आई

Submitted by कविता९८ on 17 September, 2016 - 01:01

आई सरस सरस
आईहून मोठे कोण
आई परिस परिस
करी जीवनाचं सोनं ।।

आई मायाळू मायाळू
लावी सागराची माया
लेकराच्या सुखापरी
सारी झिजवते काया ।।

आई भरवी भरवी
तिच्या घासातला घास
आई शिकवी शिकवी
चालणे बोलणे आम्हांस ।।

आई महान महान
तिचे अपार हे ऋण
असे गहाण गहाण
तिच्या चरणी हे जीवन ।।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कऊ, हिच का ती कविता जी तू पाचवी ला असताना लिहीली होतीस?
( माझी पहिली कविता मी पाचवीत असताना लिहिली ती "आई" वर..― एक पत्र 'पप्पा'साठी)

कऊ, हिच का ती कविता जी तू पाचवी ला असताना लिहीली होतीस?( माझी पहिली कविता मी पाचवीत असताना लिहिली ती"आई" वर..― एक पत्र 'पप्पा'साठी)>>>हो राहुल दादा

सोप्या सहज शब्दांत खुप सुंदर अर्थ अलगद मांडत माय लेकीचे भावविश्व उलगडून दाखवले>>>>अंबज्ञजी धन्यवाद.. तुम्ही जाणार का उद्या event ला??

धन्यवाद मेघा आणि दत्तात्रय जी