सांगून झाले सर्वच काही

Submitted by चिट्टी on 17 October, 2016 - 01:56

सांगायाचे होते जे जे
सांगून झाले सर्वच काही
एकच कोडे उलगडले की
तुझे नी माझे जमणे नाही

शांत तळ्यासम निर्मळ जीवन
त्यात टाकता बाधित काडी
डुचमळले जे गढूळले जे
पुन्हा कधी लखलखणे नाही

इथे अपेक्षा तिथे उपेक्षा
मेळ न लागे दोघांनाही
बोचकारणे चिडचिड करणे
हे आता बघ शमणे नाही

नवलाईचा नवाच रस्ता
शोधूनी तू गेलास दूरवर
ओळखीच्या वाटेवर माझ्या
उगी तुला परतवणे नाही!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

Celebrate the break up का अशी काहीतरी टॅगलाईन असलेला नवीन चित्रपट येतोय ना? छान लिहीलीय कविता.