सध्याच्या शांततामय परंतु विराट "मराठा" मोर्चांच्या निमित्ताने - सप्टेंबर २०१६

Submitted by limbutimbu on 19 September, 2016 - 03:02

वर्तमानपत्रे व मिडियामधुन प्रसारित होणार्‍या बातम्यांमुळे महाराष्ट्रात निरनिराळ्या शहरी/गावी निघणार्‍या विराट स्वरुपाच्या पण शांततामय अशा "मराठा" मोर्चांची माहिती आपणा सगळ्यांना विदीत झालीच असेल.

या निमित्ताने बरेच प्रश्न, शंका उपस्थित होत आहेत, व या सगळ्याची परिणिती कशात होऊ शकेल, याचेही अंदाज बांधले जात आहेत.

निरनिराळ्या पक्षांचे राजकारणी, कधी नव्हे ती मोर्चांच्या निमित्ताने "प्रगट" अशी "एकजूट" होत असलेली "मराठा मोर्चांची" संख्यात्मक ताकद पाहुन भावी निवडणूकांकरता आयती मतपेटी म्हणूनही या मोर्चांकडे बघत आहेत, हे देखिल जाणवते आहे.

तर, अचानक इतक्या मोठ्या संख्येने असे मोर्चे काढले जाण्या निमित्ताने .....
१) त्यामागिल उघड वा झाकलेली कारणे,
२) निरनिराळ्या राजकारणी व्यक्ति व त्यांचे पक्ष यांचे या मोर्चांबाबतचे धोरण,
३) सर्वसामान्य व्यक्ति व भारताची (सद्य/पूर्व) नागरीक म्हणून या मोर्चांबद्दलची माबोकरांची प्रतिक्रिया काय व त्यामागिल कारणमिमांसा काय करतील,
४) सरकार अधिकृतरित्या काय कृति करु शकेल याचे अंदाज, व
५) भविष्यात या मोर्चांचा परिणाम काय होऊ शकेल याबाबतचे अंदाज व्यक्त करण्यासाठी हा धागा काढला असे.
तसेच
६) मोर्चाच्या निमित्ताने समाजजीवनात जी खळबळ उडत आहे, संधिसाधू राजकारण्यांनी लादलेली अनेकविध जातीय समिकरणे या मोर्चांच्या निमित्ताने कशी खळाखळ्ळ तुटुन पडत आहेत व त्याद्वारे "मुरलेल्या तथाकथित जाणत्या राजकारण्यांच्याही" पायाखालची वाळू कशी सरकू लागली आहे यावरही भाष्य अपेक्षित आहे.

कृपया जाणकार व अभ्यासू माबोकरांनी (व्यक्तिगत आयडी/व्यक्तिचा जातीगत/पक्षागत अभिनिवेश सोडून देऊन) या गंभिर विषयावर तितक्याच गंभिरपणे मत मांडावीत अशी अपेक्षा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विषयास, चर्चेस सुरुवात करुन देण्याकरीता, "आमचा कट्टा" या वाहत्या धाग्यावरील माझी पोस्ट इथे डकवत आहे.

******************
limbutimbu | 19 September, 2016 - 12:20
प्रसाद, बेफिकीर, अनिलचेंबुर, मी धागा नाही काढु शकत या विषयावर, तितका अभ्यास नाही. त्यातुन माझ्या ज्योतिषविषयक धाग्यांवर कितिक नास्तिक/अन्निस/बुप्रा/कम्युनिस्टांनी आधीच धुळवड खेळण्याचा अनुभव गाठीशी आहेच्च. तर निघेल हो धागा, तोवर आपण इथेच चर्चा करुयात.

काँग्रेस, दोनही, राष्ट्रवादी अन नॅशनल, दोघेही मोर्चाचे श्रेय घेण्यास, वा मोर्चामुळे होणारे एकत्रीकरण मतपेटीकडे वळविण्यास महाउत्सुक आहेत हे दिसतेच आहे. अन त्या करता ते वाट्टेल ती शेंडा ना बुडखा जाहिर विधाने करीत आहेत, उदा., हे मोर्चे सद्य सरकारच्या अपयशाचे लक्षण आहे वगैरे... हाहा
एकवीसावे शतक चालू झाल्यापासुन गेली काही वर्षे सातत्याने, आपल्या राजवटीतील पराकोटिस पोहोचलेला भ्रष्टाचार व समाजातील बेकारी यावरुन लोकांचे लक्ष उडवुन लावण्यासाठी लेन/भांडारकरसारखे वाद काढुन हल्लेबिल्ले करुन निव्वळ साडेतिन टक्क्यांना "लक्ष" (टारगेट) करण्याचे यांचे मनसुबे व पावित्रे , या मोर्चांमुळे व प्रतिमोर्चांच्या कल्पनेमुळे हवेत उधळले गेले आहेत असे मला वाटते. काही हिंदी सिनेमावाले जसे जनतेला कायमच मूर्ख समजुन वाट्टेल तसे सिनेमे काढीत असतात, तशाच प्रकारे जनतेला कायमच गृहित धरुन व मूर्ख समजुन चालल्याने या दोनही काँग्रेसची या मराठा मोर्चा प्रश्नी "गाढवही गेले अन ब्रह्मचर्यही गेले" अशी अवस्था झाली आहे असे मला वाटते. फिदीफिदी

पण सगळ्यात वाईट अवस्था आहे ती तमाम उद्दाम डाव्या आघाड्या/पक्ष/चळवळी/वळवळींची... ते नाही यास समर्थन देऊ शकत कारण ते जात/धर्म मानितच नाहीत, अन नाही यास विरोध करु शकत, कारण विरोध करणार तर कशाला करणार? मोर्चाचे कारण नि:सन्दिग्ध रित्या सु:स्पष्ट आहे.
त्यामुळे एकीकडे "बहुजन" समाजास चुचकारीत, हिंदू धर्माविरुद्ध उभे करण्याचे दीर्घकालिक प्रयत्न तर दुसरीकडे मराठा मोर्चाद्वारे "बहुजन" समाजातील एका मोठ्या घटकाने दाखविलेली ताकद आपल्याकडे वळविण्याची तारेवरची कसरत डाव्यांना करावी लागत आहे, व बहुधा त्यांची आजवरची "तत्वज्ञाने" तोंडावर आपटणार हे सुनिश्चित आहे, किंबहुना गेली काही वर्षे सातत्याने साडेतिन टक्क्यांना टारगेट करीत हिंदू धर्म फोडायचे कारस्थान यशस्वी न होता, "हेचि फळ काय मम तपाला" या उक्तिप्रमाणे डाव्यांचि अवस्था झालेली आहे.

>>>> मराठा मोर्चावर धागा न निघण्याचे कारण उघड आहे. कोणी कोणाविरुद्ध बोंब मारायची हेच त्या मोर्चातल्यांना समजत नाही आहे. ह्याचे कारण परस्परविरोधी गटांनी एकत्र होऊन काढलेला मोर्चा आहे तो! मुळात लढा द्यायचा आहे कोणाविरुद्ध हेच कित्येकांना समजलेले नाही. <<<<
या वाक्याशी मी थोडाफार सहमत आहे, पूर्ण नाही,
थोडाफार सहमत अशाकरता, हा "वैचारिक गोंधळ" आहेच आहे, व तो तमाम कॉन्गी/डाव्या राजकारण्यांनी जाणूनबुजुन निर्माण केला आहे.
पूर्ण सहमत नाही याचे कारण, तसा गोंधळ असता तर लोकं इतक्या लाखोंच्या संख्येने सहभागीही झाले नसते.
तमाम विचारवंत/राजकारणी/पत्रकार वगैरे "बुभुक्षित" मंडळींचा आता हाच प्रयत्न चालू झालाय, की खरेच गोंधळ आहे का? असेल तर त्याचा फायदा लाटून या समाजाचा "राग" "नेहेमीप्रमाणे" "कुणावर" व कसा वळविता येईल?
अन जर गोंधळ नसेल, तर आम्हीही तुमच्यातलेच म्हणत तमाम "बहुजनांच्या" मांडीला मांडी लावुन त्यांची एकत्र मोट कशी बांधता येईल? राजकारण्यांचि गेल्या काही दिवसातिल "विधाने " याच दोन मुद्द्यांभोवती घोळत राहिली आहेत असे स्पष्ट जाणवते. यांच्यापैकी कुणीही, मोर्चाच्या प्रमुख तिन कारणांबद्दल अत्यंत सु:स्पष्टपणे एक अवाक्षरही काढीत नाहीये हे विशेष.
*******************

मुळात आरक्षण म्हणजे संरक्षण हिच भ्याड वृत्ती आहे.
सर्वच समाज आरक्षण मागतोय म्हणजे काय?

राजकारणी लोकांनी भरकटवलेली आणि त्यांच्या परिवारासाठी उपयोगी पडणारी लोक आहेत ही. 400 करोड रूपयांचा जनावरांचा चारा खाऊन जो शहाबुद्दिन सारख्या गुन्हेगारांना पाठिशी घालतो. अजून बोलूच नये आणि ........

मराठा मोर्चा मागची कारणे..
१.२०१४ साली लोकसभा आनि विधानसभा निवडणुकांनंतर मराठा केंद्रीत राजकारणाचा अंत मराठा समाजाच्या जिव्हारि लागला आहे.राज्यातली मुखमंत्र्यापासुनची सगळी पदे आपल्याच ताब्यात राहिली पाहीजेत हा अहंकार् मराठा समाजाला आहे.
२. मराठा समाज ग्रामीण भागात राजकारणात पुढे आहे ,इथे त्यांना ठोक्याला ठोका देणारा एकच समाज म्हणजे दलित समाज आहे.त्यामुळे ॲट्रॉसीटी सारखे कायदे मराठा सत्ताकारणाच्या आड येत आहेत ,त्यांमुळे ॲट्रॉसीटी रद्द करण्याची मागणी होत आहे.
३.मंडल आयोगानंतर ओबिसी समाजाला जिल्हा परीषदा,पंचायत समिती,शिक्षण नोकर्या इत्यादी ठीकाणी आरक्षण मिळाले आहे,कालपर्यंत जे कारु नारु आपल्यासमोर गप्प होते ,आज ते जिल्हा परिषद पंचायत समिती इत्यादी ठिकाणी अध्यक्ष वगैरे पदावर आहेत ,व त्यामुळे मराठ्यांच्या संधी आपोआप् कमी झाल्याचा राग आहे,त्यामुळेच ते ओबीसी आरक्षणाची मागणी करत आहेत.
४.कोपर्डी बलात्कार निषेधार्हच आहे पण त्यातही त्या निष्पाप भगिणीच्या टाळुवरचे लोणी खाण्याची प्रवृत्ती दिसत आहे.
५.नेतृत्व नसल्यास लाखोंचे मोर्चे निघत नाहीत ,यामागे निश्चीत् मोठे षडयंत्र आहे .कदाचीत काटेवाडीकर यापाठी असु शकतील.कारण ते जातीपातीचे राजकारण खेळण्यास नेहमीच तयार असतात.

>>> ३ ट्क्के वाला मुख्यमंत्री नको ? <<<<
साडेतिन ना? मधल्या वर्षांत अर्धा टक्का घटला वाटते.... ! असो.

सिंथेटिक, तुमची मते विचारार्ह आहेत. Happy

ब्राह्मण मुख्यमंत्री नको हि सुद्धा मागणी आहे ,पण छुपी.
सुशीलकुमार शिंदे ,मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असतानाही मराठा राजकारण्यांच्या पोटात दुखत होतेच ,आता तर एकहाती फडणवीस आहेत मुख्यमंत्री ,त्यामुळे पोटदुखी चालुच आहे.

आणि अशी छुपी मागणी करण्यात थोरले पवार सध्या आघाडी वर आहेत, ज्यावेळी भाजपाने कोल्हापूरच्या संभाजी राजांना राज्यसभेची उमेदवारी त्यावेळी 'आता पेशवे महाराजांना राज्यकारभारची वस्त्रे देऊ लागले आहेत' वगैरे त्यांची व्यक्तव्य हेच सांगतात.

एक प्रामाणिक शंका विचारायची होती कधीपासून! कदाचित ह्या धाग्यावर त्याचे योग्य उत्तर मिळेल. कोपर्डी दुर्घटना हा ह्या मोर्चांमागील एक महत्वाचा घटक मानला जातो. आता शंका अशी, की बलात्काराच्या गुन्ह्यात बलात्कारी कोणत्या जातीचा आणि बलात्कार पीडित व्यक्ती कोणत्या जातीची ह्याला कधीपासून महत्व मिळू लागले? का मिळू लागले? तो एक भयंकर गुन्हा आहे इतकेच पुरेसे नाही का?

>>>> आता शंका अशी, की बलात्काराच्या गुन्ह्यात बलात्कारी कोणत्या जातीचा आणि बलात्कार पीडित व्यक्ती कोणत्या जातीची ह्याला कधीपासून महत्व मिळू लागले? <<<<
या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे, किंबहुना माहित नाही हेच उत्तर.
पण बहुधा (केवळ बलात्कार इतकाच गुन्हा नाही, तर सरसकट सर्वच गुन्ह्यांमधे) गुन्हेगार/आरोपी व पिडीत व्यक्ति यांच्या बाबतचा सरळ सरळ जात्याधारीत अ‍ॅट्रॅसिटी अ‍ॅक्टही अशा विभागणीस कारणीभूत झालेला असू शकेल, तसेच मोर्चामागिल ते देखिल एक कारण आहेच्चे, खरे खोटे जाणकार जाणे... Happy

वा वा वा लैच भारी! अमुक एक कारण 'आहेच्चे'असेही म्हणायचे आणि त्याच दमात 'काय ते जाणकारांनाच माहिती' म्हणून शेपूट घालायचे!! खरे -खोटे जर जाणकारांनाच (म्हणजे कोण? बहुतेक तुम्हीच!) माहिती आहे तर त्यांनाच बोलवा, तुम्ही कशाला तर्क लढवताय!

अहो त्यांचा धागा काढायचा देखील हाच हेतू आहे.

या, त्या धाग्यांवर चर्चा केली असे कसे? इतकी शांतता कशी माबोवर?

शेवटी खोडसाळपणे धागा काढलाच.

सिंथेटिक जिनियस,
<<१.२०१४ साली लोकसभा आनि विधानसभा निवडणुकांनंतर मराठा केंद्रीत राजकारणाचा अंत मराठा समाजाच्या जिव्हारि लागला आहे.राज्यातली मुखमंत्र्यापासुनची सगळी पदे आपल्याच ताब्यात राहिली पाहीजेत हा अहंकार् मराठा समाजाला आहे.>>
मुळात तुमचा मराठा समाजाविषयी पूर्वग्रहच दूषित दिसतोय. प्रत्येक मोर्चातून हे स्पष्ट दिसतंय की राजकारणी लोकांना अजिबात महत्व दिलं जात नाहीय. राजकारणी लोक या मोर्चात सहभागी होताहेत, हे केवळ त्यांची मतं जाऊ नयेत म्हणून. आजपर्यंत राजकारणात मराठा समाजाचंच वर्चस्व आहे आणि यापुढेही राहणार यात वाद नाही. त्यामुळे अहंकार दुखावण्याचा वगैरे प्रश्नच येत नाही. मोर्चाची जी खदखद आहे ती आपल्याच जीवावर निवडून जाणाऱ्यांनी आपल्या समाजाची कधीच दखल घेतली नाही ही आहे. कारण प्रत्येक समाजाचा नेता अभिमानाने मी अमूक समाजाचा नेता आहे, असे म्हणतो. पण मराठा समाजाचे आमदार, खासदार, मंत्री कधी असे जाहीरपणे म्हटलेले पाहिले आहे का? उलट कुणी असे म्हटले तर तो मराठा नेता लगेच जातीयवादी ठरतो. मराठा समाजाला अहंकार असता तर भाजपचे सरकार आले नसते. राष्ट्रवादीचे असते. पण, चांगल्या-वाईटाची समज सगळ्यांनाच असते.

<<२. मराठा समाज ग्रामीण भागात राजकारणात पुढे आहे ,इथे त्यांना ठोक्याला ठोका देणारा एकच समाज म्हणजे दलित समाज आहे.त्यामुळे ॲट्रॉसीटी सारखे कायदे मराठा सत्ताकारणाच्या आड येत आहेत ,त्यांमुळे ॲट्रॉसीटी रद्द करण्याची मागणी होत आहे.>>
मराठा समाज ग्रामीण राजकारणात पुढे आहे कारण ग्रामीण भागात मराठा समाजच जास्त आहे. पण ठोक्याला ठोका देणारा समाज दलित आहे, हे विधान साफ चुकीचं आहे. उलट ग्रामीण राजकारणात मराठा, दलित हातात हात घालून राजकारणात सक्रीय असतात. राजकारणात अॅट्रॉसिटीसारख्या कायद्याचा गैरवापर केला जातो, हे खरेच आहे. पण त्यामुळे अॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी होत नाही, तर अगदी काहीही कारण नसताना एखाद्याची खुन्नस काढण्यासाठी अनेकदा अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हे दाखल केले जातात. असे होऊ नये, ही प्रमुख मागणी आहे.

<<३.मंडल आयोगानंतर ओबिसी समाजाला जिल्हा परीषदा,पंचायत समिती,शिक्षण नोकर्या इत्यादी ठीकाणी आरक्षण मिळाले आहे,कालपर्यंत जे कारु नारु आपल्यासमोर गप्प होते ,आज ते जिल्हा परिषद पंचायत समिती इत्यादी ठिकाणी अध्यक्ष वगैरे पदावर आहेत ,व त्यामुळे मराठ्यांच्या संधी आपोआप् कमी झाल्याचा राग आहे,त्यामुळेच ते ओबीसी आरक्षणाची मागणी करत आहेत.>>
मुळात मोर्चाचे विषय राजकीय नाहीतच, त्यामुळे राजकारणात मराठ्यांच्या संधी कमी झाल्या आणि म्हणून राग आहे, असे म्हणणे साफ चुकीचे आहे. आरक्षण राजकारणात नव्हे तर नोकऱ्या आणि शिक्षणासाठी पाहिजे आहे. कारण ग्रामीण भागात हातावर पोट असणारा, शेतमजूर, अल्पभूधारक असा मोठा वर्ग आहे. जो हजारो रुपये फी भरून मुलांना शिकवू शकत नाही.
<<४.कोपर्डी बलात्कार निषेधार्हच आहे पण त्यातही त्या निष्पाप भगिणीच्या टाळुवरचे लोणी खाण्याची प्रवृत्ती दिसत आहे.>>
टाळूवरचे लोणी खायची वृत्ती नाही. कुठलाही उद्रेक होण्यासाठी एखादी ठिणगी, कारण हवं असतं. कोपर्डी प्रकरण ही एक ठिणगी आहे, असं म्हणा हवं तर..

<<५.नेतृत्व नसल्यास लाखोंचे मोर्चे निघत नाहीत ,यामागे निश्चीत् मोठे षडयंत्र आहे .कदाचीत काटेवाडीकर यापाठी असु शकतील.कारण ते जातीपातीचे राजकारण खेळण्यास नेहमीच तयार असतात.>>
अगदी जगप्रसिध्द नेतृत्व असलेले आणि लाखो रुपये खर्च करून मोर्चांच्या इव्हेंट करणाऱ्या नेत्यांनाही दहा हजार लोक जमविता जमविता नाकी नऊ येतात. मग असं कुठलं छुपं नेतृत्व असू शकतं, जे कुणालाच माहिती नाही, चाणाक्ष मीडियाच्या नजरेतूनही सुटलंय? खरं तर नेतृत्व नाही, म्हणूनच हे मोर्चे स्वयंस्फूर्तीने यशस्वी होताहेत. नेतृत्व असतं तर हे मोर्चे केव्हाच कुठल्या तरी पक्षाने, संघटनेने हायजॅक केले असते. तसे प्रयत्नही होताहेत, पण ते हाणून पाडले जात आहेत.

हे मोर्चे कुठल्याच जातीविरोधात नाही. पण काहींच्या पायाखालची वाळू सरकलीय. त्यामुळे त्याला जाणीवपूर्वक जातीयवादी रंग दिला जातोय. पण असे करणे हे समाजात दुही माजवून सगळ्यांनाच त्रासदायक ठरू शकते. विशेष म्हणजे प्रत्येग गावागावांतून अनेक जातींचा या मोर्चांना पाठिंबाच आहे.

सिंजी, टोच्या, उत्तम मुद्दे, व त्यास उत्कृष्ट संयमित उत्तरे, चांगली चर्चा चालली आहे. Happy

>>>> वा वा वा लैच भारी! अमुक एक कारण 'आहेच्चे'असेही म्हणायचे <<< मीच एकटा म्हणत नाहीये, आख्खी मिडीया तिन्हीत्रिकाळ ओरडुन ओरडुन सांगतीये...

>>>> आणि त्याच दमात 'काय ते जाणकारांनाच माहिती' म्हणून शेपूट घालायचे!! <<<< घालणे भाग आहे बाप्पा.....

>>>> खरे -खोटे जर जाणकारांनाच (म्हणजे कोण? बहुतेक तुम्हीच!) माहिती आहे तर त्यांनाच बोलवा, तुम्ही कशाला तर्क लढवताय! <<<< त्यांनाच काय, अहो तुम्हाला पण आवतण आहेच्चे की.... आमचा तर्क बरोबर की चुक ते सांगायला, बर तर बर, तो तर्कही एका आयडीच्या प्रश्नास उत्तर म्हणून मांडला आहे..... ! अन तर्क लढवु नये, तो मांडू नये, असा काही कायदा आहे काय? असो.

हे मोर्चे कुठल्याच जातीविरोधात नाही. पण काहींच्या
पायाखालची वाळू सरकलीय. त्यामुळे त्याला जाणीवपूर्वक
जातीयवादी रंग दिला जातोय. पण असे करणे हे समाजात दुही
माजवून सगळ्यांनाच त्रासदायक ठरू शकते. विशेष म्हणजे प्रत्येग
गावागावांतून अनेक जातींचा या मोर्चांना पाठिंबाच आहे.
>>>>>>> जाती विरोधात नाही म्हणता! चला ॲनालिसिस करुयात
१.ॲट्रॉसीटी कायदा रद्द करावा ही मागणी ओबिसी जात समुहाने केलेली नाही,एकाही ब्राह्मणावर ॲट्रॉसीटी दाखल झाल्याची बातमी दाखावावी,जैन ,मारवाडी ,मारवाडी,ब्राह्मण ,लिंगायत कुणाचाच ॲट्रॉसीटीला विरोध नाही,मग फक्त मराठ्यांचाच का विरोध आहे बुवा.
याचे कारण म्हणजे गावागावात सत्ताकारण करताना साळी,माळी,दलित बौद्ध यांच्यावर रोब दाखवायचे काम मराठा राजकारणी करतच असतात,त्यामुळेच फक्त मराठ्यांनाच ॲट्रॉसिटीची अडचण वाटते.इथेच जातीयवाद आहे
२.कुणबी या मराठा समुहाला ओबिसी आरक्षण लागू असतानाही धनदांडग्या मराठ्यांना आरक्षण कशाला हवे आहे,? याचे कारण कालचा गरिब साळी माळी झेडपी अध्यक्ष होतो व आमच्या मांडीला मांडी लावुन बसतो ही पोटदुखी आहे .मग यांच्या आरक्षणातच घुसघोरी करु यांना सत्तेबाहेर ढकलायचा कुटील डाव आहे.कळला का जातियवाद??????
मराठा मोर्चे हे जातिय भावनेतूनच काढले जात आहेत हे स्पष्ट आहे.
यामागे खेडेकर ,कोकाटे व त्यांचा बोलवता धनी यांचा ब्रेन आहे .

<<याचे कारण म्हणजे गावागावात सत्ताकारण करताना साळी,माळी,दलित बौद्ध यांच्यावर रोब दाखवायचे काम मराठा राजकारणी करतच असतात,त्यामुळेच फक्त मराठ्यांनाच ॲट्रॉसिटीची अडचण वाटते.इथेच जातीयवाद आहे>>
या मोर्चाला आपण राजकारणाशी जोडताय हेच मला चुकीचे वाटते. अहो, जरा मोर्चातील तरुणांना भेटा. ते स्वतःच मराठा राजकारण्यांच्या विरोधात बोलतील. त्यामुळे राजकारणात कुणाचा अडसर होतो, हा तुमचा समज आहे आणि तो गैरही आहे. सत्ताकारण, राजकारणासाठी हे मोर्चे नाहीतच. इतर सर्व जातींप्रमाणेच आमचीही दखल घ्या, हे सांगण्यासाठी आहेत. वास्तविक राजकारणाच्या मागे लागूनच मराठा तरुण देशोधडीला लागले आहेत. पण आता त्यांना चूक कळते आहे.

ह्या चर्चेमुळे बरेच नवीन मुद्देही समजले आणि आधी होता तो गोंधळ वाढलाही. त्यामुळे वाचत राहणार. खरे तर दोन्ही बाजूंची मते थोडी थोडी पटत आहेत. कालच्या सकाळमधील लेखाबाबत मी वाहत्या पानावर लिहिले होते. त्याच्याशी मिळताजुळता प्रतिसाद टोच्यांनी दिलेला आहे.

अजूनही एका शंकेचे निरसन व्हावे अशी इच्छा आहे. कोपर्डी बलात्कारात जातीयवाद का आणला गेला? शोषक व शोषितांच्या जाती वेगवेगळ्या किंवा नेमक्या उलट्या असत्या तर असे मोर्चे निघाले असते का?

सकाळमधील लेखावरून बनवलेले मत येथे लिहिण्याचा मोह आवरत नाही.

हे शब्द माझे आहेत पण मत सकाळमधील लेखकाचे आहे.

'मोर्च्यामध्ये एकाचवेळी शोषक व शोषित असे दोघेही आहेत. सत्ताधारी व धनाढ्य मराठ्यांनीच इतर मराठ्यांचे अतोनात नुकसान केलेले आहे. त्यामुळे हे मोर्चे विचित्र आहेत. ते सकृतदर्शनी विद्यमान सरकारविरुद्ध असले तरी मुळात त्यांच्यात आपापसातच अनेक अपेक्षा व अपेक्षाभंग आहेत. कोपर्डीसारखी (दुर्दैवी) निमित्ते संघटीत होण्याइतपतच पुरत आहेत. संघटीत होऊन नेमके कोणाकडून काय मागायचे हे ठरवणे मोर्च्यात सामील असलेल्यांनाच कठिण जात आहे. तरीही ह्या प्रचंड संख्येचा प्रभाव पडल्यामुळे मराठा नेते जिवाच्या आकांताने ह्या मोर्च्यांचे नेतृत्व आपल्याकडे यावे ह्यासाठी प्रयत्नरत आहेत.'

येवढे मोठे मोर्चे गावोगावी निघत असताना त्यामागे असणारे नेतृत्व समोर दिसत नाही ही खरोखरच आश्चर्य चकित करणारी गोष्ट आहे. याची माझ्या मते दोन मुख्य कारणे असू शकतात.

पहिले म्हणजे खरोखरच सामान्य माणूस पिचलेला आहे आणि नेतृत्व त्यापासून दूर गेलेले आहे. हा प्रश्न जातीच्या रूपात बाहेर आला तरी त्याची व्याप्ती त्यापलिकडेही आहे. जर प्रश्नाची खरोखरच धग लागत नसेल तर इतक्या मोठ्या संख्येने, सर्वत्र व समोर नेतृत्व नसताना कुणी कितीही चिथावणी दिली तरी जनता रस्त्यावर आलीच नसती. आज महाराष्ट्रातील कुठलाही नेता समोर येउन, आवाहन करून येवढी गर्दी जमवू शकणार नाही. आपल्याकडे जयललिता, ममता नाहीत.

दुसर म्हणजे सोशल मिडियामुळे (Whatsaap) प्रचार किती वेगात होउ शकतो आणि त्यामुळे समान विचारांची माणसे एका कारणासाठी कशी एकत्र आणता येउ शकतात याचे हे उदाहरण आहे. अरब स्प्रिंग सारखे. माझ्यामते हा खूप क्रांतीकारक (गेममचेंजर) बदल घडत आहे. याचे सकारात्मक तसेच नकारत्मक असे दोन्ही परिणाम होउ शकतात.

बेफिकीर,
<<. कोपर्डी बलात्कारात जातीयवाद का आणला गेला? शोषक व शोषितांच्या जाती वेगवेगळ्या किंवा नेमक्या उलट्या असत्या तर असे मोर्चे निघाले असते का? >>
खरं तर हे कारण हास्यास्पद वाटू शकेल. पण हा असंतोष ‘सैराट’ सिनेमापासून खदखदायला सुरुवात झाली. कोपर्डीतील त्या मुलीवर इतक्या अमानुषपणे अत्याचार केले गेले की, त्यामुळे हा असंतोष सोशल मीडियामधून उफाळून आला. त्यातल्या त्यात मीडियाने मराठा समाजाच्या असंतोषाकडे सुरुवातीला पूर्ण दुर्लक्ष करणे हे खरे तर मोर्चांना बळ देणारेच ठरले. कारण त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्यांचे संघटन अधिक मजबूत होत गेले. मीडियाने सुरुवातीलाच याविषयी वायफळ चर्चा घडवल्या असत्या, तर एखाद्या राजकीय पक्षाने या मोर्चांचे श्रेय घेऊन टाकले असते. मात्र, सुदैवाने तसे झाले नाही.
विक्रमसिंह,
<<माझ्यामते हा खूप क्रांतीकारक (गेममचेंजर) बदल घडत आहे. याचे सकारात्मक तसेच नकारत्मक असे दोन्ही परिणाम होउ शकतात.>
जेव्हा समाजाचा असंतोष बाहेर येतो, तेव्हाच प्रस्थापितांविरुध्द खरी क्रांती होते. याची योग्य पातळीवर दखल घेतली गेली नाही, तर भविष्यात खरोखरच भयानक परिणाम होऊ शकतात. आठवलेंसारख्या नेत्यांच्या बेताल विधानांमुळे जातीयवाद उफाळून येऊ शकतो. ते रोखणे ही सरकारची तारेवरची कसरत ठरणार आहे.

Pagare, jati vyavasthe la virodh asun tumhala xyz jati che ekikaran changle watatey he ashchary karak ahe.

आता सतरा जणांची सतरा ठिकाणी तोंडे आहेत. ती एकच झाली तर मत पटवुन देणे सोपे जाते. जातीव्यवस्था तिचे हेतु, दुष्परिणाम याबाबत प्रबोधन करणे सोपे जाते.

Eka jati cha group jamvun tyana jati che dushparinam shikvayche? Chhan ahe kalpana. Kiti te sudharak vichar Lol

जर या निमित्ताने शहाण्णव कुळी मराठे आपाआपसातले मतभेद विसरून एकत्र झाले तर किती बरे.
असे जर चारशे वर्षांपूर्वीच झाले असते तर ... गोब्राह्मणप्रतिपालक असे मराठे राज्यकर्ते झाले असते, नि मग ब्रिटिशांची काय ताकद होती भारतात राज्य करण्याची?

असो. एक विचार आला मनात. साडे तीनशे वर्षांपूर्वी जसे एका मराठ्याने गोब्राह्मण प्रतिपालक होऊन सुराज्य स्थापन केले तसे आता बहुसंख्य मराठ्यांनी एकत्र येऊन राज्यव्यवस्थेतील, अन्याय, विषमता दूर करावी.

ब्राह्मणांचे सहाय्यहि लाभावे. जर मराठे आपआपसातले मतभेद विसरू शकतात तर ब्राह्मण, दलित सर्वच एकत्र येऊन, अन्यायविरहित, विषमता विरहित सुराज्य करावे, तिथे मग अधिकाराच्या जागांवर फक्त पात्रता हीच एक कसोटी असेल.

आज महाराष्ट्र, उद्या सर्व भारत. मग चीन, अमेरिकेच्या छुप्या घातकी कारवाया बंद होतील, नि त्यांना त्यांची जागा दा़हवून दिल्या जाईल.

जय महाराष्ट्र, जय भारत.

सचिन पगारे,
<<मराठा एकिकरण ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.>>
प्रथमच तुमच्या मताशी सहमत. या मोर्चांमुळे कुणालाही असुरक्षित वाटण्याचे कारण नाही.

Bramhan ekikarana vishayi kay mat ahe?>>>>एकत्र नाहीत? नवीन गोष्ट आहे माझ्यासाठी

टोच्या माझ्याशी प्रथमच सहमत आहात ह्याबद्दल आभार...म्हणजे याआधी मी जे जातिमुक्त भारताबद्दल बोलतो ते पटलेले दिसत नाही. असो .

मोर्च्याबाबत काही प्रश्न

अशी कोणती घटना घडलीय कि मराठा समाज एकवटतोय?

कोपर्डी.

कोपर्डी च्या नराधमांना फाशीची द्या अशी मागणी आहे त्याला तर कोणाचं विरोध करत नाही आहे . ना सरकार ना दलित ना ओबीसी.

ऍट्रॉसिटी कायदा रद्द करा- हा कायदा नेमका काय आहे हे मोर्च्यात बहुसंख्य स्त्रिया आणि युवकांना माहित असेल का ह्या बाबत शंका आहे .

ह्या एकत्रीकरणामागे राजकारण नाही हे मला मान्य नाही.

सिंधखेडराजाला मराठा समाज दरवर्षी लाखाने जमतो Happy ह्या मागचे गणित तुम्हिच विचार करून ठरवा

पण एक आहे हे एकत्रीकरण अत्यंत चांगले आहे पुढे ह्याचा विधायक कामासाठी वापर करता येईल .

Pages