धरू कष्टाची कास होउ या पास

Submitted by निखिल झिंगाडे on 25 October, 2016 - 11:55

जगता येईल अस द्या शिक्षण खरच सांगतोय
बदला अभ्यास फुटकळ क्लास खरच सांगतोय

ना साधू झालात नाही संत चालेल खरच सांगतोय
माणूस व्हा घ्या माणूसकीचा ध्यास खरच सांगतोय

कसे जगलात का जगलात महत्वाची ही बात
काहीतरी शिकवतो प्रत्येक श्वास खरच सांगतोय

असून दिव्याची काच स्वच्छ आत ज्योत ही हवीच
स्वप्न पाहिले, होईल खरे ही आस खरच सांगतोय

जलबिंदूला अधःपात हा नभातून मोती होण्यास
धरू कष्टाची कास होउ या पास खरच सांगतोय

अनामिक

Group content visibility: 
Public - accessible to all site users