फुलपाखरू

Submitted by ऋषभ गि.कुलकर्णी on 26 September, 2016 - 09:33

तो दिवस गुलाबी फुलपाखरासारखा

कालचीच आव्हानं राखून

उडत- बागडत- अलगद उतरला !

डवरलेल्या वेदनांचे घाव ऐकत

तुटपुंजे अस्तित्व सिद्ध करत

प्रखर उन्हाच्या कटाविरुद्ध

कर्तृत्त्व हुकूमी गाजवत

सांज प्रेयसीला भेटून

रात काजव्याच्या साक्षीने

पंख उन्मलून पडतो -

सखे, सरेल का ही पोरकी रात्र

नव्या उद्याच्या फुलपाखरासाठी ?

.........
ऋषभ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users