विद्युत उपकरणे - समुह

Submitted by केअशु on 18 September, 2016 - 20:48

'विद्युत उपकरणे' या विषयावर व्हॉटस्अप समुह सुरु केला आहे.

एसी आणि डीसी विद्युत उपकरणांची रचना, कार्य, वापर, त्यांची देखभाल,दुरुस्ती, त्यांना लागणारी सॉफ्टवेअर्स, उपकरणांची खरेदी, वीजबचत,इ - कचरा,त्यांची योग्य ती विल्हेवाट याबद्दल माहितीची देवाणघेवाण,चर्चा, शंका,मार्गदर्शन, तसेच बाजारात आलेली नवीन विद्युत उपकरणे, त्यांची वैशिष्ट्ये,या विषयावरची पुस्तके,नियतकालिके,लेख याबद्दल येथे बोलता येईल.

त्याचबरोबर अभियांत्रिकी तसेच विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना शिवाय या विषयाचा छंद असणार्यांना विद्युतविषयक शंका तसेच प्रोजेक्टस् बनवताना येणार्या विद्युतविषयक समस्या,शंका याबद्दलही येथे विचारता येईल.

सदस्य होणार्या सर्वांनाच या विषयाचे परिपूर्ण ज्ञान असेलच असे नाही.पण या विषयाची आवड,उत्सुकता,कुतुहल असणार्या सर्वांसाठी हा समुह खुला आहे.

मराठी भाषेत या विषयावर फारशी चर्चा होत नाही.सर्वांनाच इंग्लिशमधून लिहिलेल्या संकल्पना व्यवस्थित समजतील असे नाही. या विषयावर आपल्या 'सुगम' अशा मराठीतून संवाद व्हावा असे वाटते.

माबोवरील बरेचजण या क्षेत्रातील तज्ञ, माहितगार आहेत.त्यांच्याकडून यथायोग्य प्रतिसाद,मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे.

समुहात सामील होण्यासाठी व्यक्तिगत निरोप पाठवावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) या समुहावर electrical,electronics,computer या क्षेत्रात काम करणार्या कोणालाही वीजेसंबंधी वीजेवर चालणार्या यंत्रणेसंबंधी तांत्रिक मार्गदर्शन मिळवता येईल.
२) अनेकदा आपण electronics वस्तू स्वस्त मिळते म्हणून online मागवतो.त्या आधी त्याचा वापर कोणी केला असेल,अधिक माहिती असेल तर सल्ला विचारता येईल.
३) Electronics क्षेत्र सातत्याने बदलणारं आहे.त्यासंबंधीही बोलता येईल.
4) विद्युत उपकरण खरेदी करण्याआधी सल्ला विचारता येईल.
५)विशेषत: अभियांत्रिकिच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.

काही शंका असतील तर जरुर विचारणा व्हावी.

व्हॉटस्अप समूहात चर्चा करण्यापेक्षा मायबोलीवरच केलीत तर माहिती, चर्चा इथे साठवली जाईल. व्हॉटस्अप सदस्य नसलेल्या अनेकांना भविष्यात सुद्धा ती माहिती शोधता येईल. धागा सार्वजनिक केल्यास मायबोली सदस्य नसलेल्या लोकांना सुद्धा त्या माहितीचा फायदा होईल.

तुम्हाला तुमच्या व्हॉटस्अप समूहाची जाहिरात करायची असेल तर त्याकरता मायबोलीवरचा जाहिरात विभाग पहा.

मेधाताई,
वेगवान संपर्क,व्हिडीओ अपलोडींग,पटकन होणारं फोटो, pdf file अपलोडींग या गोष्टी माबोवर शक्य आहेत का?

व्हॉटस्अपवरची माहितीसुध्दा साठवता येते.sd card,संगणक,अगदी cloud वरही.

मोफत चालणार्या चांगल्या उपक्रमाची 'माहिती देण्यासाठी' जाहिरात विभाग कशाला गाठायला हवा?

शिवाय ही उपक्रमाची माहिती आहे.ज्यांना आवडेल ते येतील.पटत नसेल तर येऊ नये.कुणावरही जबरदस्ती नाही;अगदी प्रतिसाद देण्याचीसुध्दा!