सारख्या अर्थाचे पण वेगळी छटा दर्शवणारे मराठी/ इंग्रजी शब्द

Submitted by सिम्बा on 22 November, 2016 - 11:10

काही दिवसा पूर्वी मुलीबरोबर बाहेर चाललो होतो डोक्यावरून पक्ष्यांचा थवा चिवचिवत गेला,
मुलगी म्हणाली “बाबा तो बघ पक्ष्यांचा थवा” इंग्लिश मीडियम च्या ६ वर्षांच्या मुलीने बरोबर शब्द वापरलेला ऐकून मलाच बर वाटलं. पण लगेच आपण मुलीचा मराठीशी संपर्क तुटू दिला नाही आहे म्हणून स्वत: भोवती आरती ओवाळून घेण्याची अनिवार इच्छा झाली आणी तिला पुढचा प्रश्न विचारला ” पक्ष्यांचा थवा, तसा फुलांचा..???” उत्तर आला “सडा” खरतर उत्तर चुकलं नव्हते, पण मला “फुलांचा गुच्छ” अपेक्षित होते.
फुलांचा सडा आणी फुलांचा गुच्छ यातला फरक सांगताना अजून शब्द समोर आले
१) सडा- गळून पडलेली फुले/ वस्तू, जिचा मूळ झाडा / बॉडी बरोबर संबंध संपला आहे, बकुळीचा सडा/ खूप केस गळले तर केसांचा सडा
२) गुच्छ:- साधारण सारख्या गोष्टींचा समूह, पण या गोष्टी मुळ बॉडी पासून दूर केली आहेत (वेग वेगळी फुले तोडून गुच्छ बनवला)
३) ताटवा :- एकत्रित असलेली जिवंत फुले.
४) घोस:- शक्यतो झाडावर असलेली सजातीय फुले.
५) हारा :- रचून ठेवलेली तोडलेली फुले. (नुसताच हारा म्हणजे ढीग बहुतेक)

हे सगळे तिला समजावून सांगणे माझ्या कुवतीबाहेरचे काम आहे हे मला समजले.
मात्र मराठीत इतक्या बारकाईने शब्द प्रयोग करणारे आपण इंग्लिश मध्ये फक्त बुके, किंवा बंच ऑफ फ्लॉवर म्हणून वेळ निभाऊन नेतो हे सुद्धा कळले.
परवा तिच्या वाचनालयातून आणलेले grolier सेरीज चे पुस्तक पहिले आणी परत हा इंग्लिश बद्दलचा न्यूनगंड जागा झाला, कारण त्यात काही शब्दांच्या बर्याच छटा त्यांनी दाखवल्या आहेत.
जसे jump – hop- pounce- bounce- leap
fly- flutter- glide- hover- swoop
असे अर्थवाही इंग्रजी शब्द आणी त्यांचे नेमके मराठी प्रतिशब्द यांचा संग्रह करण्या साठी हा धागा.
प्रतीसादामध्ये ब्रोड्ली सारखा अर्थ मात्र वेगळी छटा दाखवणारे शब्द लिहावेत, (मराठी अथवा इंग्रजी) अर्थ माहित असल्यास तो हि लिहावा, जाणकार आपल्याला सुधारणा सुचावतीलच.

असा धागा आधीच असेल तर मला सांगा हे डिस्कशन तिकडे करू या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा !
आठवीत आम्हाला आपटे बाई होत्या इंग्रजीला त्यावेळी त्यांनी वर्गात शिकवायची सुरुवातच मुळी सारख्या अर्थाचे पण वेगळी छटा दर्शवणारे इंग्रजी / मराठी शब्द शिकवून केली होती.

ते शब्द असे

Award, reward, gift, present, donation, charity, grant
बक्षीस, पारितोषिक, भेट (वस्तु), दान, भीक, भिक्षा, दक्षिणा

आणि कोणत्याही भाषेवर प्रभुत्व हवं असेल तर ती भाषा वापरणार्‍या प्रदेशाची संस्कृती देखील अभ्यासायला हवी, इंग्रजी भाषा जास्त शब्द संग्रह असलेली असली तरी आपल्याकडच्या अनेक शब्दांना सुयोग्य इंग्रजी शब्द असेलच असे नाही, आपला शब्दसंग्रह जास्तीत जास्त वाढवावा जेणेकरून चपखल / समर्पक शब्द-योजना करता येते / यायला हवी असे सांगीतले होते. जे पुढे मला खूपच कामास आले.

असो. वाचतोय, आनंद मिळतोय. अजून लिहायला / वाचायला आवडेल.

@ हीरा, अबब! केव्हडी ती माहीती आपणांस!!!

मला भाषाविद्वान आवडतात. मला वाटतं 'लोकसत्तेमध्ये' पूर्वी ( कदाचित अजूनही) यु. म. पठाण नावाचे भाषाविद्वान, उर्दू नि फारसी भाषेतील फक्त एकच शब्द घेऊन त्यावर दोन कॉलमची माहिती असलेली सदर चालवायचे. मी नेहमी आवडीने वाचायचो.

deplore, condemn ,ridicule , defame , show down , criticize, castigate , denounce , blame , chastise , arraign

हीरा, खूप नवीन समजतंय, कृपया लिहीत रहा. विशेष धन्यवाद.
हर्षद, चपखल उदाहरण!

सिम्बा, धन्यवाद, माहितीपूर्ण आणि उपयुक्त धागा.

दर, मूल्य, किंमत, शुल्क हे मराठीत
तर
इंग्रजीत rate, price, cost, value,worth यात काय फरक आहे?
आता हे शब्द काय connote करतात असं लिहिणार होतो.
खात्री करण्यासाठी connote शोधलं तर imply आणि suggest हे पुढ्यात येऊन ठाकले.
येऊन ठाकले असं सवयीने म्हणतो खरं पण 'ठाकणे' म्हणजे नक्की काय हे चक्र डोक्यात सुरु झालं.

रेट - दर
प्राईस - किंमत
कॉस्ट- खर्च
वॅल्यू - मूल्य
वर्थ- लायकी

i had to pay a big price for this thing because of its value.
but i know it's worth it.
i will happily bear the cost as i know i will not get another like this at any rate.

:d

घर गृह, निवास, सदन, आलय हे का वेगवेगळे असावेत

आता पुन्हा वेगळा आणि निराळा - पुन्हा भंगा चालू. शिवाय बोलतानि आम्ही यच्यासाठी सवता,वायला आसंयबी म्हनीत आस्तोय ह्ये वायलंच.

इंग्रजीतले home house abode dwelling residence हे काय बरे दर्शवतात.

भारी धागा आणि प्रतिसाद! मराठी thesaurus (शब्दकोश?) तयार झाली तर कितीतरी न वापरातले शब्द पुन्हा वापरात येतील. मजा येईल!

भारी धागा आणि प्रतिसाद! मराठी thesaurus (शब्दकोश?) तयार झाली तर कितीतरी न वापरातले शब्द पुन्हा वापरात येतील. मजा येईल!

Wages, salary, earning, income, remuneration, compensation,
रोजंदारी, पगार, वेतन, कमाई, उत्पन्न, मानधन, मेहेनताना, भरपाई

बायको आता मॅडम असते. कधीकधी/ केव्हाकेव्हा मिसेस असते. 'ही' पण असते.
एखादा काका 'मंडळी' म्हणायचा. तर कुणाचं बि-हाड' असायचं. 'खटलं' सुद्धा असतं.

विरुद्ध बाजूला 'मिष्टर' 'हे' 'मालक' असतात.

सगळ्यात भारी 'पोरांचा बाप' आणि 'पोरांची आई'. Lol

मस्त धागा! Happy
अनेक नविन नावे समजली. त्यातील सुक्ष्म फरक कळला.

'अभिमान', 'स्वाभिमान', अहंकार ' 'गर्व', 'ताठा', 'माज' या शब्दातला फरक ही सान्गा कुणीतरी.
त्यात्ल्या त्यात 'माज' म्हणजे गर्वाचे अत्युच्च टोक आणि अगदीच नकारात्मक छटा असलेला अस समजतय.

राजीव, हे पण कमळाचेच नाव तसेच उत्पल पण.
रातोत्पल, नीलोत्पल अशी देखील नावे.

मुलींच्या नावात कमल, कमला ( लक्ष्मी), सरोज, कमळा आणि कमळजा.. पण यातही मी अनुभवल्याप्रमाणे सरोज हे नाव जास्त करुन कोकणात तर कमळजा देशावर ( तेदेखील आता फारसे वापरात नाही.)

पंकज हे पण कमळाचेच नाव.. फोड करुन बघितली तर चिखलात जन्मले ते. यावरुन आपल्याच मूलाचे नाव पंकज कसे ठेवायचे ? असे आईबाबांना वाटायला हवे.

नलिनी पण कमळाचेच नाव.. हा हन्त हन्त नलिनी गज उज्जहार.. या श्लोकावरुन मी शाळेत असताना बाईंना त्रास दिला होता. चि. वि. जोशींच्या, काटकसरीचे प्रयोग यात बहुदा हा संदर्भ आला होता. आमच्या तेलंग बाईंनी, अरे देवा, हतीने कमळ उपटून टाकले. असा शब्दार्थ लगेच सांगितला, पण त्याचा पूर्ण श्लोक शोधण्यासाठी त्या रात्री उशीरापर्यंत लायब्ररी मधे थांबल्या होत्या.

पुर्ण श्लोक आता आठवत नाही पण अर्थ नक्कीच आठवतोय...

एक भ्रमर कमळात बंदी झाला. सकाळ होताच कमळ परत उमलेल व आपली सुटका होईल, असा विचार त्याने केला, पण त्या आधीच हत्तीने कमळ उपटले !

आता साड्या नावाने ओळखल्या जात... पुर्वी साडी सोबत पातळ, लुगडं, नेसू असे शब्द वापरात होते. जॉर्जेट च्या साड्यांना पातळ म्हणत तर टिपीकल काठ पदराच्या साड्यांना ( शक्यतो नऊवारी ) लुगडं म्हणत. नेसू शब्द आजीच्या वापरात होता.

सातींनी वर कॉस्ट चा अर्थ खर्च असा दिलाय तो व्यवहारात नक्कीच वापरात आहे, अकाऊंटस किंचीत वेगळा अर्थ म्हणजे ती वस्तू विकत घेण्यासाठी आलेला खर्च किंवा उत्पादीत करण्यासाठी आलेला खर्च असे अर्थ होतात.
अर्थशास्त्रात आणखी वेगळे संदर्भ येतात जसे अपॉर्च्यूनिटी कॉस्ट ( म्हणजे एखाद्या वस्तूचा एक उपयोग करताना, जो दुसरा उपयोग टाळला जातो तो )

इतर शास्त्रातही वापरले जाणारे शब्द आणि व्यवहारातले अर्थ वेगळे असू शकतात.
उदा. स्पीड.. फिजिक्स मधे स्पीड म्हणजे कायम दिशा आणि वेग असे असते ( असे शाळेत वाचल्याचे आठवतेय ) आणि आपण व्यवहारात ज्याला स्पीड म्हणतो ती असते व्हेलॉसिटी.

रात्रर्गमिष्यती भविष्यती सुप्रभातम,
भास्वान उदेंष्यती, -----पंकजश्री
इति ----- कोषागते द्विरेफे
हा हंत हंत नलिनी गजमुज्जहार

शुद्ध लेखन, त्यातून संस्कृत, त्यातून मोबाइल वर सॉरी, वरचा श्लोक लिहायला हातच घालायला नको होता

रात्रर्गमिष्यती भविष्यती सुप्रभातम,
भास्वान उदेंष्यती, -----पंकजश्री
इति ----- कोषागते द्विरेफे
हा हंत हंत नलिनी गजमुज्जहार

शुद्ध लेखन, त्यातून संस्कृत, त्यातून मोबाइल वर सॉरी, वरचा श्लोक लिहायला हातच घालायला नको होता

"Tell me a Tale of mouse's Tail!"

हे उदाहरण आमचे शाळेत इन्ग्रजीचे सर कायम द्यायचे!
इथे 'टेल' हा एकच उच्चार जरी इन्ग्रजी स्पेलिन्ग वेगवेगळे असले तरी तो शब्द कसल्या संदर्भात उच्चारला आहे बोलताना त्या वरुन अर्थ स्पष्ट होतो!

तसेच अनेक मराठी शब्द आहेत ज्यांचा वापर वाक्यात कशय संदर्भात केलाय त्यावरुन एकदम भिन्न अर्थ संभवतो!

'संभव' ह्या शब्दाच्याच छ्टा अनेक होतात! जाणकार योग्य रितीने सांगतील!

'बोल'

बोबडे बोल / बोल लावणे

अर्थ बदलला असे बरेच आठवतील तसे लिहीन..

Joy, happiness, pleasure, bliss, delight, enjoyment, gladness

तसा ह्या सगळ्याच शब्दांकरता आनंद हा एकच मराठी शब्द लागू होऊ शकतो पण काही प्रमाणात सुख, मजा, खुशी, मौज, मस्त्/छान वाटणे अशा शब्दातून ह्या इंग्रजी शब्दांच्या अर्थ छटा व्यक्त करता येतील असे वाटते.

अर्थात शाळेत असताना 'आनंद' ला समानार्थी मोद हर्ष आमोद उल्हास असे पाठ केल्याचे आठवतात, पण एरवी कधी वापरलेले पाहण्यात नाहीत.
अधिक खुलासा व्हावा.

Pages