माणूस वाचताना...

Submitted by स्मिता द on 4 November, 2016 - 03:30

माणूस वाचताना......

पुस्तके वाचता वाचता
आताशा मी माणसेच वाचायला लागले
पाना पानातून ओथंबणारी उत्सुकता
आता मला माणसे वाचताना कळते
प्रत्येक माणसाची कथा वेगळी
व्यथा वेगळी अन आनंदही वेगळा
चेहऱ्यावरची एक एक रेघ
जणू होतो एक एक मेघ
कपाळावरची आठी
गालावरची खळी
सांगते कथा निराळी
आवाजातून कळते,
बोलण्याची ढब सांगते
आवाजातला गोडवा गातो
अन कडवा ध्वनी होतो
सांगावा सगळ्या क्षणाचा
पटकन एखादा डोळ्यावाटे येतो
अन कधी ओठावाटे जातो
गंमत आहे नाही
शब्दावाचूनही कळतो
माणूस ...वाचताना

Group content visibility: 
Public - accessible to all site users