क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयला तो जेनिंग किती लहान पोरगा आहे! त्याला त्याच्या आई वडीलांनी पाठवले बरे एव्हढे दूर. Happy

जेनिंग मस्त खेळला. डेब्यू मॅच ला खेळाडू ला हीरो बनवायची अगत्यशील परंपरा आपण कायम राखली Wink

ईंग्लिश कॉमेंटेटर्स करूण नायर ने जेनिंग्ज चा कॅच सोडला अशी हाकाटी पिटत होते. पण लाईव्ह बघताना आणी नंतर रिप्ले बघताना एकदाही असं वाटलं नाही की 'कॅच सोडला'. त्याने चांगला प्रयत्न केला, पण हाताच्या वरच्या भागाला लागून बॉल गेला. ४०० च्या आत गुंडाळलं तर बरं होईल.

त्याला त्याच्या आई वडीलांनी पाठवले बरे एव्हढे दूर. स्मित >>> हो ना, ते सुद्ध अश्या देशात जिथे लोकं गारुडी बनून येतात आणि पोरं पळवून नेतात....

बादवे, किती वयाचा आहे तो? सुरुवातीला एजेस उडूनही किती पॉजिटिव्हली खेळला.. शतकाजवळही पाय व्यवस्थित काम करत होते. हा एटीट्यूड एखाद्या प्लेअरला त्याच्या पात्रतेच्या पुढे घेऊन जातो.

उद्याची पहिले विकेट फार महत्वाची आहे. दोन असे प्लेअर खेळत आहेत जे चान्स देत राहतील पण टिपले नाहीत तर बघता बघता ७०-८० ची भागीदारी करत सामना दूर घेऊन जातील ... ४०० जवळ पोहोचले फारच अवघड झाला सामना.

प्रत्यक्ष बघताना तरी तो ड्रॉप वाटला खरा, फेरफटका.

वानखेडे पिच डिटीरिओरेटिंग असे क्रीकइन्फो कॉमेंटेटर म्हणतो, पण मला तसे वाटत नाही. चोप्रा म्हणतो त्याप्रमाणे ते ट्रू बाऊन्स टिकवून ठेवेल. उद्या पहिल्या काही ओव्हर्समध्ये योग्य लाईन आणि लेंग्थ पकडणे क्विक्ससाठी महत्वाचे आहे, अन्यथा स्कोर अचानक बराच पुढे निघून जाईल. आज तेच झाले. स्लीप कॅचिंगदेखील महत्वाचे ठरणार आहे. जुना बॉल रिव्हर्स होत नाही किंवा शामी नसल्याने तो होत नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. आजच्या हिटमध्ये अश्विनने सिंहहृदयी बॉलिंग करून बरीच षटके टाकली, पण क्विक्सनी त्यांचा भार उचलला पाहिजे.

उद्याची पहिले विकेट फार महत्वाची आहे. दोन असे प्लेअर खेळत आहेत जे चान्स देत राहतील पण टिपले नाहीत तर बघता बघता ७०-८० ची भागीदारी करत सामना दूर घेऊन जातील ... ४०० जवळ पोहोचले फारच अवघड झाला सामना. >> +१

वानखेडे पिच डिटीरिओरेटिंग असे क्रीकइन्फो कॉमेंटेटर म्हणतो, पण मला तसे वाटत नाही >> +१. एव्हढे ग्रीन आहे भोवताली कि लगेच फुटेल असे वाटत नाही. शमीची कमी जाणवली खरच. भुवीचा पेस कमी पडतो राव.

भा, तुला मानले पाहिजे कि अजूनही स्टेडियम मधे जाऊन मॅच बघतोस. मला कंटाळा येतो अलीकडे अगदी लिमिटेड ओव्हर्स बाहेर बसून बघायला. घारी मस्त तंगड्या वर करून लोळत सामना बघायची मजा जास्त भावते Wink

गेलीं कांहीं वर्षं वानखेडेची खेळपट्टी 'अनप्रेडीक्टेबल' या सदरातच मोडते आहे. त्यामुळे, त्यावर आधारित भाकीतं न करणंच शहाणपणाचं ! .पण पहिल्या डावात इंग्लंडला आघाडी [ निदान मोठी आघाडी ] मिळूं न देणं, हें मात्र सर्वात शहाणपणाचं !!!

स्टोक्स आउट नव्हता असे कॉमेंटेटर सांगतायत.... DRS हाणुन पाडायची सुपारी घेतलीय वाटत!
मलातर clear deflection जाणवले!

मलातर clear deflection जाणवले! >> Exactly
Manjarekar should be removed from commentary
He was hell bent on showing Indian third umpire made mistake , Where we can see the deflection
Even Nasser Hussain saw that !!!
Then I think he got foot in mouth, so apologised !!

असाही मला तो कधी आवडत नाही , कायमच रडतो , आपण इंडियन्स अतिशय लो क्लास आहोत अस त्याला का वाटत कळत नाही

इंग्लंड लेगसाईड ट्रॅप लावतायत. पुजाराने डान्सिंग शूज घालून स्पिन बोलरच्या डोक्यावरून किंवा लॉंग ऑफच्या दिशेने मारायचा प्रयत्न करायला हवा, असे वाटते.

बॉलच्या बॉलिंगवर लॉंग लेग आणि डीप फाईन लेग आहेत, त्यामुळे शॉर्ट बॉल ट्रॅप आहे. फुल बॉल्सवर कव्हर ड्राइव्ह ल्युअर करून स्लीप कॉर्डनकडे काम सोपवायचा विचार दिसतो. त्यामुळे आता लॉंग ऑफ ते लॉंग ऑन ह्या पट्ट्यात सरळ बॅटने खेळणे स्कोरींग ठरू शकते.

विजय पुजारा मस्त खेळले. डॉमिनेट करायचा अ‍ॅप्रोच होता. भारत भारतात खेळतेय आणि ईथे आम्ही बाप आहोत असे आज वाटत होते.

केदार जाधव, मांजरेकर विषयी मी मागे पण बरच लिहीलय. तो माणुस, खेळताना आणी नंतर कॉमेंट्री करताना सुद्धा पुष्कळ वेळा डोक्यात गेलाय. सर्व मुंबई क्रिकेट फॅन्स ची मनापासून क्षमा मागून म्हणीन की आडनाव मांजरेकर नसतं (विजय मांजरेकर विषयी चे किस्से वाचले, तर असं म्हणू की ईट रन्स इन अ फॅमिली) आणी मुंबई चा नसता, तर कुणी विचारलं असतं की नाही कुणास ठाऊक? तो आणी शास्त्री समोरासमोर बसवले तर गुरकावण्याची, माज करण्याची आणी पु. लं. च्या पुणेकरांच्या वर्णनातल्या, 'आपण कोण आहोत, एकंदरीत दर्जा काय ह्याचा विचार न करता मत ठोकून देण्याची' एक नेव्हर एंडिंग स्पर्धा बघता येईल.

असो. पुजारा आणी विजय मस्त खेळले, पण खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. हे दोघं आणी विको ला मोठ्या खेळ्या कराव्या लागणार आहेत. शक्यतो पुन्हा बॅटींग करावी लागू नये, किंवा लागलीच तर लहान टारगेट असावं.

<< .शक्यतो पुन्हा बॅटींग करावी लागू नये, किंवा लागलीच तर लहान टारगेट असावं.>> म्हणजे आपल्या पहिल्या डावात कमीत कमी ५५० धांवा ! फेरफटकाजी, क्रिकेट्मधे कांहींही होवूं शकतं, पण हें फारच आशावादी आहे असं नाहीं वाटत ? माझं << पण पहिल्या डावात इंग्लंडला आघाडी [ निदान मोठी आघाडी ] मिळूं न देणं, हें मात्र सर्वात शहाणपणाचं !!!>> हें मला तरी अधिक वास्तववादी वाटतं.

"हें फारच आशावादी आहे असं नाहीं वाटत ?" - वचने किं दरिद्रता ह्या न्यायानं म्हटलं मी. पण तुमचं बरोबर आहे (कमीत कमी आघाडी).

हे पिच जर खरच खूप टर्न व्हायला लागलं, तर ४ थ्या डावात २०० धावा सुद्धा चॅलेंजिंग ठरू शकतात.

<< वचने किं दरिद्रता ह्या न्यायानं म्हटलं मी >> फेरफटकाजी, हीं पोरं तुमचं खरं ठरवायला आणि मला धपाटा घालायलाच निघालीत ! २२१-२ !! पण त्यांतही मला आनंदच आहे !!!

विजय पुजारा मस्त खेळले. डॉमिनेट करायचा अ‍ॅप्रोच होता. भारत भारतात खेळतेय आणि ईथे आम्ही बाप आहोत असे आज वाटत होते. >> का ही ही काय. प्रचंड कॉशसली खेळत होते. भारताला आऊट ऑफ द वूड्स घेऊन जायला. ३ पेक्षा कमी रनरेट होता. विजयने तर कितीतरी मारता येण्यासारखे मोईन अलीचे बॉल्स सोडून दिले. चेपुने फायनल तासात जरा शॉट्स मारले, म्हणून रेट ३ च्या आसपास राहिला. ५२ ओव्हर्समध्ये १७०-१७५च्या आसपास धावा झाल्या असत्या, तरी एक वेळ ठीक होते. आता आज कोहली डॉमिनेट करायचा प्रयत्न करतो आहे.

भाऊ, ५५० ची गरज नाही. ७०-८० धावांची आघाडी घेतली, आणि चौथ्या दिवशी स्पिनिंग पिचवर इंग्लंडला २००-२२५ धावांत अश्विन आणि कं.ने गुंडाळले, तर १२५-१५० चे टारगेट हे अतिकठीण नसेल.

मांजरेकर ची कॉमेंट्री ऐकण्यापेक्षा चायनीज पॉप संगीत ऐकावं. ईसीबी कडून तनखा वगैरे येतो का त्याचा?

<< भाऊ, ५५० ची गरज नाही.>> भाचाजी, << शक्यतो पुन्हा बॅटींग करावी लागू नये, >> यासाठी ती किमान गरज म्हटलंय मीं ! Wink
<<(विजय मांजरेकर आ विषयी चे किस्से वाचले, तर असं म्हणू की ईट रन्स इन अ फॅमिली) >> [ विजय मांजरेकरचा आमच्या लहानपणीं फार बोलवा होता; मीं 'कांगा लीग'मधे तो शिवाजी पार्कचा कर्णधार म्हणून खेळताना त्याला जवळून पाहिलाही आहे. तो फटकळ, शिवराळ होता , मेहनती व प्रतिभावान होता, पण jealous व snobbish नव्हता; तेंव्हां, वारसा हक्काचा याबाबतीत तरी दाखला संजयला देणं योग्य नसावं !]

भाचाजी, << शक्यतो पुन्हा बॅटींग करावी लागू नये, >> यासाठी ती किमान गरज म्हटलंय मीं ! डोळा मारा >>> राईट. माय मिस्टेक, भाऊ! Happy

जो रूट गॉट २ विकेट्स! इंडिया गिफ्टिंग देम टू पार्ट-टायमर्स. आता सर जडेजा कोहलीची साथ देतील का?

कोहली, वेल प्लेड ! डावाचेही ४०० पार झाले !
आतां जितकी पहिल्या डांवाची आघाडी अधिक, तितकी जिंकण्याची निश्चिती अधिक !

Pages