आल्या आल्या सरी

Submitted by Poetic_ashish on 22 September, 2016 - 09:04

सप्तरंगी इंद्रधनुषी छटा, मनभावन काळी घटा,
सृष्टीने चैतन्य दावीले, निरखण्या ओलांड्ला उंबरठा,
बारीक सरी माळरानावरी, सांजेच्या प्रहरी,
जणू बरसते या सरींतून प्रेम आपुले लहरी,

भिजलो या पावसात आम्ही दोघं होउन स्वछंदी,
प्रितीच्या खेळात सामील झाले वातावरण हे आनंदी,
सरीसरीतून डोकावे जणू मुरलीवाला हरी,
जणू बरसते या सरींतून प्रेम आपुले लहरी,

आकाशाचा मंडप झाला,ढग हे झाले वाजंत्री,
पुन्हा अमुचा विवाह झाला, अश्रू आले नभनेत्री,
ते अश्रू आनंदाचे तूफान बरसले आमच्यावरी,
जणू बरसते या सरींतून प्रेम आपुले लहरी,

प्रपंचाहुनी वेगळे होउनी, एकरूप झालो निसर्गाशी,
ताणतणाव विसरून गेलो, गाठ पडली समाधानाशी,
सरीसरीतून ओथंबली आनंदाची भावना ट्पोरी,
जणू बरसते या सरींतून प्रेम आपुले लहरी,

निसर्गानेही जपली अमुची प्रीत ही न्यारी,
नवे अंकूर फुट्ले तेव्हा झाडाची फांदीही पालवली,
हिरवा शालू लेवून झाली, नवी नवरी ही धरा सारी,
जणू बरसते या सरींतून प्रेम आपुले लहरी,

कवी आशिष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users