कितीदा पडलो तरी

Submitted by स्मिता द on 21 October, 2016 - 22:23

उमगत नाही

आपल्या सारखे जग असत नाही
कितीदा पडलो तरी उमगत नाही

अनुभव तेच तेच झुल वेगळी
प्रत्येक वेळची गोष्ट निराळी

साधा संथ सरळ काही असतच नाही
स्थिर पटलाआडचे तरंग कळत नाही

खरंच का जग आपल्या सारखे असत नाही
कितीदा पडलो तरी उमगत नाही

पडझडीत धडपडीत साऱ्या विसरच पडतो
उभ राहायला शिकलोय हे आठवतच नाही

कितीदा आता तेच तेच आणि तसेच
जगणेच बदलल्या शिवाय उपाय नाही

स्वार्थ , लबाडी, ढोंग आणि चोरी
जगण्याच्या ह्या रीती हे कळतच नाही

जागोजागी पडझडीच्या वळण वाटा
सरळ मार्ग का कधी असत नाही

साधा नाकासमोर मार्ग शोधणारा मी
या खाचखळग्यात टिकतच नाही

आपल्या सारखे जग असत नाही
कितीदा पडलो तरी उमगत नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users