माझी वाट

Submitted by निखिल झिंगाडे on 23 October, 2016 - 02:21

मला नाही चालायचे या मळलेल्या वाटांवर,
स्वैर व्हायचय मला मस्त तुफान लाटांवर,

चालेन ताठ मानेने माझ्या स्वतःच्या वाटेवर,
नाहीतर तुम्हाला मी भेटेन स्मशान घाटावर,

नाहीच चालनार मी ही गजबजली वाट,
चालुन बनवेन वाट मी नवीन काट्ंयावर

अडचणी कीतीही असल्या या धेय्यस्थ वाटेवर
दमनार नाही, कायम त्या मी ठेविन फाटयावर

चाललाे सर्वासाठी आणि ही बनलेली वाट
वसेन अनामिक मनी अन मी राहीन ओठावर

Group content visibility: 
Public - accessible to all site users