काही तरी साधेसे

Submitted by mrsbarve on 19 October, 2016 - 16:38

काही तरी साधेसे :

चकाचक मॉल मध्ये खरेदी करून , कार मधून घरी येते ,पिशव्या सॉरी ब्याग्ज क्लोझेट मध्ये ठेवते आणि बऱ्याचदा ,विसरूनही जाते !मग मॉल मध्ये फिरून केलेली खरेदी,भटकंती थोडी ना लक्षात राहणार ! त्यासाठी जायला हवे भारतात- अजूनही खूप ठिकाणी भरणाऱ्या आठवड्याच्या बाजारात ! तेही उन्हात पाय पिट करत !

गोव्यातला म्हापशाचा बाजार हि असाच लक्षात राहणारा . तिथे आहेत रंग ,चव,वास,आवाज ! उन्हाळ्यातल्या त्या टळटळीत दुपारी असं वाटतं कि सगळीच जनता रंगी बेरंगी कपड्यात आहे आपण फक्त रंग बघताच राहतो,लाल पिवळे ,भगवे,हिरवे-- ,सामानही रंगीत -हिरव्या भाज्या,रंगीत फळे,रंगीत,फुले, फुलांच्या माळा ,सुगंधी फुले बकुळीची,सोन चाफयाची ... त्यांचा मस्त वास ,रंगीत कपडे,
गोड़ कोकणी/गोवन भाषेतली स्त्री पुरुषांची अखंड बडबड.

आळसाण्या च्या राशी,गडद जाम्भळी कोकमाची छोटी पोती ,सोन केळ्याचे घड,आंब्याच्या -माणकुराद च्या राशी,त्यांचा मस्त केशरी पिवळा रंग, आणि स्वर्गीय चव आणि गंध! हे एव्हढाले कापये फणस तर चिंडुकले नीरफणस. रान भाज्या,आजू बाजूच्या टंपर हाटेलातनं दरवळणारा मिरची भजीचा दरवळ! बिया भाजी कशी लागते म्हणून बघायचच अस ठरवून एका रोडसाईड हॉटेलात डोकावले पण त्या कळकटल्या ,माश्याफिरू माहौल ची भीती वाटून बेत बारगळला.

मध्येच दिसणारे बाजारातले कपडे,शोभेच्या गोष्टी ,रंगीत छत्र्या असाल काही बाही विकत घेणारे गोरे .... बाजारात भर टाकणारी आजूबाजूची साधी बाधी बांधलेली दुकाने,त्या एव्हढ्याष्या दुकानात विकायला ठेवलेल्या, खचाखच भरलेल्या हरतऱ्हेचे सामान ,किंवा इतर वस्तू,भाजलेल्या काजी ,कधी कधी दिसणारे चिबूड .

काय माहिती हा बाजार खूप आवडला. काही वर्षांपूर्वी बॉर्न आयडेंटिटी मध्ये असाच एक बाजार दिसला. आणि खरंच तो म्हापश्याचा बाजार निघाला. सिनेमा पाहिलात तर जरूर लक्ष्य द्या ,म्हापशाचा बाजार त्यात दिसेल. मला क्लिक झालेला बाजार हॉलिवूड पटात चित्रित झाला आहे.

फोटो नाहीत ,कसे टाकायचे तेही आठवत नाही ,पण गोव्यात गेलात तर आठवड्याच्या बाजाराला जरूर भेट द्या. तिथल्या बाबाजी मध्ये लिंबू सोडा काय मस्त मिळतो!

(तिथे मासळी बाजारही असावा पण तिकडे कधी जाण्याचा प्रश्नच नाही आला. मुळात ते मेलेले मासे ,टक्क डोळे उघडे ठेवून तुम्हाला बघताहेत हे फिलिंग ,मला तरी डिस्टर्ब् करतं !असो! हे इकडचं तिकडचं झालं!)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users