आठवणींचा पाऊस

Submitted by निखिल झिंगाडे on 22 October, 2016 - 15:57

चिंब ओला पाउस, पावसात चिंब मी
कडाललेली वीज, तुझ्या मिठीत दंग मी...

मिठीत तुझ्याच बेधुंद, विसरलो भान मी
हिरव्या निसर्गात स्वच्छंद , मदमस्त गुंग मी...

बरसनारया अखंड धारा, पाउस आठवणींचा
मदहोश वादळात धुंद, आठवणींचा तरंग मी....

वहावले मन माझे कसे, पहिल्याशा स्पर्शाने
खवळलेल्या दर्याचा, संग आणी सारंग मी...

अनामिका तुच स्वतः, सावरुन घे स्वतःला
हरवलेले मन शोधन्या, पछाडले जंग मी...

Group content visibility: 
Public - accessible to all site users