एका अश्या पुरुषाशी जो घरी राहून मूल सांभाळायला तयार होईल.

हे कसं वाटतंय ? Lol

हे असंच टाइमपास म्हणुन

किंवा दुसर लग्न करुन अजुन एक नवरा घरी आणावा जो घरी राहुन मुलं सांभाळायला तयार असेल.... अर्थात पहील्या नवर्याच्या संमतीने

हे कसं वाटतंय ?

५) किंवा बेस्ट म्हणजे नवर्‍याला दुसरं लग्न करायची परवानगी द्यावी, एका अश्या बाईशी जी घरी राहून मूल सांभाळायला तयार होईल.>>>>:हहगलो: तुझ्या एन ए एन ए ची टी ए एन जी ! तुझ्या गफ्रेला हा सल्ला दे मग ती तुझं काय करते ते बघ.:खोखो:

किंवा दुसर लग्न करुन अजुन एक नवरा घरी आणावा जो घरी राहुन मुलं सांभाळायला तयार असेल.... अर्थात पहील्या नवर्याच्या संमतीने
>>>>>

माझ्याबाबत मी कमावणारा नवरा बनण्यापेक्षा घरी राहणारा नवरा बनणे जास्त पसंत करेन.
एकदा मुलांना झोपवले वा शाळेत सोडले की मी ईथेच मायबोलीवर पडीक असेल आणि मग माझे मायबोलीवरचे धागे सुद्धा त्याच पटीत वाढतील,
हे तुम्हाला चालत असेल तर सांगा, मग मी माझ्या गर्लफ्रेंडशी बोलून घेतो Happy

ज्यांना ईग्नोरास्त्र वापरता येते त्यांना कुणाचे कितीही, कशावरही धागे आले तरी काही फरक पडत नाही.

सो बोलुन घ्या गर्लफ्रेंडशी

सस्मित Rofl

on a serious note ऋन्मेष हे पर्याय दरवेळी शक्य असतातच असे नाही. कोणतीही आई आपले मूल आनंदाने पाळणाघरात ठेवत नाही!!

Pages