पिंक -- रिफ्लेक्शन

Submitted by सई केसकर on 3 October, 2016 - 06:51

१. तू लग्नानंतर सुद्धा नोकरी/व्यवसाय चालू ठेवणार का?
२. घर सांभाळून काय करायच्या त्या नोकऱ्या करा
३. अगं काहीही काम करत नाही ती घरात. सगळ्या कामांना बायका लावून ठेवल्यात.
४. हल्ली काय पाळणाघरात टाका मुलांना की ह्या मोकळ्या नोकऱ्या करायला.
५. टिकली लाव. मंगळसूत्र घाल. सौभाग्यवती आहेस ना तू? दिसायला नको?
६. असंच असतं. कामावरून उशिरा येते आणि मग नवरा यायच्या आधी फोनवरून जेवण मागवते. पैसा आहे ना हातात!
७. हल्ली तर काय रस्त्यात उभ्या राहून मुलीदेखील सिगारेटी ओढायला लागल्यात. मुलांबरोबर ड्रिंक्स घेतात. निर्लज्ज!
८. आमच्या सुनेला तर काहीही येत नव्हतं. स्वयंपाकघरात जायची वेळच आली नसेल कधी.
९. अहो माझा मुलगा रोज हिला हातात नाश्ता देतो! आणि मग ही जाते ऐटीत ऑफिसला. बिचारा बाई अली नाही तर भांडी पण घासतो.
१०. तुम्ही इतक्या उच्च पदावर पोहोचलात. हे तुम्ही पारिवारिक जबाबदाऱ्या सांभाळून कसं केलं?
११. तू लग्नानंतर आडनाव बदललं नाहीस?

तुम्ही ओळखलं असेल की हे सगळे प्रश्न किंवा कॉमेंट्स बायकांना विचारले जातात किंवा त्यांच्याबद्दल केल्या जातात. पण आता एक गंमत म्हणून आपण हे सगळे प्रश्न किंवा टिप्पण्या एखाद्या पुरुषाला डोक्यात ठेऊन करू. एखाद्या मुलाला एखाद्या मुलीनी लग्नाआधी जर, "तू लग्नानंतर नोकरी करणार का?' असा प्रश्न विचारला तर तो विनोद ठरेल. नोकरी (आणि पगार) ही मुलाची लग्नाची (आणि कधी कधी हुंड्याची) लायकी ठरवते. तीच जर त्याला सोडावी लागली तर काय उपयोग. एखाद्या सासूनी आपल्या जावयाबद्दल चार चौघात, "याला काहीच स्वयंपाक यायचा नाही लग्नात. सगळं मी शिकवलं", असे उद्गार काढले तर कसं वाटेल? पुरुष घरातून बाहेर पडताना कधी "आपलं लग्न झालय" हे दाखवायला टिकली मंगळसूत्र घालून जातात का? रस्त्यात असंख्य ठिकाणी पुरुष मजेत सिगारेट ओढताना दिसतात. तंबाखू स्त्री आणि पुरुष यांच्यात फरक करते का? दोघांनाही ती तितकीच घातक आहे. पण एखाद्या स्त्रीने सिगारेट ओढली की ती तिच्या आरोग्याचा नाही तर चारित्र्याचा निकष बनते. इंद्रा नूयी सारख्या महिलेला हमखास तुम्ही घर सांभाळून हे कसं जमवलं हा प्रश्न विचारला जातो. पण सुंदर पिचाईचं देखील घर कुणीतरी सांभाळत असतं म्हणून तो निर्धास्तपणे गूगलचा सीईओ होतो. पण स्त्रीला मदत करणाऱ्यांची (विशेष करून सासरच्यांची) नावे आणि त्यांच्याप्रती त्या स्त्रीला असलेली अपार कृतज्ञता ही त्या काळ्या शाईत उमटलीच पाहिजे.

आपल्या समाजातील या आणि अशा कितीतरी ढोंगी रूढींना पिंक हा सिनेमा वाचा फोडतो. पिंक खरंतर एका ठराविक विषयाभोवती फिरतो. तो म्हणजे स्त्रीने पुरुषाला कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवण्यास दिलेली अनुमती. ती अनुमती तिच्या कपड्यांमधून, तिच्या सवयी बघून, तिचे किती मित्र आहेत आणि ते "तसे" आहेत का हे बघून, तिनी आधी हे (कुणा दुसऱ्या पुरुषाबरोबर) अनुभवलंय म्हणून, अशा आणि यासारख्या इतर कुठल्याही कारणांनी परस्पर मिळत नाही. आणि स्त्री नाही म्हणत असताना तिच्याशी कुठल्याही मार्गाने (यात मानसिक ताणही आहे) ठेवलेले संबंध हे शोषणच आहे. तसंच तिनी आधी दिलेल्या आणि काही कारणांनी परत घेतलेल्या अनुमतीला डावलून तिच्यावर जबरदस्ती करणे हेदेखील शोषण आहे.

दिल्लीत एका घरात रूममेट्स म्हणून राहणाऱ्या, नोकरी करणाऱ्या मुलींची ही गोष्ट आहे. ओळखीच्या मुलाच्या मित्रांबरोबर रात्री डिनर आणि ड्रिंक्ससाठी त्या जातात आणि त्या रात्री जे घडते त्याचा पोलीस कम्प्लेंट कोर्टकचेरीपर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखवलाय. अमिताभ बच्चन यांचा अभिनय या चित्रपटाचा कणा आहे. त्यांचे बोलके डोळे, संयमित अभिनय आणि दमदार आवाज यांच्या जोरावर आधीच चांगलं असलेलं कथानक उत्कृष्ट बनून जातं. हा सिनेमा बघताना पुन्हा पुन्हा जाणवतं की अभिनय कंट्रोल केल्यानी त्याचा परिणाम सगळंच व्यक्त केल्यापेक्षा कितीतरी जास्त होतो. पण तो कसा कंट्रोल करायचा हे अमिताभ बच्चनच जाणे! तापसी पन्नू आणि इतर मुली यांचा अभिनयदेखील वाखाणण्याजोगा आहे.

या सिनेमाचं वैशिष्ट्य असं की बाहेर आल्यावर त्यावर बराच वेळ विचार केला जातो. आणि विषय जरी बलात्कार किंवा विनयभंगापुरता मर्यादित असला तरी तिथपर्यंत जाण्यात समाजच कारणीभूत आहे हे पुन्हा पुन्हा जाणवतं. सिनेमात तापसी पन्नू पोलिसात कम्प्लेंट करायला जाते तो सीनदेखील सिनेमागृहातील लोकांच्या मानसिकतेचा आरसा बनतो. पोलीस तिला तिनी कम्प्लेंट कशी करू नये आणि त्याचे कसे तिच्यावरच वाईट परिणाम होतील हे समजावू लागतात. आणि तसं करत असताना अतिशय निर्लज्जपणे वेगवेगळी उदाहरणे देऊन (तिच्या मैत्रिणीला "एक्सपीरियन्सड" संबोधून ) तिला तो परावृत्त करताना दाखवला आहे. त्याच्या प्रत्येक वाक्याला प्रेक्षकांमध्ये हशा पिकतो.

पिता रक्षति कौमार्ये, पती रक्षति यौवने ।
पुत्रो रक्षति वार्धक्ये, न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती ।।

स्त्री आपली आई, बहीण किंवा बायको असेल तर तिची रक्षा करणे हे आपले कर्तव्य आहे, या "पारंपरिक" विचारातून स्त्री स्वत:चे रक्षण करू शकत नाही आणि तिचे रक्षण करणारा पुरुष नसेल तर ती आपली मालमत्ता होते इथपर्यंत आपण कधी पोचलो हे विचार करण्याजोगे आहे. याही पुढे जाऊन जी स्त्री स्वतंत्रपणे जगू इच्छिते तिचा द्वेष करण्याची सुद्धा परंपरा आपल्यामध्ये आलेली आहे. आणि या मोठ्या मोठ्या अपराधांना सुरुवात करून देणारे छोटे छोटे किस्से असतात जे लहानपणापासून पुरुष बघत असतात. यातील पहिला संस्कार म्हणजे आपल्या सुनेच्या किंवा बायकोच्या पोटातील जीव पुरुष असावा यासाठी केलेला धार्मिक, शारीरिक आणि तांत्रिक अट्टाहास. आणि दुःखाची गोष्ट अशी की या अट्टाहासात स्त्रियादेखील भाग घेतात. स्त्रियांना मुली (नाती) नको असणे हे आपल्या समाजाचे सगळ्यात मोठे अपयश आहे. आणि मुलींना सबळ केल्याने मुलांवर आलेल्या अवास्तव अपेक्षा कमी कारण्यासदेखील मदत होईल. एखाद्या पुरुषाला घरी बसून आपल्या मुलांची काळजी घेणे जास्त प्रिय असेल तर त्याला ते करायचीही मुभा मिळाली पाहिजे.

हे बदलायचे असेल तर काही सुभाषितांना निवृत्त करून नव्याने सामाजिक घडी बसवली पाहिजे. आणि पिंक सारखे चित्रपट बनतायत आणि आवर्जून बघितले जातायत यातच तिची सुरुवात आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी जरूर पाहावा असा चित्रपट आहे.

http://saeechablog.blogspot.in/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सई, लेख आवडला. सिनेमा पाहिलेला नाही.
राजसी, तुमचा प्रश्न ज्या वर्तुळात विचारला जाऊ शकतो ते वर्तुळ फारच छोटे आहे. ते वर्तुळ मोठे करण्यासाठी प्रथम ह्या लेखात विचारलेल्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल. Why not try and reach to that stage where your questions will have a better validity?

Jau de. Mi kahi itaka mahatvacha mhanat nahiye. Let us try and find answers or deliberate more about problems mentioned in the reflection and also बy ama I'd.

>> Emancipation of women was needed because she wasn't educated earlier. Now let us say we are financially emancipated, just because we are educated.

नुसत्या शिक्षणाने आर्थिक स्वातंत्र्य कसं बरं येईल? आमच्या कडे १० घरी काम करणारी कामवाली आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आहे. पण कितीतरी उच्च शिक्षित मुली "घरचे नाही म्हणतात" म्हणून नोकरी करत नाहीत. नुसत्या शिक्षणाने आर्थिक स्वातंत्र्य येऊ शकत नाही!

>>But are we socially emancipated?

नाही. जोपर्यंत सामान्य स्त्रियांना समाजात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत हे 'सोशल इमानसिपेशन' होणार नाही. आणि एखाद्या बाईनी स्वतः घरी राहण्याचा निर्णय घेणे (डॉक्टर असूनसुद्धा) आणि तो तिला दबाव आणून घ्यायला लावणे यातच तुमच्या सोशल इमानसिपेशनचं उत्तर आहे.

Laptop / desktop car jasa marathi/ devanagri madhe vyavasthit lihita / chukala tar edit karata yet sahajpane tasa kahi app / keyboard android phone var chalanara asel tar sanga. Mi to devnagari lihayla vapren.

Tasach touch phone asalyane chukun back key pressing as problem hou naye mhanun tumhi kay karata. Sagala lihilele pusale jate.

अहो राजसी , फोनवरूनच प्रतिसादाच्या विंडोच्या वर म/E येते ते सिलेक्ट करून मराठीत लिहिता येते.

Which keyboard? Phone or Google? Till date I have been using phone keyboad. Now I am using Google keyboard .

If I use laptop/ desktop , as start typing in pratisad windows whatever I type is seen in Devanagari. But if I am using phone keyboard then English/ Roman typing doesn't change into devnagari . I downloaded Google keyboard but Marathi tying Keys are different and very tough to use those and type in Marathi.

राजसी.. गुगल हिन्दी इनपुट डाऊनलोड करा प्ले स्टोर मधून.. आणि त्यात मराठी असं निवडा.
मग साती म्हणतेय तसं मोबाईलवरून टाईप करतांना 'ळ' असे अक्षर दिसेल. त्यावर क्लीक केल्यावर मस्त लिहिता येईल तुम्हाला. तुम्हाला "English alphabets should turn into Marathi. Not used to Marathi keyboard." हे हवेय तसेच आहे ते. प्लीज चेक करा. शक्य होईल तर इथेच आम्ही सगळे मदत करू.

(सई केसकर.. तुमच्या धाग्यावर जरा अवांतर होतंय त्याबद्दाल क्षमस्व. पण राजसी यांनी देवनागरीत लिहावे अशी बर्‍याच माबोकरांची इच्छा आहे).

राजसी, मिंग्लिश कीबोर्ड बाय हापूस लॅब्ज ( Hapus Labs Minglish असा सर्च द्या ) असे एक अँड्रॉईड अ‍ॅप आहे. थेट मायबोलीसारखे टाईप करता येते, शिवाय त्यांनी त्यांच्या डिक्शनरीत कितीतरी मराठी शब्द आधीच भरलेले आहेत ( आणि ते सगळे शुद्ध भाषेत, र्‍हस्व-दीर्घ व्यवस्थित पाळून लिहिलेले आहेत. ) त्यामुळे संपूर्ण शब्द टाईपही करायला लागत नाही बरेचदा ! वापरुन बघा.

फोनवर मराठी टायपायला ह्याहून उत्तम अ‍ॅप दुसरे नाही असे माझे मत झाले आहे. इंग्लिशसाठी त्याला ऑटो स्पेल / ऑटो करेक्ट ऑप्शन मिळत नाही त्यामुळे मराठी टायपायचे असेल तेव्हा ड्रॉप डाऊन मेन्यूतून हा कीबोर्ड सिलेक्ट करायचा, एरवी अँड्रॉइड कीबोर्ड वापरायचा असे मी करते.

अवांतराबद्दल क्षमस्व !

लिहा

बहुतेकं जमलं असं दिसतंय. अजून प्रयत्न करत राहीन धन्यवाद पियू 'ळ' की च्या गायडन्स मुळे जमलं Happy

धन्यवाद जाग्याव पलटी आणि साती.

सरावाने अजून छान जमेल.:)

हुश्श! Happy

आता हापूस वापरून बघूया Happy

हे पण जमतय की Happy

धन्यवाद अगो Happy

मला अगदीच रोबोटसारखे वाटते आहे, इतके धन्यवाद कधी कोणाला आयुष्यात दिल्याचे आठवत नाही Happy

चित्रपट पाहिला नाही अजून, पण लेख छान आहे.
@ राजसी, एक उदाहरण आहे माझ्याकडे. माझ्या एका ज्येष्ठ नातेवाईक स्त्रीचं. त्यांनी तरूणपणी एका फारशा न शिकलेल्या मुसलमान टॅक्सी ड्रायव्हरशी पळून जाऊन लग्न केलं. या स्वतः पीएचडी आहेत आणि गेली अनेक वर्षे एका कॉलेजच्या लोकप्रिय प्रिन्सिपॉल आहेत. ते काका मला नाही वाटत फार काही करत आहेत गेली अनेक वर्षे. ते स्वभावाला अगदी चांगले आहेत, एक मुलगाही आहे आणि त्यांचा संसार चांगलाच चालू आहे इतकी वर्षं!
पण यातून काय सिद्ध होणं तुम्हाला अपेक्षित आहे मला माहिती नाही.

थोडा वेगळा अनुभव- भारतात जर एखादी स्त्री 5 ला निघाली तर तिच्याकडे सगळे अश्या नजरेने बघतात कि फार मोठं पाप करतीये पण असं अमेरिकेत काम करताना नाही जाणवलं. 5 चा अनुभव स्त्री व पुरुष दोघांना येतो भारतात पण स्त्रिया 5 ला गेल्या कि जास्त खुपत बहुधा.
अजून एक जर नवरा बायको दोघे काम करत असतील तर बऱ्याच लोकांना बायको timepass म्हणून जॉब करते असं वाटत.मला हा अनुभव आलेला आहे , लोक तोंडावर म्हणतात ,तुम्हाला मुलीना जॉब केला नाही तरी चालतो, बोनस कमी मिळाला तर प्रॉब्लेम नाही

Pages