सोडायची नाही आशा निराश व्हायच नाही

Submitted by निखिल झिंगाडे on 25 October, 2016 - 10:52

सोडायची नाही आशा निराश व्हायच नाही
अमृत मिळत नाही जरी विष प्यायच नाही

उत्तुंग भरारी घेऊ या आता थकायच नाही
जिंकलो आता ना जरी आता हरायच नाही

क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही
लढणे अटळ आहे आता रडायच नाही

गरूड उडतो उंच जरी चिमणी उडने सोडत नाही
असतात जरी काटे गुलाबास सुगंध विसरायचा नाही

जिंकणे काय ते हरल्याशिवाय कळत नाही
निसर्गाचा नियम आहे हा आता रडायच नाही

अनामिक

Group content visibility: 
Public - accessible to all site users