टेम्प्लेटस् - भाग - १

Submitted by सचिन काळे on 31 October, 2016 - 06:02

मायबोलीचा सभासद होण्यापूर्वी मी 'कायअप्पावर' फारच सक्रिय होतो. त्यावेळी मी निरनिराळ्या माध्यमातून जे काही वाचायचो, बघायचो; त्यातील काही आवडले तर मला आतुन असं वाटायचं कि हे कोणालातरी सांगावं, दाखवावं. पण मी ते नुसतं फॉरवर्ड, कॉपी पेस्ट किंवा स्क्रीनशॉट घेऊन पाठवण्याऐवजी, अक्षरं लिहिण्याकरीता अँड्रॉइडवर असलेल्या काही एप्लिकेशनचा वापर करून, निरनिराळे टेम्प्लेट बनवून पाठवत असे. त्यातील काही मी येथे सादर करीत आहे.

कृपया नोंद घ्यावी कि टेम्प्लेटमध्ये असलेली साहित्यरचना हि माझी बिलकुल नाही. त्यास मी फक्त माझ्या आवडीप्रमाणे टेम्प्लेटच्या कोंदणात बसवलेय. फक्त थोरामोठ्यांच्या वचनांचा मी काही ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे मराठीत अनुवाद केलेला आहे.

आपणांस सर्वच टेम्प्लेटवर 'सचिन काळे' हे नांव टाकलेले आढळणार नाही. त्याची काय गंमत झाली कि सुरवातीस मी बरेचसे टेम्प्लेट नांव न टाकता बनवले होते. मग माझ्या मनात विचार आला कि आपण त्यावर आपले नांव का टाकू नये? म्हणून मी त्यावर माझे नांव टाकण्यास सुरवात केली. तर मला असा अनुभव आला कि लोकं माझे नांव क्रॉप करून ते फॉरवर्ड करू लागलेत. मग मी कंटाळून त्यावर माझे नांवच टाकणे बंद केले.

तसेच हि काही पारंपारीक कला नाही. त्यामुळे ह्या कलेस काय नांव आहे, हे हि काही मला ठाऊक नाही. आपणच ह्या कलेस काही चांगलसेे नांव सुचवून त्यातील रचना, रंग, आकार आणि साहित्याचा आनंद घ्यावा.


१०

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users