शब्द

Submitted by निखिल झिंगाडे on 26 October, 2016 - 06:38

कधी शब्द अस्त्र आहे मोहवणारे
कधी गंध सर्वत्र आहे दरवळणारे

कधी शब्द मित्र आहे सावरणारे
कधी हास्य सर्वत्र आहे फुलवणारे

कधी शब्द शास्त्र आहे वाचवणारे
कधी विनोदी शस्त्र आहे हसवणारे

कधी संबंध मात्र आहे जाणवणारे
कधी भावनिक पत्र आहे हरवणारे

कधी लाचारी तंत्र आहे गोठवणारे
कधी सुखाचा मंत्र आहे भासवणारे

कधी मुजोरी सत्र आहे वाकवणारे
कधी भिकारी सावत्र आहे रडवणारे

कधी सर्वथा पात्र आहे वहावणारे
कधी 'अनामिक' सुत्र आहे हलवणारे

अनामिक

Group content visibility: 
Public - accessible to all site users