चेहरा

Submitted by ashokmane on 26 February, 2009 - 04:49

चेहरा
मी एक सुंदर पाहिलेला चेहरा
पाहताच प्रेमात पडावा असा
प्रेमात पडून डुबून जावा असा
डुबून प्रेमात मनसोक्त आनंद घ्यावा असा
आनंद घेवून आयुष्यभर आठ्वणीत ठेवावा असा
आठवणीत ठेवून आयुष्याच्या
वळणावर स्फुरण व्हावा असा
स्फुरण होवून अधिकाधिक चांगले
काम करण्यास स्फुर्ती देणारा असा
चांगले काम असे ते म्हणजे
सर्वोत्तम व सदा उपयोगी असे
सदा उपयोगी काम करीत असताना
वाईट काही घडलेच तर त्यामध्ये
विवेकी बुध्दी जागृत ठेवणारा असा
विवेकी बुध्दी सदा जागी ठेवूनी
समाजाला जागृत करण्यास प्रवृत्त करणारा असा
समाजाला जागृत करुन सर्वाच्या मध्ये
प्रेम भावना निर्माण करुन स्वता: च
स्वता:ला आदर्श बनवा असा
स्वता: च स्वता:ला आदर्श बनून
परमेश्वराशी एकरूप होवा असा
अंतात विलीन होवून सर्वामध्ये
तोच सुंदर चेहरा दिसावा असा
मी एक सुंदर पाहिलेला चेहरा
पहाताच प्रेमात पडावा असा ........

गुलमोहर: 

अशोक माने, ही कविता आहे? प्रत्येक लाईनमध्ये "असा - असा" रिपीट करून यमक साधत नाही..
माफ करा, पण चुकला बरका प्रयत्न.. रटाळ एकदम.. Sad

अशोक माने,
यमक साधण्याच्या प्रयत्नात कवितेची मजा निघुन गेली आहे. मात्र प्रयत्न छान होता.
----निकी

अरे अजुन एक...

प्रेम भावना निर्माण करुन स्वता: च
स्वता:ला आदर्श बनवा असा
स्वता: च स्वता:ला आदर्श बनून
परमेश्वराशी एकरूप होवा असा
अंतात विलीन होवून सर्वामध्ये
तोच सुंदर चेहरा दिसावा असा >> फारच सुंदर... विचारांची उद्दातता आणि भावनांची खोली... लाजवाब...!!!