ऑनलाइन साडी खरेदी: पुण्यात पाठवण्यासाठी

Submitted by ज्ञाती on 8 November, 2016 - 21:57

नमस्कार मायबोलीकर,

मी अमेरिकेतून ऑनलाइन ऑर्डर करता येईल अशा वेबसाइट च्या शोधात आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त साडी पाठवायची आहे. पैठणीकरिता ओन्लीपैठणी वरून पुर्वी उत्तम अनुभव आहे. यावेळी दुसर्‍या कोणत्यातरी पद्धतीची साडी मिळाली तर बरे.

काही माहिती असल्यास कृपया इथे देवाणघेवाण करा. आगाउ धन्यवाद Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

www.parisera.com

खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांचं मस्त कलेक्शन आहे. इथून घेतल्या आहेत साड्या एकदोनदा. एकूण अनुभव चांगला होता. साड्या नीट क्वालिटी चेक करून पाठवल्या जातात, तशी नोटही त्यावर लावलेली असते.

handsonindia.com चा मला चांगला अनुभव आहे. पण त्यांच्याकडचे ऑप्शन्स कमी आहेत सिल्क मध्ये. हॅंडलूम कॉटन मध्ये बरेच ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे.

धन्यवाद सर्वांना!

भानुप्रिया, मीपण ही साइट बघितली. कस्टमर सर्विस कशी आहे याचा काही अंदाज येत नाही. साड्या छान आहेत खरं.

ज्ञाती, www.utsavonline.com वरं भरपूर व्हरायटी असते. मला कस्टमर सर्विसचा अनुभव नाहीये कधी ऑर्डर न केल्यामुळे.

सायो, हो ती साइट अगदी पहिल्यांदाच सुचली होती पण माझ्या माहितीत कुणी तिथुन घेतली नाहीये.

हाय सिंडे, रावी चा अनुभव कसा आहे तुझा?

http://www.abof.com/ इथे पण चांगले कलेक्शन आहे किमती पण चांगल्या आहेत. क्वालिटी मात्र तपासुन घ्यावी लागेल.

चांगला आहे गं रावीचा अनुभव. मी पैसे ट्रान्सफर केल्यावर दुसर्‍या दिवशी लगेच त्यांनी साडी शिप केली. तोपर्यंत पैसे डिपॉझिट सुद्धा झाले नव्हते. साडीची क्वालिटी फारच चांगली आहे. पॅकिंग छान होतं. कस्टमर सर्विस पण मस्त. फक्त त्यांनी जो ब्लाउजपीस पाठवला तो फारच साधा होता. साड्या बर्‍यापैकी महाग आहेत त्यांच्याकडच्या. डिझायनर साडी म्हटल्यावर त्याला शोभेसा पीस पाठवतील अशी माझी कल्पना होती.