असे त्याच्याविना हे वाटते घर

Submitted by सुप्रिया जाधव. on 18 October, 2016 - 08:25

असे त्याच्याविना हे वाटते घर
जणू वागे सजीवागत कलेवर

उपेक्षांचे तिच्या पायात काटे
अपेक्षांचे तिच्या ओझे शिरावर

करपल्या भावना नाजूक साऱ्या
निखारा जाणिवांचा पेटल्यावर

युगांची सोसली असणार घुसमट
टिपेला पोचला होता तिचा स्वर

नभाशी पोचतो दरवळ सुगंधी
स्वतःला खोलवर गाडून बघ तर !

दिवाळीची सफाई होत राहिल
मनातिल जळमटे काढू अगोदर

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users