तु

Submitted by निखिल झिंगाडे on 23 October, 2016 - 00:58

तू साथ मला देणार, तू संग माझी होणार
येशील परत आयुष्यात म्हणुन वाट पाहतो...

तू प्रेम मला देणार, तूू स्वप्न माझे होणार,
घेशील परत अलींगनात म्हणुन वाट पाहतो...

तू पूर्ण मला करणार, तू हद्द माझी होणार
येशील परत तनामनात म्हणुन वाट पाहतो...

तू चैतन्य मला देणार, तू सर्वस्व माझे होणार
आठवशील परत जीवनात म्हणुन वाट पाहतो...

तू अनामिक आस होणार, तू श्वास माझा होणार
येशील खरच आयुष्यात म्हणुन वाट पाहतो...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण वाचतय की नाही ते कळण्यासाठी चुक केलेली ती आता बदललेली आहे धन्यवाद

तू म्हणून आलिंगन, पूर्ण , जीवनात हे ही बदल करावे ही विनंती. तू संगिनी होणार असे करून बघा. नाहीतर लिंगनिरपेक्ष ठेवा. पुढील लेखनास शुभेच्छा.