जाताना तिची सावली फरफटत गेली ...

Submitted by बाळ पाटील on 17 November, 2016 - 07:19

आता रात्रही कूस का पालटत गेली
चिमणी एक स्वप्नातली फडफडत गेली

हानी वादळाने कुठे एवढी झाली
साधी वावटळ अंतरी या उठत गेली

जे मौनातले , सांगणे राहिले बाकी
तोवर ती फलाटातुनी धडधडत गेली

एकांतास रिझवायचा यत्न केला मी
उचकी लागली अन् तशी ती सुचत गेली

हा आक्षेप नाही तिच्यावर तसाही पण
जाताना तिची सावली फरफटत गेली
_बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेम
~~~~~~~~~~~~~~
तु दुर आसुनही
आठवन तुझी येते मला...
तुझ प्रेम नसतानाही
तुझ्याविना करमेना मला....
काय पाहील तुझ्यात मी
ओड कसली वेड्या मनाला....
तु माझी नाही तरीही
हे बोल कसले सुचती मला....
बोलतेस तु गोड फार
कळत नाहीत शब्द मला....
शब्दांची ही जोड कसली
यालाच म्हणतात का....
प्रेम नसताना
करासची असती मैत्री....
मित्र झालो तुझा मी
प्रेमातली ही हार कसली....
हे खरे असेल
म्हणायचो मी जणांना....
बाटुकलीच्या खेळामधली
एक राजा आणिक राणी....
अर्धावरती डाव मोडला
राहीली एक कहाणी....
- राम नखाते

आठवणीतल प्रेम
**************************
आठवणीच्या आठवणीतली |
आठवण मला आज आली ||
डोळे उघडे असताना |
हसलो मी गालातल्या गाली ||

प्रेमातले दिवस आठवले मला |
किती आनंद मनी खेळतो ||
सोडुन गेल प्रेम माझ |
त्रास मात्र आज मला होतो ||

कायच प्रेम न मिळवता |
कधीतरी प्रेम केलो होतो ||
प्रेमाचे चार दिवस |
मी ही आनंदात घालवत होतो ||

आता फार दु:ख झाल |
प्रेम पुन्हा सोडुन गेल ||
प्रेमाचे दिवस आठवता |
ह्रदय आजही भरुन आल ||
- आर.एम.नखाते