स्वप्न तुझे

Submitted by निखिल झिंगाडे on 23 October, 2016 - 03:23

अवसेची रात्र अंधारी दिव्याच्या मंद या प्रकाशात
तुझे स्वप्न पहाने हाच छंद सार्थ आहे

स्वप्न धुंदीत मात्र मन बेधुंद या चांदण्यात
तुझ स्वप्नात येण हा स्वप्नाचाच स्वार्थ आहे

स्वप्न एक आभास जणु बेबंद या मृगजळात
तुझाच ध्यास मनी प्रेम माझ निस्वार्थ आहे

तुझ्या आठवणी स्वप्नी हाच आनंद या जगण्यात
तु माझीच होशील ही आशा व्यर्थ आहे

अनामिका का लागला असला छंद या जिवनात
अशक्य हे तुझ्यशिवाय हे जगने निरर्थ आहे.

-अनामिक

Group content visibility: 
Public - accessible to all site users