.................................................................................................................................

Submitted by .... on 26 November, 2016 - 07:41

..........................................................................................................................................

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाहिले पण व्हिडीओज ?

कॅनडामधे काय बोलतात हे ही पहा.
https://www.youtube.com/watch?v=G8TwqD2ZNNs

विश्वगुरू असा उल्लेख केला गेला आहे ( कान देऊन ऐका, हाच शब्द आहे).

अजून नाही पाहिले, पण मला माझ्या देशाच्या पंतप्रधानांबद्दल चांगले बोलायला ईतर देशातल्या लोकांनी दिलेल्या सर्टीफिकेटची गरज नाही. म्हणून न बघताच दोन शब्द चांगले म्हणून मोकळा झालो Happy

अवांतर - तुमचे धाग्याचे शीर्षक - मोदीजींबद्दल आता तरी - यातील आता तरी ने असे वाटतेय की सर्व भारतभर मोदींवर टिकाच होतेय., खरीच अशी परीस्थिती आहे का?

सपना,
शेवटी परदेशातील लोकांना काय फरक पडणार आहे? ट्रेड अ‍ॅग्रीमेंट वगैरे त्यांना फायद्याची झाली तर ते छान म्हणणार. त्यातून पाहुणे मंडळी आली तर कुणी नावे थोडी ना ठेवणार आहे. भारतातल्या सामान्य लोकांना चांगले राहाणीमान मिळणे सगळ्यात महत्वाचे. तसे झाले तर लोकं आपणहून पुन्हा पंतप्रधान मोदींना निवडून देतीलच. पुन्हा एकदा सांगते- मी निवडलेल्या नेत्याचा निर्णय मला आवडला नाही तर त्या बद्दल निर्भयपणे चर्चा/ टीका करण्याचा , त्या निर्णयाचे जवळच्या-दुरच्या काळात जे परीणाम होणार आहेत ते तपासायचा अधिकार असणे, माझे म्हणणे त्यांच्या पर्यंत पोहोचवता येणे हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण! मी निवडलेला नेता आहे म्हणून त्याचे मी सतत गुणगाण करावे ही अपेक्षा चुकीची. निर्णयाचा काही भाग चांगला असेल तर त्याला चांगलच म्हणावे पण जे चुकलयं त्याबद्दल बोलून सुधारणेची अपेक्षा ही करायलाच हवी ना!

नमो नमः!

हे दोन शब्द चांगले बोलून झाले.
दोनशे चांगल्या शब्दांची पोस्ट उद्या टाकते.
मला कामे लवकर आटपून सारुकचा सिनेमा बघायला जायचं आहे.

जाऊदे सपना . कशाला ओढून ताणून मायबोलीवरच्या लोकांना चांगलं बोलायला बोलावते आहेस .मायबोलीकरांना जर का मोदींच्या सगळ्याच गोष्टीत वाईटच दिसत असेल आणि ओढून ताणून ते ( मायबोलीकर) मोदींना पाठिंबा देणाऱ्या लोकांना सगळ्या धाग्यात खेचत असतील ( मोदीप्रेमी आता कुठे गेले- आता कुठे गेले करत ) तर त्याला काय करणार ? मायबोलीवरची लोक चांगली बोलली काय आणि नाही काय. मोदींना काय फरक पडतो ? मायबोली व्यतिरिक्त भारतात आणि भारताबाहेर त्याच्या बद्दल चांगल बोलणारी लोक नाहीयेत का ?

मायबोवरच्या अशा एकसुरी धाग्यांना फाट्यावर मारायला शिक . घंटा फरक पडत नाही . शेवटी येणारा काळच ठरवेल मोदींचे चे निर्णय चुकीचे असले तर कसे चुकीचे आहेत आणि बरोबर असले तर कसे बरोबर आहेत . कशाला उगीच धाग्याची भर ?शेवटी टिंगल टवाळीच करतात हे मायबोलीवरचे विरोधक . कुठे ? रात्रीच्या परदेशातल्या वाहत्या धाग्यांवर Happy

मोदींच्या निर्णयाच्या विरुद्ध गळे काढणाऱ्या लोकांनाच कळणार नाही का " रुदाली " कोण ते.
कुचकट प्रतिसादांना फाट्यावर मारणे उत्तम . कुचकट प्रतिसाद्कर्त्यांना शुभेछा Proud Lol

सपना, तुम्ही मोदीविरोध लैच मनावर घेतलेला दिसतोय. इतके काही जीवाला लावून घायची गरज नाही, माध्यमांचा विस्तारच इतका वाढलाय, की सहमती आणि विरोध दोन्ही गोष्टी आहेत त्यापेक्षा बऱ्याच मोठ्या दिसायला लागतात.

आपल्या राहुलबाबांकडे बघा, इतकी टवाळी झाली (अन अजूनही होतेय), पण पठ्ठया अजून मागे सरायला तयार नाही. राजकारणातल्या आखाड्यातले काडीपैलवान जर असा चिवटपणा दाखवत असतील, तर मोदींसारखा कसलेला मल्ल थोडीच मागे राहणार?

खरेच काही चांगले करत असतील, तर तरतील, नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत भरतील. त्यांना असल्या विरोधाने फार काही फरक पडत नाही, तेव्हा तुम्ही हलके घ्या. Happy

मोदींच्या ह्या सर्जिकल स्ट्राइकने गोरगरीबांना सळो की पळो करून सोडले आहे.कामधाम सोडुन लोक एटिएमच्या रांगेत उभे रहात आहेत.रेशनपुरते तरी पैसे आम्हाला मिळु द्या असा आक्रोश.करत संतापलेल्या लोकांनी चाकणमध्ये एसबिआयचे एटिएमच्या काचा फोडल्या. याआधी कुठल्याच प्रथानमंत्र्यांना ही किमया जमली नव्हती.

मला धाग्यांवर कार्टून लावणार्‍यांचा नितांत आदर वाटतो.

परदेशांत मोदीजी इतके पॉप्युलर आहेत, की परदेशातले नागरीक आपल्याकडे येऊन काळे पैसे जमा करायला लायनीत उभे आहेत. हे पहा:

आणि त्याचवेळी नीच देशद्रोही काळापैसावाल्या काँग्रेजींचा हा अपप्रचारही पहा:

नोटबंदीच्या आधीच्या व्यव्हारांचे हे प्रॉपर्टी रजिस्टरमधल्या उतार्‍यांचे आकडे आहेत. यात काडीचाही काळा पैसा नाही बरं! सगळा व्यवहार भाजपाने व्हाईटमधे केलाय. मा. अमितजींचे आदेश होते खरेदीचे.

अरे हो!

काळा पैसावाला हॉस्पिटल ओनर आहे नै का मी! विसरलोच होतो.

तर,

५०%ची नवी व्हीडीएस जाहीर केल्याबद्दल तमाम काळापैसाधारक संघटनेतर्फे मोदीजींचे अभिनंदन! त्यांनी अशी स्कीम काढली, तिचे स्वागत. आता अहमदाबादेतला तो हिरे व्यापारी ९०% भरून नक्कीच पस्तावला असेल!

(गावा-गावातला पेट्रोलपंप्/बियाणेवाला १०%त व्हाईट करून देतोय, त्याचं काय करावं?)

>>बाकी रुदालींची फौज अवतरली आहे. त्यासाठी शुभेच्छा!<<

रुदाली फौज/गॅंग - अगदि समर्पक उपमा. हि टर्म टाॅस करणार्याला माझ्याकडुन एक बियर - आॅनलाइन कॅश पेमेंट द्वारा... Happy

क्लूकक्सक्लेनला २ -४ बियर/बर्बन पाजता येतील इतपत कमाई आज ३-४ मिन्टात झाली.
मोदी क्रूपेने इंटर्न्याश्नल कार्डही आहेत.
कुट्टं बी जाऊन पिऊ या. म्या भर्तू बिल.

(अशी थाप मारयला माझं काय जातंय? उग्ग्म सांगायचं ऑन्लाईण कॅश पेमेंटने बियर पाजतो. समबडी नीड्स टु ग्रो अप यु नो Wink

सुजातै,

धन्यवाद. कळकळीने लिहीलेय तुम्ही.
पण मला खरंच काही फरक पडत नाही. माझी मतं ठाम नाहीत. विरोधक किंवा समर्थक दोघांच्या म्हणण्यात काय तथ्य आहे हे मी मनापासून पाहते. एका बाजूला नसल्याने मला त्याचा त्रास होत नाही. मी म्हटलंय ना कि विरोधकांच्या काही मुद्यात तथ्य आहे. त्यावर मी सहमती देखील दर्शवलेली आहे. पण चांगल्या निर्णयांना पाठिंबा देणे, कौतुक करणे हे जिंदादिलीचे निर्दर्शक असते. ते मिसिंग असल्याचे जाणवले.

सातत्याने एकच सूर इरीटेट करतो. या धाग्यावर अर्थातच नोटबंदीचा विषय नव्हता.त्यासाठी चार की पाच, मोजले नाहीत, इतके धागे आहेत. त्यावर पुन्हा पुन्हा आलेले मुद्देच आता इथे पुन्हा कुणाला आणायचे असतील तर त्यांणा इग्नोर करावे लागेल. धाग्याचा विषय अगदी स्पष्ट आहे. त्यात कुठेच नोटबंदी नाही.

ठीक आहे, ऑस्ट्रेलियन प्राईम मिनिस्टर यांचे भाषण पाहुण्यांचे कौतुक म्हणून केले असेल. पण फ्रेंच मीडीया असो, अमेरिकन मीडीया असो सर्वत्र चांगले मुद्दे येताहेत ते का याचा विचार एकदा केला असता तर बरे झाले असते असे मला एकदातरी वाटून गेले. इथून पुढे ती अपेक्षा ठेवणार नाही. त्याबद्दल तक्रार नाही.

मला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका गोष्टीचं खूपच अप्रूप वाटत. एका दिवशी तीन ठिकाणी तीन कार्यक्रम असूदेत. या कार्यक्रमात घातलेले कपडे पुढल्या कार्यक्रमात दिसणार नाहीत. आणि कितीही फिरून येवोत, अगदी ताजेतवाने दिसतात.

Pages