विटामिन डी

Submitted by वृष on 19 October, 2016 - 01:20

माझा मुलगा आता ३.५ वर्षांचा आहे. मुळात जन्माच्या वेळेस underweight असल्याने त्याचे सगळेच milestones late होते.

पण आता ३.५ वर्षांचा होऊन ही त्याचे चालणे, धावणे अगदी नविन नविन चालायला शिकलेल्या मुलासारखे आहे. तो जागच्या जागी उड्या मारु शकत नाही..... though jumping is not a essential part of our day to day life... still this is a skill that kids acquire very early in life... and mine is not able to do it..... तो खुप प्रयत्न करतो तरीही.

डॉक्टर ना विचारलं तर त्यांनी विटामिन डी ची कमतरता असेल असे सांगितले. आम्ही नॉनवेज खात नाही. तरिही अंडी देतो मधे मधे त्याला. भाज्या त्याच्या वयाच्या मानाने बर्‍यापैकी खातो. आयुर्वेदिक तेलाने मालिश सुद्धा चालु आहे रोज.

विटामिन डी आणि calcium चे syrup त्याला दिले होते ३ महिन्यांसाठी पण constant medication वर ठेऊ शकत नाही म्हणुन आता बंद केल आहे ते syrup.

दुसर्‍यांना एखादी गोष्ट येते पण आपल्याला येत नाही... आपल्या मधे काहीतरी कमी आहे... ही भावना मूळ धरु नये म्हणुन आम्ही कधी त्याला खुप आग्रह करत नाही try करायला.

पण तरीही अजुन काही उपाय आहेत का? काय करता येईल? घरचे म्हणतात शिकेल हळु हळु... पण मलाच राहवत नाहीये आता. प्लीज काहीतरी सुचवा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलापण विटामीन डी ची कमतरता आहे, ईंजेक्शन घेतले ६ आठवड्याला एक प्रमाणे, गोळ्या पण चालु आहेत.
डॉक्टरांनी सांगीतले की ह्यावर अगदी नैसर्गीक ऊपाय एकच कि दररोज किमान १ ते २ तास कोवळ्या ऊनात बसायचे जे शक्य नाही होत आणी एसी टाळायचे ते पण शक्य नाही कारण ऑफिस मध्ये सेन्ट्रालाईज्ड एसी आहे आणी रात्री नसेल तर झोप येत नाही

छानुली, मुलाच्या शाळेची वेळ काय आहे? शाळा सकाळी ८ नंतर असल्यास त्याला सकाळी ७:३० ते ८ पर्यंत शक्य असल्यास मोकळ्या हवेत, उन्हात खेळु द्या. सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे त्याची व्हिटॅमीन डी ची कमतरता भरुन निघेल. पंजाबी लोक त्यांच्या लहान मुलांना ( वय वर्षे २ च्या आतले) तेलाने मालिश करुन सकाळच्या कोवळ्या उन्हात बाजेवर वगैरे ठेवतात, म्हणूनच त्यांना व्हि डी मिळुन ते पुढे तंदुरुस्त बनतात. माझी चुलत काकु काही काळ दिल्लीला होती, तेव्हा तिच्या पंजाबी शेजार्‍यांनी हे तिला सांगीतले होते.

सुट्टीत देखील तुमच्या मुलाला कोवळ्या उन्हात बाहेर भरपूर फिरु द्या ( अंगणात वगैरे)

दुसर्‍यांना एखादी गोष्ट येते पण आपल्याला येत नाही... आपल्या मधे काहीतरी कमी आहे... ही भावना मूळ धरु नये म्हणुन आम्ही कधी त्याला खुप आग्रह करत नाही try करायला.>>>>>>>> मुलावर फोर्स करुच नका, त्याला हळू हळू सगळे शिकवा, काळजी करु नका. उगीच त्याच्याही मनात तसे येऊ देऊ नका.

घरचे म्हणतात शिकेल हळु हळु... पण मलाच राहवत नाहीये आता. प्लीज काहीतरी सुचवा...>>>> घाई करु नका आणी स्वतःही ताण घेऊ नका. बी पॉझीटिव्ह!

डॉक्टर ना विचारलं तर त्यांनी विटामिन डी ची कमतरता असेल असे सांगितले.>>>

व्हिटामिन डी ची चाचणी केली होती का? ऑर्थोपेडीक डॉक्टरना दाखवले होते का? नसल्यास एकदा दाखवून शंका निरसन करुन घ्या.
माझ्या भाच्याला बालपणापासून असा त्रास होता बरेच वर्ष, पण वय वाढत गेले तस तसा त्रास पूर्ण निघुन गेला.

>>विटामिन डी आणि calcium चे syrup त्याला दिले होते ३ महिन्यांसाठी पण constant medication वर ठेऊ शकत नाही म्हणुन आता बंद केल आहे ते syrup.>>>.

हे तुम्ही तुमच्या मताने केले की डॉक्टरी सल्ल्याने केले?
डॉक्टरांनी सांगितल्यासच औषधे बंद करा.

विटॅमिन डी साठी सुर्यप्रकाश आणि डेयरी प्रॉड्क्ट्स किंवा फोर्टिफाइड प्रोडक्ट्स (ऑ ज्यु) ऐकले आहे पण तेलानं मालिश आणि नॉनवेजचा संबंध कळला नाही.

डॉक्टर 'व्हिट डी ची कमतरता असेल' असं नक्की का म्हणाले? ब्लड टेस्ट केली होती का? सिरप त्यांनीच द्यायला सांगितले होते का? इथे मायबोलीवर धागा काढून सल्ला विचारण्यापेक्षा दुसर्‍या एखाद्या डॉक्टरला प्रत्यक्ष भेटून सेकंड ओपिनियन घ्या. लहान मुलांच्या बाबतीत तरी डॉक्टरी सल्ल्यानंच प्रयोग करावेत विशेषतः औषधं आणि सप्लिमेन्ट्सच्या बाबतीत.

सकाळी ७:३० ते ८ पर्यंत शक्य असल्यास मोकळ्या हवेत, उन्हात खेळु द्या.>>> शक्य असेल तेंव्हा नेतो त्याला खेळायला.
घाई करु नका आणी स्वतःही ताण घेऊ नका. बी पॉझीटिव्ह!>>> नक्की. थँक्यु.

हिटामिन डी ची चाचणी केली होती का? ऑर्थोपेडीक डॉक्टरना दाखवले होते का? >> हो. केली होती. थोडे कमी आहे. (हे नंतर आठवलं) पायाचे x-rays पण काढले. everything is normal.

हे तुम्ही तुमच्या मताने केले की डॉक्टरी सल्ल्याने केले?
डॉक्टरांनी सांगितल्यासच औषधे बंद करा.>>>> हो. डॉक्टरंनीच सांगितले.

ह्याने विटामिन डी वाढतं ? >>> विटामिन डी वाढत नाही पण काही muscle weakness असेल तर तो rectify होईल.

इथे मायबोलीवर धागा काढून सल्ला विचारण्यापेक्षा दुसर्‍या एखाद्या डॉक्टरला प्रत्यक्ष भेटून सेकंड ओपिनियन घ्या. लहान मुलांच्या बाबतीत तरी डॉक्टरी सल्ल्यानंच प्रयोग करावेत विशेषतः औषधं आणि सप्लिमेन्ट्सच्या बाबतीत.>>> हो ते चालुच आहेच. होमिओपॅथी चालू केल आहे आता.

ईथे विचारण्याचा उद्देश अजुन कोणाला असा अनुभव आहे का की medically सगळं ओके दिसतयं... पण तरिही बरोबरीच्या मुलांच्या मागे पडतोय.

हे त्याला समजतय ... आणि त्यामुळे तो शाळेत पण एकटा एकटा राहतो. मुलं (boys) धक्का मारतात म्हणुन त्यांच्याशी खेळत नाही अस सांगतो. (Actually खेळण्याच्या नादात धक्का लागतो. आणि हा स्वतःला सावरु शकत नाही.) बिल्डींंग मधे पण मोठ्या मुलांमधे जातो जे त्याला सांभाळुन घेतिल.

नाचणी सत्त्व, मोड आलेली कडधान्ये, दुङ्ह्घट, घट्ट वरण, सुका मेवा, कच्चे अंडे, उकडलेले अंडे, पाया सुप, खेकडा सुप, अळीव लाडु, डिंक,मेथी लाडू, अतिशय चांगले.