" उणीव "

Submitted by अज्ञात on 26 September, 2016 - 01:42

सारेच धुके पटलावरती
उतरले मेघवर मंद गती
आहे नाही संभ्रम भवती
आभास सावल्यांची भरतीे

ओघळलेली फांदी फांदी
खग विलोपलेले स्वच्छंदी
अपसव्य सव्य मन बेबंदी
अंधार न दिवस अशी नांदी

अस्वस्थ असे हे स्वस्थ इथे
का अशी दिशांची ही कोंडी
होईल उरी जाणीव कशी
मन परा विषादांची हंडी

....अज्ञात 24/09/2016 नाशिक

Group content visibility: 
Public - accessible to all site users