अजून किती सहन करायचे ?

Submitted by विश्या on 20 September, 2016 - 07:12

हल्ले हल्ले आणि हल्ले ..........
आता असे किती हल्ले सहन करायचे ? कधी आपण याना यांची औकात दाखवणार ? आपल्या शांत राहण्याच्या किती फायदा उठवणार हे दहशतवादी .............
अमी फक्त मराठा एकत्र झालो तर आज लाखोंचा जनसमुदाय तयार झाला , मग अखंड देशाचा पाठिंबा असताना का अजून या भ्याड हल्ल्याना सहन करायचे , कधी संसद , कधी इस्पितळ , कधी स्थानक तर कधी शाळा , अजून किती ठिकाणी हल्ले होण्याची वाट पाहायची आपण ............
आता फक्त निषेध व्यक्त करून चालणार नाही , कारण त्याचा फरक इतकाच काही दिवसांनी दुसरा हल्ला झालेला दिसेल ..
जर भ्याड हल्ल्यातून आपल्या जवानांना शाहिद व्हावे लागत असेल तर हे सहन होणे नाही ....
पुढचा हल्ला करताना त्यांचा रुह कापून उठेल असा एकाच प्रतिहल्ला व्हावा .
जीव तर सर्वाना सारखाच आहे , इजा , प्रत्येकाला होतेच मग किती दिवस आपणच इजा करून घ्यायची , जीव गमवायचे , आत्मसन्मान गमानवण्यापूवी , इतक्या त्वेषाने एका तरी हल्ल्याचे उत्तर दिले पाहिजे , ज्याची धास्ती पूर्ण आसमंतात घुमेल .
फक्त एक हुकूम गरजेचा आहे आपल्या सैन्याला , घरात घुसून मारतील पण हे होण्यासाठ तो एक हुकूम गरजेचा आहे .
अखंड जगात फक्त 5 दहशतवादी संघटना आहेत ज्या मोठ्या प्रमाणात आतंकवादी कारवाया करतात पण देश , देश किती तरी आहेत , आतंकवादाशी लढण्यासाठी प्रत्येक देशातील एक एक तुकडी जरी तयार केली आणि त्यांची संघटना करून आतंकवाद्याच्यावर जर आतंकी हल्ले चढवले तर , पुढली 100 ते 200 वर्ष तर या संघटना मान वर नाही काढायचा.
भारताने या हल्ल्याला तरी एक प्रत्युत्तर द्यावे अशे खूप वाटते आणि ते हि असे कि दुनिया बोलेल " सौ सोनार कि एक लोहार कि "

जय हिंद !!!!!!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आतंकवादाशी लढण्यासाठी प्रत्येक देशातील एक एक तुकडी जरी तयार केली आणि त्यांची संघटना करून आतंकवाद्याच्यावर जर आतंकी हल्ले चढवले तर >>>>>>

मस्त आयडीया आहे. तुम्ही सामील व्हा भारताच्या तुकडीत नक्की

आवरा !!! घरी बसून बोलायला आपलं काहीच जळत नाही. पण युध्दासारख्या गोष्टी अख्ख्या राष्ट्रावर दूरगामी परिणाम करू शकतात.
आपण कितीही आव आणला , तरी सद्य स्थितीत युद्ध पुकारण्याइतके जागतिक पाठबळ आपल्याकडे नाही. आपल्याबरोबर युद्धात उभे राहायचे सोडा, साधी पाठराखणसुद्धा कोणी करेल याचीही शंका वाटते.
अडखळत का होईना, जी काही थोडी देशाची प्रगती होते, ती एका युद्धाने रसातळाला जाईल. अन असे हल्ले ईतरांच्या हस्तक्षेपापेक्षा आपल्या हलगर्जीपणामुळे जास्त झालेत, हे विसरून कसे चालेल ?
मुंबई हल्ल्यानंतर आपण त्यातून काहीच धडा घेतलेला नाही. आजसुद्धा त्याच प्रकारचा हल्ला भारतात कुठल्याही मोठ्या शहरावर सहज होऊ शकतो.

बाकी बदला घेण्यासाठी पहिले स्वतःला सक्षम बनवावे लागेल, सर्वच बाबतीत.

पुढचा हल्ला करताना त्यांचा रुह कापून उठेल असा एकाच प्रतिहल्ला व्हावा .

<<

वर ठळक केलेल्या शब्दाचा मराठी अर्थ काय आहे?

जर आपली संस्कृति उच्च आहे, आपण अहिंसा, शांततामय वाटाघाटी जास्त पसंत करतो, आपण कायद्याने वागतो, तर असे एकदम उठून हल्ले करणे, युद्ध करून सर्वत्र अशांतता निर्माण करणे, निरपराध लोकांचे जीव घालवणे हे कठीणच.
दुसरे असे की, जरी आपल्याला पक्के माहित आहे की आयसिस नि पाकीस्तानी मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत, तरी पाकीस्तानवर हल्ला करण्यात आपल्याला जगात कुणाचाच पाठिंबा मिळणार नाही. अमेरिकेला सुद्धा माहित आहे की पाकीस्तानचा हात या अतिरेकीपणा करण्यातआहे, तरी ते पाकीस्तानवर हल्ला करत नाहीत, उलट त्यांना मदतच करतात. नाहीतर आपल्यापेक्षा सुद्धा त्यांना पाकीस्तानचा बंदोबस्त करणे कितीतरी सोपे. मी बरेचदा ऐकतो की भारताने पाकीस्तानविरुद्ध कितीहि पुरावे सादर केले तरी अमेरिका, इंग्लंड इ. देशांचा त्यावर विश्वास नाही. पूर्वी पाकीस्तानचा उपयोग त्यांना रशियावर हेरगिरी करण्यात होत होता, आता त्याची गरज नाही तरी जुने धोरण बदलण्यात कुणाला इथे फारसा इंटरेस्ट नाही, फक्त भारताचे पैसे नि मार्केट त्यांना पाहिजे आहे.

आयसिस नुसतेच मध्यपूर्वेत नाहीत, ती वृत्ति जगभरातल्या अनेक मुसलमानांत भिनली आहे. एरवी शांत दिसणारा मुसलमान केंव्हा डोके भडकून अतिरेकी पणा करेल हे खुद्द त्या अतिरेकांच्या बायकोला, कुटूंबियांनाहि सांगता येत नाही. तेंव्हा अगदी ठोस पुरावा असल्याखेरीज कुणालाच अटक किंवा शिक्षा करता येत नाही. आता ट्रंपसारखे नि टेड क्रुझ सारखे अतिरेकी सरसकट मुसलमान लोकांच्या हक्कावर गदा आणण्याच्या गोष्टी करतात, पण ना ते भारताच्या घटनेत, ना अमेरिकेच्या घटनेत मान्य आहे.

माझी खात्री आहे भारतातले नि अमेरिकेतले नि इतर देशातल्या सरकारी संघटना पुष्कळ हल्ले होण्यापूर्वीच थांबवत असणार, पण ही आग फार भडकली आहे. मुसलमानांना भारताइतके स्वातंत्र्य इतर देशात फार क्वचित दिसून येते, त्यांची लोकसंख्या तर इंडोनेशिया सोडल्यास जगातल्या सर्व देशांपेक्षा भारतात आहे. तरी भारतीय मुसलमान एकत्र येऊन आपल्या बांधवांना का आवरू शकत नाहीत? मुसलमानांकडे फक्त व्होट बँक म्हणूनच का पाहिले जाते, त्यांचा उपयोग का करून घेता येत नाही?

बरे झाले मराठा एकत्र झाले, आता सगळे हिंदू एकत्र झाले (वैयक्तिक स्वार्थ सोडून) तर मुसलमानांना जरा तरी दहशत बसेल.

माझे मत कोणत्याही देशाशी युद्ध करण्याचे नाही पण, दहशतवाद संपवावा लागेल , आणि त्यासाठी प्रतिहल्ला हा गरजेचं आहे .
अमेरिकेने कोणाशी युद्ध न करता लादेन ला संपवलं ,, मग जर सर्व देशांनी या मध्ये व्यापक पाऊल उचलून दहशतवाद संपवण्यासाठी जर युद्ध केलं तर त्यात कायच गैर नाही