चलनी नोटांचे निर्धनीकरण - सध्याच्या परिस्थितीवर उपाय सुचवणे

Submitted by .... on 18 November, 2016 - 04:34

( फक्त सध्याची परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी आपण सामान्य काय करू शकतो याबद्दलच सुचवण्या अपेक्षित आहेत. लायन किरकिरे टोळीने इथे पायधूळ झाडून रडगाणे गात बसू नये ही नम्र विनंती).

मोदी सरकारने घेतलेला निर्णय हा अपरिहार्य होता. कुणीतरी तो घ्यायला हवा होता. मागचे आपले पीएम अर्थविद्वान होते. पण त्यांना पीएम चे अधिकार काय असतात हे ठाऊक नव्हते. म्हणूनच मोदींजींनी घेतलेल्या निर्णयावर बहुतेक जण समाधान व्यक्त करताहेत. अंमलबजावणीत त्रुटी राहिल्या असतील, त्याचा दोष मोदीजींनी देण्यात अर्थ नाही. कारण हा निर्णय सर्वस्वी रिझर्व्ह ब्यॅंकेचा आहे. त्याला मोदी सरकारने इच्छाशक्तीचा पाठिंबा दिलेला आहे. निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसणारच आहेत.
आपण या निर्णयाला पाठिंबा देऊयात आणि त्याचाच भाग म्हणून सध्या होत असलेल्या गोंधळावर किरकिर न करता मार्ग कसा काढता येईल याचे उपाय शोधूयात. ते जमेल तसे व्हॉट्स अप, फेसबुक च्या माध्यमाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल.

उदा.
१. जास्तीत जास्त व्यवहार ऑनला करूया.
२. लागतात तेव्हढेच पैसे जवळ ठेवू (पाचशे रु बस झाले).
३. कर भरून व्यवहार करू. सवय लावून घेऊया.
४. अ) सध्या काही दिवस विनाकारण प्रवास नको करूयात, खर्च नको.
ब) सायकल चालवूयात. जवळच्या अंतरांसाठी (पाच किमीच्या परिसरात) चालत जाऊ. पूर्वीच्या काळी लोक सहजच ५० किमी अंतर चालत असत.
क) उत्तर भारतात सुरू असलेल्या सायकल रिक्षा संपूर्ण भारतात चालू करा अशी मागणी व्हायरल करू. असे झाले तर रोजगार मिळेल. इंधन वाचेल आणि आवश्यक तेव्हां स्वस्तात प्रवासाचा प्रदूषणमुक्त पर्याय उपलब्ध होईल. हा पर्याय पण लॉंगटर्म मधे फायद्याचा ठरेल.
५. शक्यतो आजारी पडायला नको. व्यायाम करायचा. बाहेरचं खायाचं नाही. त्यामुळे मेडीकल सर्विस वर पैसे खर्च होणार नाहीत. त्यांच्यावरही सुट्ट्या पैशांचा ताण येणार नाही. (मेडीकल मधे कार्ड रीडर असतात. डॉक्टरांनी कार्ड रीडर बसवून घ्यावेत
६. किराणा जिथे प्लास्टिक मनी स्विकारला जातो तिथून भरू. (काही दिवस)
७. जवळच्या भाजी मार्केट, किरकोळ विक्रेते यांच्याकडे जा. (जमेल तितक्या) या विक्रेत्यांना मोबाईल वरून नेटबॅंकिंग शिकवा. मोबाईल वॉलेट, पेटीएम शिकवा. त्यांचाही धंदा चालू राहील. तुम्हाला पुण्य लाभेल. ( या छोट्या विक्रेत्यांना सरकार तर्फे स्वस्तात किंवा मोफत कार्ड रीडर देण्यासाठी मोहीम चालू करता येईल. यात फायदा सर्वांचाच आहे).
८. लग्न इ. समारंभ यासाठी भेटी स्विकारू नका, देऊही नका. शक्यतो सर्व कौटुंबिक, सामाजिक कार्यक्रम पुढे ढकला. यामुळे खर्च होणार नाही आणि नवीन नोटांची आवश्यकता पडणार नाही.
९. गरजा अगदी माफक ठेवा. शक्य झाल्यास आठवड्यातून एक दिवस उपवास करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे आरोग्यही सुधारेल.

चुका असतील तर क्षमस्व
कृपया उपाय सुचवावेत ही नम्र विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आज पेटीम वापरून पहिले, सुटसुटीत वाटले. त्याने प्रभावित होऊन आमच्या पानवाल्याला सानीतले तर म्हणे नकोच ती बला. दिवसात किती धंदा झाला ते त्यांना कळेल.

नांदेड सिटीचे फोटो माझ्या मोबाईल क्यामे-यातून घेतले आहेत. ५ डॉलर फंड भारतात येऊन जमाना झाला. उगीच संशय घ्यायचा .... कल्याणीनगरात ट्रंपजींच्या प्रोजेक्टमधे कामाला होते हे सुद्धा मेन्शन केले आहे. आता कल्याणीनगर अमेरिकेत असेल तर मला माहीत नाही. सीबीआय मधे ओळखी असतील तर ट्रंप हाऊस मधे विचारा मि. अ‍ॅण्ड मिसेस हरिनामे.

टू मच.

<<ज्या भगतांना आता ढोल वाजवावे वाटताहेत, त्यांना अजून नीटसे चिमटे बसलेले नाहिएत. चिमटे बसलेल्या भक्तांची भजनं बदलू लागलेली आजच ऐकून आनंदित झालो आहे>>
----- ते चिमटे पण देशप्रेमी लोक देशासाठी आनन्दाने झेलतील... झालेल्या जखमा ते अभिमानाने मिरवतील...

बहुतान्श काळे पैसेवाले त्यान्च्या पैशान्सोबत सेफ आहेत. साधी सरकारी नोकरी पण मुम्बईत चार फ्लॅटस, पुण्यात ३, नाशकात २, गडगन्ज सोने, युरोपात १ घर, बाहेरच्या बॅन्कात पैसा असणारे सर्व सेफ आहेत.

उदयजी, धाग्याचा विषय नाही तो .
काहींना सांगून फायदा नाही म्हणून सांगत नाही. (आजपासून इन्कम टॅक्सच्या नोटिसा सर्व होतायत हे उत्तर दुसरीकडे दिलंच असतं).

...

सपना हरिनामे | 19 November, 2016 - 00:19
मोरपंखीज, राग मानू नका , पण या धाग्याचा हा विषय नाही. >>

तस काही नाही सपना..मी राग नाही मानत..

हा प्रश्न या साठी होता..कारण याच्या उत्तरातुन जे प्रती प्रश्न येतील त्यच्या प्रत्येकाच उत्तर हे तुमच्या "चलनी नोटांचे निर्धनीकरण - सध्याच्या परिस्थितीवर उपाय सुचवणे" याच उत्तर असेल..

मी प्रश्न काढुन टाकतो.. ( हा प्रश्न तुमचे मुद्दा क्र. ३, ६, ७ याच्याशी रिलेटेड आहे)...

हिरा, गांधींची आठवण मलाही झाली ते वरचे गरजेचे आकडे वाचून.

झाडू
>>>>
मी १० रुपये माझ्या एका अकाउंटमधे भरले. वा १० रुपये काढले.
तर या एका ट्रँजॅक्शनसाठी बँकेला अ‍ॅक्चुअल खर्च किती येतो?
बँकिंग प्रणालीमधे रोज होणार्‍या हायपोथेटिकली करोडो ट्रँजॅक्शनपाठी अ‍ॅक्चुअली किती पैसे 'खर्च' होतात, अर्थात वाया जातात? (जे कॅश व्यवहारात होत नाहीत)
>>>>
टुमचा नेमका प्रश्न काय आहे? की अधिक व्यवहार ऑनलाइन बँकमार्फत होवू लागले तर खर्च वाढेल? कारण प्रत्येक व्यवहाराचा एक फिक्स्ड खर्च असतो? (कॉस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन, नॉट प्राइस)?

मोरपंखी.
काही प्रतिसाद असंबद्ध येत राहील्याने तुम्हालाही तसे उत्तर दिले गेले. क्षमा असावी.

Pages